खरीप हंगाम ई पीक पाहणीला १५ दिवस मुदतवाढ
प्रति,
१. जिल्हा समन्वयक उप जिल्हाधिकारी
ई-पीक पाहणी प्रकल्प
जिल्हाधिकारी कार्यालये (सर्व)
२. सह जिल्हा
समन्वयक कृषी अधिकारी
ई पीक पाहणी
प्रकल्प
अधीक्षक कृषी
अधिकारी कार्यालये (सर्व)
विषय- ई पीक पाहणी चा खरीप हंगाम
कालावधी वाढवून देण्याबाबत.
संदर्भ - महसूल व वनविभाग कडील शासन निर्णय क्रं.जमीन-
2018/प्र.क्रं.92/(भाग-1) /ज-1अ मुंबई, दिनांक:
30/07/2021
संदर्भीय शासन निर्णयाद्वारे
राज्यव्यापी केलेल्या ई पीक पाहणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जमाबंदी आयुक्त
कार्यालयाचे स्तरावरून प्रचार प्रसिद्धी व प्रबोधन या साठी १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट
आणि खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल आप द्वारे पीक पाहणी करण्यासाठी
शेतकरी यांचे साठी १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर असा कालावधी निश्चित करून देणेत आला
होता व त्यानंतर १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत तलाठी स्थरावरून होणारी
पीक पाहणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.
राज्याच्या काही भागात
अतिवृष्टी, पूर, कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे आणि ई पीक पाहणी मोबाईल
आप च्या थोड्या उशिराच्या शुभारंभ ह्याचा विचार करून राज्यस्थरीय अंमलबजावणी
समितीच्या दिनांक ८.९.२०२१ च्या बैठकीत ई पीक पाहणीच्या शेतकरी स्तरावरील कामाची
कालमर्यादा १५ सप्टेंबर वरून ३० सप्टेंबर आणि तलाठी स्तरावरील पीक पाहणी
नोंदविण्याची कालमर्यादा ३० सप्टेंबर पासून १५ ऑक्टोंबर पर्यंत वाढविण्यास मान्यता
देण्यात येत आहे त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी,
कृषी सहाय्यक तसेच मंडळ कृषी अधिकारी आणि सर्व शेतकरी बांधवांचे निदर्शनास आणून
द्यावे. या बाबत आपण आपले स्थरावर व्यापक प्रचार प्रसिद्धी करावी ही विनंती .
आपला विश्वासू,
(रामदास जगताप)
उपजिल्हाधिकारी तथाराज्य समन्वयक,
ई-पीक पाहणी प्रकल्प
जमाबंदी
आयुक्त कार्यालय, पुणे
मा. अप्पर मुख्य सचिव, महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी,
महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
मा. प्रधान सचिव, कृषी मंत्रालय मुंबई ३२ यांना माहितीसाठी
मा. महासंचालक, महाराष्ट्र राज्य
कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे
मा. संचालक, शिक्षण, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन
परिषद, पुणे यांना माहितीसाठी
मा. कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीसाठी
Comments