दहा लाख शेतकरी खातेदारांनी केली ई-पीक पाहणी
दहा लाख शेतकरी खातेदारांनी केली ई-पीक पाहणी
अभिनंदन मित्रांनो ,
राज्याचे महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात यांचे दूरदृष्टी नेतृत्वात शासनाच्या महसूल विभागाने ई पीक पाहणी मोबाईल ॲप दि १३.८.२०२१ रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांचे शुभ हस्ते आणि राज्याचे कृषी मंत्री मा. दादासाहेब भुसे आणि राज्यमंत्री महसूल मा. अब्दुल सत्तार यांचे उपस्थितीत लोकार्पण झाले आणि स्वातंत्र्य दिना पासून ई पीक पाहणी प्रकल्प राज्यव्यापी झाला असून तेंव्हा पासून सुरवातीचे काही अडचणी दूर करून आता ई पीक पाहणी मोबाईल ॲप सुरळीत सुरु झाले असून त्याला शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. १५ ऑगस्ट पासून ४ सप्टे २०२१ अखेर साडे दहा लक्ष पेखा जास्त खातेदार शेतकरी यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करून त्यावर नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे दहा लक्ष खातेदार शेतकरी यांनी ऑनलाईन ई पीक पाहणी देखील नोंदविली आहे,. राज्यात सर्वाधिक खातेदारांची नोंदणी जळगाव जिल्ह्यात ( १.१९ लक्ष) द्वितीय क्रमांकावर धुळे ( ९४ हजार) तृतीय क्रमांकावर अमरावती ( ८१ हजार ) वाशीम ( ७४ हजार) झाली आहे. सर्वाधिक नोंदणी नाशिक व अमरावती विभागात झाली असून सर्वात कमी प्रतिसाद कोंकण व नागपूर विभागात दिसून येतो आहे.
ई पीक पाहणी प्रकल्पाला शेतकरी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत असून क्षेत्रीय स्थरावर महसूल अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकारी शेताचे बांधावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत . खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने पिकांच्या काढणी पूर्वी पीक पेरा ऑनलाईन भरणे आवश्यक असल्याने ग्रामीण भागात सध्या लगबग सुरु आहे. आता सर्व साखर कारखान्यातील ऊस नोंदणीसाठी सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी ई पीक पाहणीचा १०० % वापर करावा अश्या सूचना साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड साहेब यांनी नुकत्याच निर्गमित केल्या आहेत.
"माझी शेती माझा सातबारा
मीच नोंदविणार माझा पेक पेरा "
शेतकरी हिताचे ई पीक पाहणी आप च्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या पीक पाहणी बाबतच्या सर्व अडचणी दूर होतील त्यासाठी सर्व शेतकरी खातेदार यांनी हे आप डाऊनलोड करून वापरावे व आपल्या ह्सेतातील उभ्या पिकाचा अक्षांश रेखांश सह फोटो अपलोड करून पीक परा ऑनलाईन नोंदवावा -
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक
ई पीक पाहणी प्रकल्प
दि ४.९.२०२१
Comments