Re-Edit मॉडयुल मधील घोषणापत्र 2 नायब तहसिलदार ( DBA ) व घोषणापत्र 3 तहसिलदार यांनी करणेबाबत.
क्र.रा.भू.अ.आ.का.4 / Re-Edit /2017
जमाबंदी आयुक्त आणि संचालक
भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य ),
यांचे कार्यालय, पुणे
दिनांक -28 /08/2017
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा
डी.डी.ई. ( सर्व ) .
विषय - Re-Edit मॉडयुल मधील घोषणापत्र 2 नायब तहसिलदार ( DBA ) व
घोषणापत्र 3 तहसिलदार यांनी करणेबाबत.
संदर्भ- 1) या कार्यालयाचे परिपत्रक क्र.राभूअआका4 /Re-Edit /2017
दि. 10/07/2017.
चावडीवाचनाच्या विशेष मोहिमेमध्ये प्राप्त आक्षेप व महसूल अधिकाऱ्यांच्या तपासणीत संगणकीकृत 7/12 व 8अ मध्ये आढळून आलेल्या त्रुटी दुर करण्यासाठी RE-Edit Module संदर्भीय परिपत्रकान्वये उपलब्ध करून देण्यात आले होते.त्यामध्ये घोषणापत्र 1,2 व 3 तलाठी यांनी करणे अपेक्षीत होते. त्यामध्ये अंशत: बदल करून सध्या घोषणापत्र -1 तलाठी यांनी करणे घोषणापत्र-2 नायब तहसिलदार (DBA) यांनी व घोषणापत्र-3 तहसिलदार यांनी करणे आवश्यक आहे. अशी सुधारणा करण्यात आली आहे.त्यासाठी आवश्यक त्या सुचना खालील प्रमाणे सर्व संबंधीतांच्या निदर्शनास आणाव्यात.
1) यापुढे घोषणापत्र 2 व3 तलाठी यांना करता येणार नाहीत.
2) खाता प्रोसेसिंग , खाता एकत्रीकरण व खाता विभागणी इत्यादी काम पुर्ण झालेनंतर संबंधीत तलाठी यांनी घोषणापत्र 1 करावे.
3) Edit Moduel चे काम पुर्ण झाल्यानंतर गट नंबर सर्व्हे नंबर पैकी ज्या गट नंबर/ सर्व्हे नंबरवर दुरूस्ती आवश्यक आहे असे गट Re- Edit मध्ये लिहून त्यावर योग्य ती दुरुस्ती केल्यानंतर परिशिष्ट ब तयार करून त्यास तहसिलदार यांची मान्यता घेतल्यानंतर तयार केलेला फेरफार मंडळ अधिकारी यांनी सर्व्हे नंबर/ गट नंबर निहाय करावा. तत्पुर्वी जर यापुर्वी काही गट Re-Edit मध्ये निवडून दूरुस्त्या फेरफार तयार करून मंजूर केल्या असतील तर असा 7/12 पुन्हा Re-Edit साठी उपलब्ध होणार नाही . मात्र Re- Edit मध्ये गट नंबर /सर्व्हे नंबर निवडून कोणतीही दूरुस्ती केली नसल्यास फेरफाराने दुरूस्त्या नामंजूर केल्या असल्यास अशा गटावर/ सर्व्हे नंबरवर दुरुस्त्या Re- Edit मधून करता येतील.
( परिशिष्ट अ अथवा ब फक्त संगणकीकृत 7/12 हस्तलिखित 7/12 शी तंतोतंत जुळविण्यासाठी आहे. त्यामध्ये हस्तलिखितमध्ये नसलेल्या कोणत्याही दुरूस्त्या घेण्यात येऊ नयेत जर हस्तलिखित गा.न.नं.7/12 मध्ये काही चुका/ त्रुटी असल्यास त्या दुरूस्त करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमाच्या कलम 155 प्रमाणे योग्य ती सुनावणी घेऊन व संबंधीत पक्षकारांची बाजु ऐकुन घेऊनच निर्णय घेण्यात यावा. अशा दुरुस्त्या थेट परिशिष्ट मध्ये घेण्यात येऊ नयेत. )
4) पालक महसुल अधिकाऱ्याने 1ते 24 मुद्दयांची केलेली तपासणी व महसूल अधिकाऱ्यांच्या तपासणीत आढळून आलेल्या त्रुटी तसेच ODC अहवाल 1 ते 26 निरंक करण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या पुर्ण झाल्यानंतर व त्या योग्य रित्या साठविल्या गेल्या असल्यास अचूक 7/12 ची प्रिंट आऊट काढून महसुल कर्मचारी अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या बिेंदु प्रमाणे किमान 149 % तपासणी पुर्ण करावी . या तपासणीत काही त्रुटी आढळून आल्यास त्या देखील Re- Edit मधून दुरूस्त करण्यात याव्यात व त्यानंतरच घोषणापत्र 2 संबंधीत डी.बी.ए. ( नायब तहसिलदार ) यांचे लॉगीनने करण्यात यावे.
घोषणापत्र दोन करण्यापुर्वी सर्व तपासण्या इष्टांकाप्रमाणे पुर्ण करून दुरुस्त्या दखील केल्या आहेत व तपासणी केलेले सर्व 7/12 वर नाव व पदनाम टाकुन स्वाक्षरीत 7/12 तालुका अभिलेख कक्षात जमा केल्याची खात्री DBA यांनी करावी.
5) घोषणापत्र 2 डीबीए ने केल्यानंतर घोषणापत्र 3 साठीची माहिती नायब तहसिलदार यांनी भरुन साठवा करावी व त्यानंतर घोषणापत्र 3 तहसिलदार यांच्या Biometric login ने Usercreation मधून करण्यात यावे.
घोषणापत्र 3 करण्यापुर्वी तहसिलदार यांनी या घोषणापत्रात नमुद सर्व बाबी पुर्ण असल्याची खात्री करावी.
वरील सर्व सूचना तात्काळ सर्व वापरकर्त्यांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात ही विनंती.
आपला विश्वासू
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक,ई-फेरफार प्रकल्प
रा.भू.अ.आ.का.जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे.
Comments