फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा - मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे -०१
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
दूरध्वनी क्र. ०२०-२६१३७११० Email ID : dlrmah.mah@nic.in
Website: https://mahabhumi.gov.in
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्र.रा.भू.अ.आ.का.४/ डिजिटल स्वक्षरीत फेरफार/
मा.सु./ १८६ /२०२० दिनांक : १९.११.२०२०
प्रति ,
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.
(सर्व)
विषय –
ई फेरफार प्रणालीतून निर्गत झालेले फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करणे बाबत
संदर्भ – शासन निर्णय क्रमांक.
राभूअ /प्र.क्र. ३४/ ल-१ दि. ३१.१.२०१९
ई-फेरफार प्रणालीमध्ये ऑनलाईन फेरफार घेवून निर्गत करण्याची सुरुवात राज्यभरात सन २०१५-१६ पासून झाली आहे व आज अखेर सुमारे एक कोटी पेक्षा जास्त फेरफार ऑनलाईन पद्धतीने निर्गत करण्यात आले असून संदर्भीय शासन निर्णयान्वये डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, खाते उतारे आणि फेरफार उतारे सामान्य जनतेला ऑनलाईन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्याप्रमाणे डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ आणि ८ अ जनतेला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जात आहेत ताठापे डिजिटल स्वाक्षरीत फेरफार देखील सामान्य नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ई फेरफार प्रकल्पा अंतर्गत फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची बाब विचाराधिन होती.
आज दिनांक १९.११.२०२० पासून राज्यातील सर्व तलाठी यांना DSD प्रणाली अंतर्गत यापूर्वी प्रमाणित/ निर्गत केलेले फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या बाबतचे user manual सोबत जोडले आहे. या सुविधेतून निर्गत फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करताना खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
१.
ई फेरफार प्रणालीतून निर्गत झालेले सर्व फेरफार तलाठी यांचे लॉगीनने DSD module च्या नियमित लिंकवरून डिजिटल स्वाक्षरीत करण्यापूर्वी तो फेरफार ओपन करून त्यातील सर्व तपशील योग्य ब बरोबर असल्याचे तसेच मंडळ अधिकारी यांचा फेरफार निर्गतीचा शेरा नमूद असल्याची खात्री करावी.
२.
ज्या फेरफार मधील तपशील अपूर्ण / चुकीचा असेल किंवा मंडळ अधिकारी शेरा नमूद नसेल असे फेरफार रजिस्टर तहसीलदार यांचे कलम १५५ च्या आदेशाने परिपूर्ण करूनच असे फेरफार डिजिटल स्वाक्षरीत करण्यात यावेत.
३.
कोणताही फेरफार डिजिटल स्वाक्षरीत केल्या नंतर तो या लिंक वरून योग्यरीत्या डिजिटल स्वाक्षरीत झाला असल्याची खात्री करावी.
1. URL for Digital Signing of
Ferfar Register is
: mahafer.enlightcloud.com/
2. URL for Viewing Digitally
Signed Ferfar Register is : mahafernas.enlightcloud.com/
Work Flow Document for Digtal Signing of Ferfar Register
गाव नमुना ६ डिजिटल
स्वाक्षरीत करणे बाबतचा डॅशबोर्ड
Village Selection
Option for Digital Signing of Ferfar Register
Select Mutation Number for Vewing Ferfar Register that is to be Digital Signed
Ferfar Register can be viewed by clicking on गाव नमुना सहा
View the Ferfar Register
Confirm the viewed Ferfar Register for Digital Signing
Additionally if one feel to view the 7/12 related to this Ferfar, one can do so by clicking on View 7/12 as shown below
Finally after viewing Ferfar Register, 7/12 (optional) and Confirmation, One can click on Sign Option to digitally sign the Ferfar Register
The entire technical work of selection of Ferfar Number, Showing the Ferfar Register on Screen, Taking input for Confirmation and Signing of data will be completed in about one minute.
The Posting of Digitally Signed Ferfar Regisyter data to Mahabhumi Server will be done by the
system in batch mode automatically so that users can only concentrate on
Signing of Ferfar Register.
वरील प्रमाणे कार्य पद्धतीचा वापर करून आपल्या निर्गत ई फेरफार डिजिटल स्वाक्षरीत कार्याचे काम तात्काळ सुरु करण्याचे निर्देश देण्यात यावेत. हे काम पूर्ण होताच सर्व डिजिटल स्वाक्षरीत फेरफार जनतेला महाभूमी पोर्टल वरून ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होतील. मा. महसूल मंत्री महोदयांच्या हस्ते डिजिटल स्वाक्षरीत फेरफार नोंदवही राज्यातील सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा विभागाचा मनोदय आहे तरी आपण आपले जिल्ह्याचे हे काम अत्यंत काळजीपूर्वक व नियोजनपूर्वक पूर्ण करून घ्यावे ही विनंती.
सदरची मार्गदर्शक सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणावी ही विनंती
आपला विश्वासू
(रामदास जगताप )
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे
प्रत ,
मा. उप आयुक्त (महसूल) विभागीय आयुक्त, (सर्व) यांना महितीसाठी
उप विभागीय अधिकारी (सर्व) / तहसीलदार (सर्व)
Comments