ई पीक पाहणीचा डेटा व copy केलेला पीक पेरा डेटा ( गाव नमुना १२ ) डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा
नमस्कार मित्रांनो ,
ई पीक पाहणीचा डेटा व copy केलेला पीक पेरा डेटा ( गाव नमुना १२ ) डिजिटल
स्वाक्षरीत करण्याची सुविधा
२०२० हंगामासाठी पीक पेरा भरण्यासाठी मागील वर्षाचा पीक पेरा copy करण्यासाठी ocu backlog मधून सोय दिली होती / आहे त्यानंतर असे ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत केल्या शिवाय त्या पीक पहानीसह द्यावत डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ सामान्य जनतेला उपलब्ध होत नव्हता त्यासाठी DSD MODULE मध्ये copy केलेला पीक पेरा कायम केल्या नंतर तसेच ई पीक पाहणी या मोबाईल AAP द्वारे पाठविलेला आणि तलाठी यांनी मिडल वेअर मधून कायम केलेला पीक पेरा (गाव नमुना नं. १२ )डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी DSD मध्ये ई पीक पाहणी मधून प्राप्त पीक पेरा आणि copy केलेला पीक पेरा डिजिटल स्वाक्षरीत करणे ही नवीन सुविधा आज पासून उपलब्ध करून दिली असल्याने सर्व तलाठी यांनी ocu backlog वापरलेल्या ७/१२ साठी ही सुविधा वापरून सर्व नमुना १२ डिजिटल स्वाक्षरीत करून घ्यावेत ही विनंती
सोबत त्याचे user manual सोबत जोडले आहे
आपला
रामदास जगताप
दि ८.१२. २०२०
Comments