महाराष्ट्राची ई-पीक पाहणी पोहचली राजस्थान मध्ये
महाराष्ट्राची ई-पीक पाहणी स्वीकारली राजस्थान ने
ई पीक पाहणी राज्यस्थान मध्ये होणार ई-गिरदावरी
राज्याचे महसूल विभागाने विकसित केलेली ई पीक पाहणी आता राजस्थानने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ट्रस्टच्या मदतीने महसूल विभागाने विकसित करून राज्याचे महसूल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्वात व राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव जी ठाकरे यांचे शुभहस्ते दि . १५ ऑगस्ट पासून राज्यव्यापी केलेला शेतकरी यांना सक्षम करणाऱ्या यशस्वी प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी राजस्थान राज्याचे जमाबंदी आयुक्त मा. महेंद्र परख, जिल्हाधिकारी भिलवाडा श्री. शिवप्रसाद नकाते, एन आय सी राजस्थानचे वरिष्ठ तांत्रिक संचालक श्री अरुण माथुर व श्री. मीना अशी चार वरिष्ठ अधिकार्यांची टीम सध्या महाराष्ट्र राज्याच्या अभ्यास दौऱ्यावर आली असून त्यांनी राज्याच्या ई पीक पाहणी प्रकल्पाचे कौतुक केले असून राजस्थान मध्ये महाराष्ट्राचा लोकप्रिय ई पीक पाहणी प्रकल्प स्वीकारण्याची शिफारस राजस्थान सरकार ला केली असून राजस्थानचे महसूल मंत्री मा. रामलाल जाट यांनी महाराष्ट्राची ई -पीक पाहणी ई - गिरदावरी म्हणून स्वीकारली असल्याची घोषणा देखील केली आहे.
राजस्थानच्या पथकाने महाराष्ट्राच्या डिजिटल सातबाराच्या म्हणजेच ई फेरफार प्रकल्पाचा देखील अभ्यास केला असून महाराष्ट्राची ऑनलाईन ई फेरफार प्रणाली ( पेपरलेस प्रक्रिया) देखील राजस्थान मध्ये लागू करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. यावेळी राज्याचे जमाबंदी आयुक्त श्री निरंजन सुधांशू, ई फेरफार व ई पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्री रामदास जगताप, भूमी अभिलेख विभागाचे उप संचालक किशोर तवरेज, बाळासाहेब काळे व एन आय सी चे वरिष्ट तांत्रिक संचालक श्री समीर दातार व तहसीलदार (ई पीक पाहणी प्रशिक्षण) श्री. बालाजी शेवाळे हे उपस्थित होते. राजस्थान टीम ने राज्याचे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, टाटा ट्रस्टच्या वतीने राज्याचे माजी मुख्य सचिव मा. जयंतकुमार बांठिया व सेवा निवृत्त सनदी (आय ए एस) अधिकारी श्री. नरेद्र कवडे व श्री चंद्रसेन यांचे सोबत मुंबईत बैठक घेवून सर्व ऑनलाईन प्रकल्प बारकाईने समजून घेतला आहे.
राज्यात आज अखेर ९५.६० लक्ष शेतकरी खातेदार यांनी ई पीक पाहणी मोबाईल आप मध्ये नोंदणी केली असून त्यापैकी ६६ लक्ष शेतकरी खातेदार यांनी खरीप व रब्बी हंगामात ई पीक पाहणी केली आहे. महसूल मंत्री श्री थोरात साहेब यांचे अपेक्षे प्रमाणे ई पीक पाहणी प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारला आहे ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
रामदास जगताप , उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प
Comments