रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आत्ता राज्यातील तेवीस बँकांना मिळतात ऑनलाईन डिजिटल ७/१२,८अ आणि फेरफार उतारे

 

आत्ता राज्यातील  तेवीस बँकांना मिळतात  ऑनलाईन  डिजिटल  /१२८अ आणि फेरफार उतारे

 

                 राज्याच्या महसूल विभागाने राज्यातील सर्व जमिनींचे अधिकार अभिलेख मोठ्या प्रयत्नाने संगणकीकृत केल्याने सामान्य जनतेला त्याची उपलब्धता सुलभ होवू लागली आहे. शेतीप्रधान राज्यात खरी रियल इस्टेट समजली जाणाऱ्या सर्व शेत जमीन व बिनशेती जागांचे अधिकार अभिलेख अर्थात ७/१२ उतारे संगणकीकृत करण्यासाठी राज्याचा महसूल विभाग अनेक दिवस प्रयत्न करत आहे त्यासाठी महसूल विभागातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांचेसह सर्व महसूल अधिकारी यांनी दिवसरात्र काम करून ७/१२ मध्ये ९८  % अचूकता आणून राज्यातील  २ कोटी ५३  लाख ७/१२ पैकी २ कोटी ५० लाख ६० हजार  सातबारे डिजिटल स्वाक्षरीत केले आहेत.  त्यामुळे त्यांची ऑनलाईन उलब्धता आत्ता सामान्य जनतेला होवू लागली आहे. त्यामुळे कोरोना माहामारीच्या काळात देखील लाखो खातेदारांनी ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डाऊनलोड केले आहेत.

 

                 आता हे संगणकीकृत अभिलेख सर्व बँका व वित्तीय संस्थांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे त्यासाठी बँकेला जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, पुणे यांचेशी सामंजस्य करार करावा लागेल व प्रत्येक नकले साठी निश्चित करून दिलेली नक्कल फी भरावी लागेल. यासाठी जमाबंदी आयुक कार्यालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC), पुणे यांचे मदतीने बँकिंग पोर्टल (https://g2b.mahabhumi.gov.in विकसित केले असून त्याद्वारे राज्यातील कोणत्याही गावचे डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ ,खाते उतारे व ऑनलाईनला नोंदविण्यात आलेले फेरफार बँक अथवा वित्तीय संस्थांना प्रत्येकी १५ रु. नक्कल फी भरून ऑनलाईन उपलब्ध होत आहेत. या मुळे कोणत्याही कर्जदार खातेदाराचे अद्ययावत व अचूक डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख बँकांना तात्काळ उपलब्ध होणार असलेने कर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद अचूक व पारदर्शी होण्यास निश्चित मदत होत आहे. या पोर्टल ची सेवा मिळण्यासाठी आज अखेर खालील २२   बँकांनी सामंजस्य करार केले आहेत .

 

.       महाराष्ट्र ग्रामीण बँक

.       बँक ऑफ महाराष्ट्र

.       सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ,

.       पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

.       गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

.       रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

.       विदर्भ कोंकण ग्रामीण बँक

.       कोटक महिंद्रा बँक

.       एच.डी.एफ.सी.बँक

१०.   आय.सी.आय..आय.बँक

११.      स्टेट बँक ऑफ इंडिया

१२.      बँक ऑफ इंडिया

१३.      पंजाब नाशनल  बँक

१४.      पंजाब अंड सिंध बँक

१५.     जनता सहकारी बँक सातारा

१६.    आय. डी.बी. आय. बँक

१७.     सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

१८.     धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

१९.     लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

२०.    औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

२१.     अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

२२.     बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

२३.     परभणी  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

 

 

 

 

     या पैकी महाराष्ट्र ग्रामीण बँक व बँक ऑफ महाराष्ट्र सारख्या बँका यासुविधा अत्यंत प्रभावीपणे वापरत आहे. लॉकडाऊन या कालावधीत सुमारे पाच लक्ष  अधिकार अभिलेख विनासायास बँकांनी ऑनलाईन उपलब्ध करून घेतले  आहेत.

        असे असलेतरी तलाठी यांनी त्यांचे स्वाक्षरीने वितरीत केलेले ७/१२, खाते उतारे व फेरफार नोंदी च्या नकला सर्व कायदेशीर व शासकीय कामासाठी ग्राह्य राहणार आहेत त्यामुळे ज्या बँकांनी अद्याप सामंजस्य करार केले नाहीत त्यांना तलाठी कार्यालयातून देखील रुपये १५ प्रमाणे नक्कल फी भरून  तसेच  महाभूमी पोर्टल वरून (https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR)देखील डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ प्रत्येकी १५ रुपये प्रमाणे नक्कल फी ऑनलाईन भरून ऑनलाईन ७/१२ उपलब्ध होत आहेत. तलाठी स्वाक्षरीत ७/१२ सोबतच सर्व डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ देखील सर्व कायदेशीर व शासकीय तसेच बँक कामासाठी ग्राह्य समजन्यात यावेत. 

 

          बँकिंग सेवेसाठी हे वेब पोर्टल या पुढे अधिक परिणामकारकरित्या वापरल्यास कर्जदार शेतकरी व बँकांना वरदान ठरेल यात शंका वाटत नाही.

 

 

श्री, रामदास जगताप

राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प

जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे

दिनांक २९.१०.२०२०

Comments

Archive

Contact Form

Send