डिजिटल सातबारा चा आणखी एक उच्चांक
अभिनंदन मित्रांनो ,
राज्याचे महसूल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात साहेब आणि महसूल राज्य मंत्री मा.ना.अब्दुल सत्तार साहेब यांचे नेतृत्वाखाली आणि महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा. डॉ. नितीन करीर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या अनेक ऑनलाईन सुविधांमुळे सामान्य माणसाच्या जमीन आणि सातबारा बाबतच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत.
सामान्य शेतकरी यांना केंव्हाही आणि कुठेही सातबारा व खाते उतारे उपलब्ध करून देण्यासाठी सुरु केलेल्या महाभूमी पोर्टल वरून आज आता पर्यंतची उच्चांकी सेवा मिळाली एका दिवसात झाले ७२ हजार ७०० डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उतारे डाऊनलोड. असे असले तरीही तलाठी कार्यालयातून झाले २लक्ष ४८ हजार सातबारा व खाते उतारे वितरीत आणि बँकेतून घेतले गेले ५६०० सातबारा खाते उतारे आणि भूलेख वरून ४ लाख ५ हजार विनास्वक्षारीत विनाशुल्क / फक्त माहितीसाठी चे सातबारा खाते उतारे. एका दिवसात सुमारे २३ लाखांचा महसूल नक्कल फी स्वरूपात जमा.
आता दररोज सुमारे ६० ते ७० हजार डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खाते उतारे डाऊनलोड त्यामुळे महसूल विभागाच्या सर्वच ऑनलाईन सुविधा कोरोना महामारी च्या कठीण परिस्थितीत अत्यंत उपयुक्त साबित होत आहेत
दररोज लाखो नागरिक घेत आहेत महसूलच्या ऑनलाईन सेवांचा लाभ .
महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधा साठी लॉगीन मह्भूमी पोर्टल करा https://mahabhumi.gov.in/
आपला
रामदास जगताप
Comments