राज्याचे ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी वरदान - केंद्रीय सचिव सोनमोनी बोराह
राज्याचे ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी वरदान - केंद्रीय सचिव सोनमोनी बोराह
पुणे :- राज्य शासनाच्या महसूल विभागाने शेतकरी यांना सक्षम करण्यासाठी विकसित केलेल्या ई पीक पाहणी मोबाईल ॲप चे प्रात्यक्षिक नुकतेच केंद्र शासनाचे अप्पर सचीव श्री सोनमोनी बोराह यांना पुरंदर तालुक्यातील दिवे झेंडेवाडी येथे श्री अमर झेंडे आणि सागर झेंडे यांचे शेतात दाखविण्यात आले त्यावेळी श्री सोनमोनी यांनी हे मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान ठरणार असून यामुळे शेतकरी यांना शेतातूनच शेतातील पिकाचे अक्षांश रेखांशासह फोटो काढून ही माहिती थेट तलाठी यांचेकडे ऑनलाईन पद्धतीने पाठवता येणार असल्याने हे ॲपशेतकरी यांचे साठी एक मोठे वरदान ठरणार असे उदगार काढले. यावेळी त्यांचे सोबत राज्याचे ई पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक उप जिल्हाधिकारी श्री. रामदास जगताप , पुण्याचे राजा राखीव उप जिल्हाधिकारी श्री संजय तेली, पुण्याचे अधीक्षक भूमी अभिलेख श्री सूर्यकांत मोरे, सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी श्री दीपक पाटील, प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनौबत, उप अधीक्षक भूमी अभिलेख , सरपंच सौ.पूनम झेंडे, पोलीस पाटील सौ. सारिका झेंडे, तलाठी सौ.स्नेहा कांबळे, व ग्रामस्त हजर होते . या वेळी तहसीलदार, सरपंच, उप सरपंच , तलाठी , ग्रामसेवक व मोजणीदार सर्व महिलाच असल्याने महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाचे देखील सचिव महोदयांनी कौतुक केले. राज्यातील सातबारा संगणकीकरण, डिजिटल सातबारा, ई-हक्क प्रणाली. ई -पीक पाहणी प्रकल्प , यांचे सह कोर्स स्टेशन (CORS) आणि रोवर्स च्या मदतीने होणारी मोजणी ह्याचे देखील सचिव महोदयांनी कौतुक केले व उर्वरित कामाला शुभेच्छा दिल्या .
Comments