रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आता आपला ७/१२ पहा देशातील 22 क्षेत्रीय भाषांमध्ये

 नमस्कार मित्रांनो , 


आपल्या सर्वांचे अभिनंदन - आता आपला ७/१२ पहा देशातील 22 क्षेत्रीय भाषांमध्ये 


                 महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने संगणकीकृत करून डिजिटल स्वाक्षरीत केलेला व सध्या  प्रत्येक नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध होत असलेला ७/१२ व शहरी भागातील मिळकत पत्रिका आता आपल्याला देशातील 22 क्षेत्रीय भाषेत पाहण्यासाठी भूलेख या लिंकवर महाभूमी पोर्टल वर उपलब्ध झाला आहे.

                 यासाठीची सुविधा राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र (NIC) ने विकसित करून  महाभूमी पोर्टलवर आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शुभारंभ केला आहे. त्यासाठी पुणे येथील सी ड्याक (C-DAC)  विकसित केलेल्या टूल चा वापर करण्यात आला असून यासाठी केंद्र शासनाने सर्व राज्यांना निर्देश दिले होते त्याप्रमाणे ई फेरफार प्रकाद्वारे संगणकीकृत झालेला व अद्यावत होत असलेला ७/१२  आता मराठी शिवाय  इंग्रजी, हिंदी, संस्कृत, ओडिसी, तमिळ, तेलगु  मल्याळम, बंगाली,गुजराती, पंजाबी, कानडी, आसामी, उर्दू, मणिपुरी, नेपाळी, कोकणी, डोगरी, बोडो, संथाली, सिंधी, काश्मिरी (देवनागरी) व काश्मिरी ( परसो अराबिक) या 22 क्षेत्रीय भाषांमध्ये उपलब्ध होवू लागला आहे त्यामुळे त्याचा लाभ अनेक बिगर मराठी भाषिक नागरिकांना होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.  यासाठी https://bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळाचा वापार करा. बिगर मराठी भाषेतील सातबारा व मिळकत पत्रिका साध्य फक्त विनास्वक्षारीत मोफत फक्त पाहण्यासाठी (VIEW ONLY) सुविधे मधेच उपलब्ध असल्याने असे ७/१२ किंवा मिलक पत्रिका डिजिटल स्वाक्षरीत नसल्याने त्या कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा न्यायालयात स्वीकारल्या जाणार नाहीत किंवा ग्राह्य समजल्या जाणार नाहीत मात्री तरीही बिगर मराठी भाषिक नागरिकाना जमिनीचे हे अधिकार अभिलेख समजण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. 


रामदास जगताप 

उप जिल्हाधिकारी 

दि २६.१.२०२३ 

Comments

Archive

Contact Form

Send