ई-पीक पाहणी मोबाईल ॲप बाबत एक शेतकरी प्रतिक्रिया
ई-पीक
पाहणी मोबाईल ॲप बाबत एक शेतकरी प्रतिक्रिया
१५ ऑगस्ट,२०२१ पासून संपूर्ण राज्यात २०२१ च्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकांची नोंद स्वतः
करण्याची सुविधा असेलेल्या ई पीक पाहणी प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु करण्यात आलेला आहे. ई पीक पाहणी प्रकल्प
महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला असून या ई-पीक पाहणी मोबाईल ॲपला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यात दिनांक २३ सप्टेंबर अखेर ५५ लक्ष ९० हजार खातेदार शेतकरी यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲप चा वापर केला आहे .
ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे होणारे फायदे :-
- ई-पीक पाहणी या मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात लागवड केलेल्या पिकांची अचूक नोंद ७/१२ वर होणार आहे.
- या ॲपवरील नोंदीमुळे महाराष्ट्र राज्यात, एखाद्या पीकाचे एकूण क्षेत्र किती आहे ? याची अचूक आकडेवारी एका क्लिकवर शासनाकडे उपलब्ध होणार आहे.
- नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या अचूक पीकपेरा आकडेवारीच्या आधारावर कृषी उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येणे सुद्धा शक्य होणार आहे. यावरुन भविष्यात लागणाऱ्या बी-बियाणे, खते शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देणेबाबत नियोजन करणे सहज शक्य होईल.
- पीक विमा योजना किंवा आधारभूत किमतीवर धान खरेदी / कापूस खरेदी साठी, साखर कारखान्याचे ऊस तोडणी नियोजन साठी अचूक माहिती उपलब्ध होणार.
- मा. मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेले "विकेल ते पिकेल" यायोजनेसाठीसाठी उपयुक्त.
- विश्वसनीय पिक माहिती आधारे शासनस्तरावर कृषीविषयक कार्यक्षम धोरण आखण्यास मदत.
शासनाच्या ई पीक पाहणी ॲप मधून
सन 2021-22 या वर्षासाठी खरीप हंगामासाठी मौजे जुई गावातील शेती
मध्ये मी मोबाईल ॲप च्या माध्यामातून ई पीक पाहणी पूर्ण केली,तलाठी जुई तहसिल
उरण जि.रायगड यांनी आमच्या गावात शेतकरी बांधवाची
कार्यशाळा आयोजित केली होती,आमच्या शेतातील मी गावातील प्रथम शेतकरी असून ज्याने शेतातील
पीक ऑनलाईन पध्दतीने तलाठी यांना पाठवले आहे,त्यामुळे सात बारा वर यावर्षीची पीके अदयावत झाली आहेत याबाबत
मी खुप समाधानी असून शासनाने सुरु केलेल्या ई पीक पाहणी उपक्रमामुळे शेतातील घेतलेल्या
पीकांची,बांधावरच्या झाडांची अदयावत माहिती आता थेट तलाठी कार्यालयात जात आहे. आम्हाला
पंचायत समिती मधून ताडपत्री,शेती पंप,शेतीचे अवजारे,धान्य विक्री केंद्रावर,बी-बियाणे,फवारणी
औषधे,यासाठी देखील आम्हाला या अद्ययावत
सात बाराचा निश्चित उपयोग होईल…
शिवचंद्र बाळकृष्ण भोपी
मु.पो.जुई ता.उरण जि.रायगड
शेतकरी श्री.शिवचंद्र
बाळकृष्ण भोपी यांनी शेतातील पीक ऑनलाईन पध्दतीने तलाठी यांना पाठवले व त्यांचा
चालू हंगामाची पीक पाहणी अद्ययावत असलेला ७/१२ तलाठी जुई श्री शशिकांत सानप यांचे कडून तात्काळ वाटप
ई पीक पाहणी हे मोबाईल आप शेतकरी हिताचे असून सर्व शेतकरी खातेदार बंधू भगिनींनी या ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा .
Comments