ई-पीक पाहणी प्रकल्पाबाबत स्पष्टीकरण
ई-पीक पाहणी प्रकल्पाबाबत स्पष्टीकरण
नमस्कार मित्रांनो,
आज काही सोशल मेडिया वर दवंडी नावाने काही मजकूर व एक देशमुख नामक शेतकर्याच्या नावाने काही मजकूर फिरत आहे त्याबाबत स्पष्टीकरण देण्यात येत आहे .
"माझी शेती माझा सातबारा - मीच नोंदविणार माझा पीक पेरा "
१. ई पीक पाहणी प्रकल्प राज्यातील 20 तालुक्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविल्या नंतरच त्याची उपयुक्तता विचारात घेवूनच हा प्रकल्प राज्यव्यापी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
२. परंपरागत पद्धतीने तलाठी स्थरावरील पीक पाहणीतील त्रुटी आणि अपुर्तता अथवा तक्रारी विचारात घेवून आता शेतकरी यांना स्वताच्या शेतातील उभ्या पिकांचे फोटो काढून पीक पाहणी अपलोड करण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
३. एका मोबाईल वरून वीस खातेदारांची पीक पाहणी अपलोड करावयाची सोय असल्याने एका वस्ती / वाडी वर काही शेतकरी बांधव यांचे कडे स्मरत फोन असला तरी ई पीक पाहणी १००% होण्यास काहीही अडचण येणार नाही .
४. ई पेक पाहणी हे मोबाईल ॲपऑफलाईन देखील चालते म्हणजेच फक्त खातेदार नोंदणी करताना एकदाच आणि पिक पाहणी अपलोड करताना इन्टरनेट आवश्यक असते म्हणजेच खातेदाराची नोंदणी व फोटो आणि माहिती अपलोड करतानाच इन्टरनेट लागते इतर वेळी म्हणजेच शेतावरून पिक नोंदवून फोटो घेताना मोबाईल आप ऑफलाईन चालते
५. सुरुवातीचे काही अडचणी वगळता ई पीक पाहणी ॲप गुगल प्ले स्टोअर वरून मोफत डाऊनलोड करता येते त्यांनतर २/४ मिनिटच एका गटाची पीक पाहणी पूर्ण करता येते
६. ई पीक पाहणी हे मोबाईल ॲप वापरण्यास अत्यंत सोपे असून त्यासाठी सर्व खातेदार शेतकरी खातेदार यांना गावचे तलाठी व कृषी सहाय्यक यांचे मार्फट मार्गदर्शन केले जाते.
७. दि ८.९.२०२१ च्याराज्य स्तरीय अंमलबजावणी समितीच्या बैठकीत खरीप हंगाम ची पिक पाहणी शेतकरी यांनी करण्यासाठी ची १५ सप्टेंबर ही मुदत ३० सप्टेंबर पर्यत वाढविण्यास मान्यता दिली आहे आणि त्यानंतर १५ ऑक्टोबर पर्यंत तलाठी स्थरावून पेक पाहणी करण्यास देखील मान्यता दिली आहे.
८. खरीप २०२१ हंगामासाठी वरील तारखांचा आढावा घेवून निर्णय घेण्यात आला आहे
९. स्वतः हून पीक पाहणी न करू शकणाऱ्या शेतकरी यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक गावात तलाठी अथवा कृषी सहाय्यक यांना जबाबदारी दिली आहे
१०. प्रकल्पाच्या अंमलबजावणी साठी महसूल विभगा बरोबरच कृषी विभाग , साखर आयुक्त कार्यालय, सहकार विभाग, पणन विभाग , जलसंपदा विभाग, चारही कृषी विद्यापीठाचे सर्व कृषी महाविद्यालयातील कृषी पदवी अभ्यासक्रमाचे ९५०० विद्यार्थी , कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्रे, कृषी उद्याग समूह , कृषी उत्पन्न बाजार समित्या, साखार कारखाने, त्यांचे सर्व कृषी अधिकारी बीट प्रमुख आणि चीट बॉय, सहकारी , सरकारी व खाजगी बँका यांची मदत घेतली जात आहे.
११. ई पीक पाहणी शेतकरी करू न शकल्यास पीक कर्ज पीक विमा किंवा अन्य शासकीय योजना यांचा लाभ मिळणार नाही असा निर्णय अद्याप शासनाने घेतलेला नाही मात्र ई पीक पाहणी मुळे पीक विमा , पीक कर्ज तसेच शासकीय योजनांचा लाभ सुलभ होणार हे मात्र नक्की.
१२. डिजिटल स्वाक्षरीत सातबारा आता सर्वच योजनांसाठी जसे प्रधानमंत्री पीक विमा योजना, आधारभूत किमतीवरील धान / पीक खरेदी, नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानभरपाई, पीक कर्जा साठी बँक पोर्टल, महा डी बी टी पोर्टल इत्यादी त्यामुळे सातबारा वर अचूक पीक पेरा नमूद असणे शेतकरी बांधवांच्या हिताचे आहे.
