रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

मोबाईल नंबर व ओटीपी च्या आधारे मिळणार डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ व खाते उतारा

 

मोबाईल नंबर व ओटीपी च्या आधारे मिळणार डिजिटल स्वाक्षरीत

 ७/१२ व खाते उतारा


 

अभिनंदन मित्रांनो ,

           आज महात्मा गांधी जयंती च्या मुहूर्तावर दिनांक २.१०.२०२०  पासून  राज्याच्या महसूल विभागच्या ई फेरफार प्रकल्प च्या वतीने सामान्य खातेदार व नागरिकांसाठी महाभूमी पोर्टलवर मोबाईल नंबर व ओटीपी च्या द्वारे डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ व खाते उतारा उपलब्ध करून देनेत येत आहे.

            राज्यातील ९९ % सातबारा व खाते उतारे डिजिटल स्वाक्षरीत करणेत आले असून ते जनतेला सुलभरित्या उपलब्ध व्हावेत या साठी सोयीसुविधा देण्याच्या मा. बाळासाहेब थोरात महसूल मंत्री यांचे निर्देशाप्रमाणे राज्याच्या महसूल विभागाने महाभूमी पोर्टल द्वारे खातेदारांना डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ व खाते उतारे उपलब्ध करून दिले आहेत त्यासाठी प्रत्येक नागरिकाला महाभूमी पोर्टलवर आपली नोंदणी करावी लागत होती त्यासाठी आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, PAN कार्ड नंबर ई मेल आयडी इत्यादी माहिती नमूद करून नोंदणी करावी लागत होती.  अशा नोंदणी केलेल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा लॉगीन आयडी व पासवर्ड लक्षात ठेवावा लागत होता किंवा लिहून ठेवावा लागत होता तो विसरल्यास तो परत मिळवण्यासाठी वेळ जात होता या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी ई फेरफार प्रणालीच्या महाभूमी पोर्टलवर मोबाईल नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगीन सुविधा राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांनी विकसित केली असून आत्ता डिजिटल स्वाक्षरीत सातबारा आणि खाते उतारे प्रत्येकी १५ रुपये नक्कल फी ATM कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बँकिंग, IMPS किंवा भीम आपं  द्वारे ