रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

HAPPY INDEPENDANCE DAY 2017

नमस्कार मित्रांनो ,

आज भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा करताना मनस्वी आनंद होत आहे , कारण आज पासून राज्यातील ३११० गावांमधील खातेदारांना आपण अचूक संगणकीकृत ७/१२ आपले सरकार पोर्टल मार्फतउपलब्ध करून देत आहोत . सर्व सामान्य जनतेला आपल्या प्रॉपर्टी चा मालकी हक्काचा पुरावा समजला जाणारा ७/१२ घरबसल्या उपलब्ध होणार आहे . यापुढे ७/१२ वर  होणारे सर्व बदल , हस्तांतराच्या नोंदी ,  फेरफार नोंदी , ONLINE  पद्धतीने घेतल्या जाणार आहेत . 
या गावांसाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या तलाठी मंडळ अधिकारी व संबंधित महसूल अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन . या गावात आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी होणाऱ्या ग्रामसभेत तलाठी मंडळ अधिकारी व संबंधित महसूल अधिकारी हजर राहून या बाबत माहिती देईल व उपस्थित असणाऱ्या खातेदारांना या अचूक संगणकीकृत ७/१२ चे प्रमुख मान्यवरांचे हस्ते वितरण होईल . पालकमंत्र्यांचे भाषणात याचा विशेष उल्लेख करून संबंधित तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र देऊन यथोचीत गौरव नंतर केला जाईल . या दिवशी संबंधित सर्व गावात उपस्थित राहणार असलेने गौरव समारंभ नंतर देखील घेता येईल . उर्वरित गावांचे काम पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणेत यावा . कोणत्याही परिस्थिती कामाची गुणवत्ता राखली जाईल याची दक्षता प्रत्येक तलाठी मंडळ अधिकारी , पालक महसूल अधिकारी , नायब तहसीलदार , तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी घ्यावी .मा.जमाबंदी आयुक्त सो यानी चर्चे दरम्यान वारंवार त्यांच्या परिपत्रकातील शेवटच्या ओळी ची आठवण करुन दिली. 
सर्वाना स्वातंत्र दिनाच्या व गुणवत्तापुर्ण कामासाठी शुभेच्छा  💐
रामदास जगताप 

Comments

Archive

Contact Form

Send