योग्य खाते प्रकार निवडणे
नमस्कार मित्रांनो ,
खाते प्रकार योग्यरीत्या निवडण्यासाठी प्रथम खाते प्रकार कोणते आहेत ते समजावून घ्या
online ७/१२ व फेरफार करताना software मध्ये वापरले जाणारे खाते प्रकार दिनांक १३/११/२००२ च्या शासन निर्णयाने वमा जमाबंदी आयुक्त यांचेDATA VERIFICATION & VALIDATION साठी दिनांक १६/८/२००३ च्या परिपत्रकाची निश्चित करून दिले आहेत .
१) वैयक्तिक खाते - एका खात्यात एकाच खायतेदाराचे नाव
२) सामायिक खाते - एका खात्यात एकाच कुटुंबातील अनेक सहहिस्सेदारांची सामाइकत नावे .
३) संयुक्त खाते - एका खात्यात वेग वेगळ्या कुटुंबातील व्यक्तींची सामाइकात नावे
३) सरकार खाते - सरकारी मालकीच्या गायरान , गुरुचरण, बिन आकारी , आकारी पड , महाराष्ट्र शासन , सरकार , केंद्र सरकार
४) अ.पा.क. खाते – मयत खातेदाराची वारस नोंद करताना एखादा वारस अज्ञान असल्यास हा खाते प्रकार निवडावा व तो सज्ञान झाल्याची खात्री करून अ . पा . क . हा खाते प्रकार केंव्हाही कमी करता येईल
५) ए . कु. म्या .खाते – वारसान पैकी एकाचे नाव ७/१२ वर लिहून त्या पुढे ए कु म्या / ए कु पु / ए पु / ए कु क लिहिला असल्यास हा खाते प्रकार निवडावा (मुळ
वारस फेरफार / वारस रजिस्टर पाहून त्यात नमूद असलेल्या सर्व वारसांची सामाइकात नावे दाखल करण्या बाबत सध्या सूचना आहेत
६) अविभक्त हिंदू कुटुंब खाते - HUF KHATE
७) विश्वस्त खाते - धर्मादाय आयुक्तांकडे निंदणीकृत धर्मादाय संस्थानच्या मिळकती
८) सहकारी संस्था खाते -
९) महाराष्ट्र शासनाची महामंडळे -
१०) महाराष्ट्र शासनाचे विभाग -
११) केंद्र शासनाचे खाते-
१२) केंद्र शासनाची महामंडळे -
१३) शैक्षणिक संस्था-
१४) सामाजिक संस्था -
१५) स्थानिक स्वराज्य संस्था खाते - ग्राम पंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद , नगरपालिका , महापालिका यांच्या मालकीच्या मिळकती
Comments