ऑनलाईन फेरफार निर्गती मध्ये नाशिक विभाग अग्रेसर - अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक १० लाख फेरफार नोंदी
ऑनलाईन फेरफार निर्गती मध्ये नाशिक विभाग अग्रेसर
सन २०१५-१६ पासून सुरु झालेल्या ई फेरफार प्रकल्पामध्ये आज अखेर संपूर्ण राज्यात सुमारे १ कोटी १४ लक्ष 68 हजार ऑनलाईन फेरफार नोंदविण्यात आले असून त्यापैकी १ कोटी १० लक्ष १० हजार फेरफार निर्गत झाले असून सुमारे ४ लक्ष ५८ हजार फेरफार प्रलंबित आहेत त्यापैकी १९६२४ फेरफार विवाद ग्रस्त असून त्यांची सुनावणी प्रक्रिया सुरु आहे तर उर्वरित फेरफार नोटीस काढणे नोटीस बजावणे, हरकत आली असल्यास नोंदविणे , हरकत आली नसल्यास नोटीस बजावल्याची तारीख पाहून फेरफार निर्गत करणे या प्रक्रियेत आहेत . ऑनलाईन फेरफार निर्गातीच्या आधारे राज्यातील सर्व जिल्ह्यांचे गुणांकन करून त्यांचे देखील रांकिंग लावले जाते माहे फेब्रुवारी अखेर राज्यातील पहिल्या पाच जिल्हाय्न्च्या यादीत नाशिक महसूल विभागातील सर्व पाच जिल्हे आहेत. प्रथमं स्थानी नंदुरबार , द्वितीय स्थानी अहमदनगर, तृतीय स्थानी जळगाव , चतुर्थ स्थानी धुळे व पाचव्या स्थानावर नाशिक हे जिल्हे आहेत .
सर्वाधिक प्रमाणात फेरफार प्रलंबित राहणाऱ्या जिल्ह्यांमध्ये परभणी , ठाणे , सिंधुदुर्ग , लातूर व पालघर या जिल्ह्यांचे समावेश असून या जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व तलाठी मंडळ अधिकारी यांनी या जिल्ह्यात विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे जाणवते.
पुणे विभागातील पुणे जिल्हा बाराव्या स्थानावर असून तेराव्या स्थानी सोलापूर आणि १४ व्या स्थानी सांगली जिल्ह्यांचा समावेश आहे .
१० लाख नोंदींचा टप्पा पार करणारा पहिला जिल्हा म्हणुन अहमदनगर जिल्ह्य मधील सर्व तलाठी मंडळ अधिकारी आणि सर्व महसूल अधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन 🚩🚩🎂🚩💐💐 🙏🏻
अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त नोंदी असूनही प्रलंबितता अतिशय कमी आहे हे विशेष उल्लेखनीय आहे.
त्याबद्दल सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांचे अभिनंदन
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त , उप आयुक्त महसूल , सर्व जिल्हाधिकारी , डी डी ई , प्रांत अधिकारी , तहसीलदार , नायब तहसीलदार व सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन
आपला
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा समन्वयक ई-फेरफार प्रकल्प
दिनांक १ मार्च, २०२१
Comments