रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-पीक पाहणी प्रकल्प - प्रशिक्षण प्रबोधन सप्ताह साजरा करणेबाबत.

 

         जिल्हाधिकारी (सर्व)

         अधिक्षक कृषी अधिकारी (सर्व)

 

                         विषय:-   दि. 09/08/2021 ते दि. 14/08/2021 मध्ये ई-पीक पाहणी प्रकल्प

                                     प्रशिक्षण प्रबोधन सप्ताह साजरा करणेबाबत.

                         संदर्भ :-   शासन निर्णय दि. 30/07/2021 व ई- पीक पाहणी कार्यपध्दती जमाबंदी

                                      आयुक्त कार्यालय क्र.रा.भू.4/ ई- पीक पाहणी/मा. सु. क्र. 01/2021             

                                    दि.05/08/2021

महोदय,

                                    ई-पीक पाहणी राज्यव्यापी करण्याबाबतच्या दि. 30/07/2021 च्या संदर्भीय शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे व दि. 05/08/2021 च्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कार्यवाही आपले स्थरावर सुरू झाली असेलच याबाबत दि. 09/08/2021 ते 14/08/2021 चा कालावधीत ई-पीक पाहणी प्रकल्प प्रशिक्षण प्रबोधन सप्ताह आयोजीत करून खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

1.   सर्व संबंधीत महसूल व कृषी अधिकारी यांचे सह सर्व तलाठी /मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात यावेत.

2.   ग्राम पातळीवरील प्रशिक्षण व प्रबोधन वर्ग घ्यावेत.

3.   स्वातंत्र्य दिनाच्या ग्रामसभेत ई-पीक पाहणी प्रकल्पाची माहिती पालक अधिकारी, तलाठी/कृषी सहाय्यक कर्मचा-यांने ग्रामसभेला दयावी.

4.   स्वातंत्र्य दिनाच्या पालकमंत्री महोदयांच्या भाषणामध्ये ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यव्यापी झालेचा समावेश करण्याबाबत विनंती करावी. या कार्यालयाकडून पुरविण्यात येणा-या प्रचार, प्रसिध्दी व प्रशिक्षण साहित्याचा प्रभावी वापर करण्यात यावा.

5.   शेतकरी प्रशिक्षण/प्रबोधनासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करावा व शेतक-यांसाठी प्रत्यक्ष ॲप वापराबाबत वाडी वस्त्यांवर छोटया छोटया ग्रुपमध्ये प्रशिक्षण द्यावे. या कार्यालयाकडून पुरविण्यात येणा-या प्रचार, प्रसिध्दी व प्रशिक्षण साहित्याचा प्रभावी वापर करण्यात यावा.

6.   कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पालघर, ठाणे या पूर अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी जिल्ह्यांत आपत्ती निवारणाच्या कामाला प्राधान्य देऊन व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करुन व शेतक-यांना या ई-पीक पाहणी प्रकल्पाची माहिती दयावी.

                             वरील प्रमाणे मार्गदर्शक सुचना सर्व संबंधीतांच्या निदर्शनास आणाव्यात.

 

(एन.के.सुधांशु )

जमाबंदी आयुक्त आणि संचालक,

भूमि अभिलेख, (.राज्य).

प्रत:-    उप आयुक्त महसूल (सर्व) पुढिल कार्यवाहिस्तव.

           जिल्हा समन्वयक अधिकारी (उपजिल्हाधिकारी), ई-पीक पाहणी प्रकल्प.

           जिल्हा समन्वयक कृषी अधिकारी (उपजिल्हाधिकारी), ई-पीक पाहणी प्रकल्प (सर्व)

       

 

Comments

Archive

Contact Form

Send