ई पीक पाहणी - पिकाचे फोटो बाबत महत्वाची माहिती
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो,
पीक पेरणीची माहिती भरा टॅबमध्ये
‘ मुख्य पिकाचे छायाचित्र ' या संदर्भात महत्वपूर्ण सूचना
नोंदणी करावयाच्या पीक नोंदी बाबत पिकाचे नाव निवडून
शेतकरी याठिकाणी पीक पेरणी केलेला/लागवड केलेल्या पीकांचा दिनांक नमूद करतील.
मुख्य पिकाचे छायाचित्र
• शेतकरी याठिकाणी पीक पेरणी केलेल्या पिकांचा फोटो अपलोड करतील त्यावेळी मोबाइल फोन चे लोकेशन व इंटरनेट सुरु असणे गरजेचे आहे.
• शेतात पीक उभे असताना पिकाचा फोटो काढावा.
• फोटो काढताना पेरलेल्या पिकांच्या मध्यभागी जाऊन काढावा जेणेकरुन Geotaging अचुक येईल.
• मोबाईल गॅलरी मधील फोटो अपलोड करता येणार नाही.
• शेतकऱ्यांचा पीका सोबत स्वत:चा फोटो काढणे आवश्यक नाही.
- फोटो काढताना अक्षांश रेखांश आवश्यक आहे असा मेसेज येत असल्यास पिकाचा फोटो आयकोन वर दोन तीन वेळा क्लिक करून एकाच ठिकाणी थोडा वेळ स्थिर राहावे
पिकाचा वर्ग पड क्षेत्र मध्ये उपप्रकार: लागवड योग्य पड निवडणे त्यानंतर चालु हंगामामध्ये 16 प्रकारांची चालू पड क्षेत्र फोटो न काढता भरता येईल परंतु चालू पड याठिकाणी जलसिंचनाचे साधन भरण्यास उपलब्ध होणार नाही. त्यासाठी कायम पड हा पर्याय वापरावा
पिकाच्या नोंदीबाबत किंवा ॲपबाबत कोणतीही अडचण असल्यास आपल्या गावचे तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क करा किंवा ०२०-२५७१२७१२ या क्रमांकावर फोन करून मदत कक्षाकडून माहिती घेऊ शकता.
आपला,
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई पीक पाहणी प्रकल्प, पुणे.
दि ८.९.२०२१
Comments