लागवडीलायक क्षेत्रात रुपांतर करावयाच्या आदेशासाठी पोट खराब वर्ग अ क्षेत्र असलेल्या स.नं. ची गाव निहाय यादी
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ) , पुणे
दूसरा व तिसरा मजला , नवीन प्रशासकीय इमारत , विधान भवन समोर , कॅम्प , पुणे 1
दूरध्वनी क्र. ०२०-२६१३७११० Email ID :statecordinatormahaferfar@gmail.com
dlrmah.mah@nic.in Web site :https://mahabhumi.gov.in
----------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू.4/मा.सु. क्र. १८३ / २०२० दिनांक : २६.१०.२०२०
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व)
विषय- पोट खराब वर्ग-अ मधील क्षेत्र जमीनधारकाने लागवडीखाली आणले असता त्याचे लागवडीलायक
क्षेत्रात
रुपांतर करावयाच्या आदेशासाठी पोट खराब वर्ग अ क्षेत्र असलेल्या स.नं. ची गाव
निहाय
यादी
ची उपलब्धता
संदर्भ- या कार्यालयाचे परिपत्रक क्र. भूमापन-३/ विनोक्र.२७३/ २०१९ दिनानक १९.८.२०१९
कोणत्याही जमीन धारकाने त्याचे मालकी हक्काचे
पोट खराब वर्ग अ चे क्षेत्र लागवडीखाली आणले असल्यास त्याचे रुपांतर लगडीयोग्य
क्षेत्रात करून त्यास आकारणी करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या
वापरावरील निर्बंध) (सुधारणा ) नियम २०१८ अन्वये करण्यात आली आहे . त्याबाबतच्या मार्गदर्शक
सूचना या कार्यालयाच्या संर्भीय दिनांक १९.८.२०१९ चा परिपत्रकान्वये देयात आल्या
आहेत.
याप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी सुलभ व्हावे व
प्रत्येक गावात सर्व क्षेत्राचे कामकाज एकाच आदेशाने करणे शक्य व्हावे या साठी गाव
निहाय पोट खराब क्षेत्र वर्ग अ नमूद असलेल्या स. नं. ची यादी ई फेरफार प्रणालीच्या
डेटाबेस मधून उपलब्ध करून देण्याची विनंती क्षेत्रीय स्थारावरून करणेत आली होती
त्यास अनुसरून कळवीणेत येते की या परिपत्रकातील परिशिष्ट अ प्रमाणे आवश्यक अशी
यादी सर्व तलाठी यांचे लॉगीन ला अभिलेख वितरण प्रणाली (DDM) मध्ये नियमित लिंकवरून
आजपासून उपलब्ध करून दिली आहे.
अभिलेख वितरण प्रणालीतून उपलब्ध होणाऱ्या या स.नं.
निहाय यादी मध्ये कोणत्याही गावातील पोट खराब वर्ग अ क्षेत्र असलेले सर्वे नंबरच
फक्त या यादीतून उपलब्ध करून देण्यात आले आहेत . जर असे पोट खराब वर्ग अ चे
क्षेत्र (लागवडी लायक मध्ये रुपांतरास पात्र
क्षेत्र) नमूद असलेल्या स.नं. मध्येच पोट खराब वर्ग ब चे क्षेत्र येत असेल तर ( हे
क्षेत्र रुपांतरास अपात्र आहे ) ते या यादीत दिसून येईल. त्याप्रमाणे तलाठी यांनी
क्षेत्र भेटीद्वारे खात्री करून हे पोट खरब वर्ग अ चे क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात रुपांतर करण्यास पात्र
असल्यास तसे स्पष्ट नमूद करून पात्र अपात्र स.नं. ची यादी तलाठी यांनी तयार करावी.
तदनंतर या यादी प्रमाणे सर्व क्षेत्र
लागवडीलायक क्षेत्रात रुपांतरीत झाले आहे का? ह्याची खात्री तलाठी करतील आणि सदरची यादी EXCEL
मध्ये डाऊनलोड करून या बाबतच्या अन्य अहवाल तयार करण्यासाठी होईल त्यामुळे ही
प्रक्रिया आणखी सुलभ , गतीने व अचूक रीत्या पूर्ण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा
आहे.
सदरच्या सूचना सर्व तलाठी , मंडळ अधिकारी व सर्व तहसीलदार यांचे
निदर्शनास आणावी . ही विनंती .
आपला
विश्वासू
(रामदास
जगताप)
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
प्रत , मा. उप आयुक्त महसूल , विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व) यांना
माहितीसाठी.A
मा.सर,
ReplyDeleteनमस्कार ,
DDM वर उपलब्ध पोट खराब वर्ग अ यादीत क्रमांक 4 वर लागवडीलायक क्षेत्र ज्या गटात एकापेक्षा जास्त खातेदार आहेत त्या गटाचे क्षेत्र चुकीचे ( ज्यादा वाढलेले ) दाखविण्यात आलेले आहे.कृपया योग्य ती दुरुस्ती करण्यात यावी ही विनंती.