ई पीक पाहणी - प्रेस नोट
प्रेसनोट |
दि. 13/08/2021 रोजी होणार ई-पीक पाहणी मोबाईल
ॲप चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा. |
महसूल व कृषी विभागाच्या
संयुक्त विद्यमाने ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यभर कार्यान्वीत होत असून यासाठी वापरण्यात
येणा-या ई-पीक पाहणीचा ॲन्ड्राईड मोबाईल
ॲपचा ऑनलाईन लोकापर्ण सोहळा श्री.उद्धव ठाकरे मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
यांचे शुभहस्ते मुबंई येथुन होणार आहे. त्यावेळी श्री. बाळासाहेब थोरात महसुल मंत्री,
श्री. दादासो भुसे, कृषीमंत्री तसेच श्री.
अब्दुल सत्तार, महसूल राज्यमंत्री व डॉ. विश्वजीत कदम कृषी राज्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. ई-पीक पाहणी पथदर्शी प्रकल्प राज्यव्यापी करण्याचा निर्णय महसूल विभागाने नुकताच घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय देखील प्रसिध्द झाला आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, विभागीय सहसंचालक कृषी, उपसंचालक भूमि अभिलेख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण फेसबुक लाईव्ह (https://m.facebook.com/maharevenue/ ) होणार आहे. |
(एन.के.सुधांशु )
जमाबंदी आयुक्त आणि संचालक,
भूमि अभिलेख, (म.राज्य) पुणे
Comments