१३. शासनाच्या विकेल ते पिकेल या धोरणाला अनुसरून ही माहिती कृषी बाजार पेठासाठी उपयुक्त ठरणार आहे
१४. मोबाईल ॲप मधील बहुसंख्य त्रुटी दूर करण्यात आल्या असून आता आत राज्यभरात दररोज सुमारे १.४० लक्ष ते १.५० लक्ष खातेदार नोंदणी करून ई पीक पाहणी करत असून आज अखेर १६ लाख खातेदार यांनी ई पेक पाहणी केली आहे.
१६. खातेदार नोंदणीसाठी दिलेला पासवर्ड (otp) फक्त एकदा sms स्वरूपात प्राप्त करून घेणे आवश्य आहे आणि त्यानंतर त्याच आप मध्ये दिसतो .
१७. शेतकरी बांधवाना ई पीक पाहणी बाबत मदत करण्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयात मदत कक्ष उभारण्यात आला असून त्यासाठी ०२०-२५ ७१२ ७१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येईल
१८. शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या ई पीक पाहणी या अत्यंत उपयुक्त प्रकल्पासाठी अनेक शेतकरी संघटना, कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी उत्पादक गट, कृषी शाश्रज्ञ , कृषी तज्ञ, विद्यार्थी , प्रगतीशील शेतकरी आणि तरुण शेतकरी वर्गाने मनपूर्वक अभिनंदन केले आहे.
१९. ई पीक पाहणी प्रकल्पाद्वारे अत्यंत पारदर्शी पद्धतीने पिकांच्या नोंदी होणार असल्याने चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या खोट्या शेतकऱ्यांना अडचणीच्या वाटणाऱ्या या सुधारणा सामान्य व खर्याखुर्या शेतकऱ्या साठी ई पीक पाहणी प्रकल्प एक क्रांतिकारी पाऊल ठरणार हे मात्र निर्विवाद सत्य आहे.
20. ई पीक पाहणी प्रकल्पा बाबत शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा फेसबुक पेज , twitter, linkden योग्य माहिती मिळवा , वाचा , आपल्या मित्रांना सांगा , प्रसिद्ध करा तसेच नेहमी कोणताही बदल चांगला असेल असे समजून स्वीकारला तरच बदल होईल .
शेतकरी बांधवांना सक्षम करणाऱ्या व शेती क्षेत्रात डिजिटल क्रांती समजून या ई पीक पाहणी प्रकल्पाचा व ई पीक पाहणी मोबाईल ॲप चा लाभ घ्या असे आवाहन मी या प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून करत आहे
आपला
Good Morning Sir
ReplyDeleteNice Work
सर 90 % शेतकऱ्यांची सोसायटी कर्ज आवश्यक असते त्यासाठी ते प्रत्यक्ष ऊस 20 गुंठे पण पीक पेरा 100 गुंठे असतो हे सगळं पीक कर्जासाठी करतात
ReplyDeleteतलाठी यांचे बरोबर आपण कृषी सहाय्यक ग्रामसेवक गावातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य कर्मचारी सोसायटी संचालक कर्मचारी या सर्वांवर जबाबदारी टाकावी काम गतीने होईल
ReplyDeleteबहुपिक या पर्यायामध्ये फक्त मुख्यपीक इतर 2 पिके अशें एकूण 3 पिके टाकता येतात,पण इतर पिके 2 पेक्षा जास्त असू शकतात.
ReplyDeleteप्रमोद उगले तलाठी
शेगाव बुलढाणा.
कृषी सहाय्यक संघटनेने या कामावर बहिष्कार टाकला आहे त्या बाबत आपली भूमिका काय आहे साहेब..
ReplyDeleteसाहेब तलाठी हा पण माणूस आहे याचा विचार करा
ReplyDeleteसर कायम पड च्या नोंदी मध्ये अडचणी निर्माण होत आहे आणि फोटो दिसत नाही जर अपलोड केलेला फोटो दिसत नसेल तर त्या एन्ट्री ला मान्यता दे सयुक्तिक आहे का ? मनोक राऊत तलाठी चिखलदरा अमरावती
ReplyDeleteजे शेतकरी अडाणी आहेत त्यांनी काय करायचे
ReplyDeleteमी मागील वर्षी पिक पाहणी नोंद केली होती.आता ह्या वर्षी नोंद करताना हंगाम कॉलम मध्ये हंगाम टाकताच पेरणीलायक क्षेत्र मायनस (वजा) मध्ये अॅटोमेटीक येते त्यामुळे इ पिक पाहणी ची नोंद होत नाही.पर्याय सांगा,सर.
ReplyDelete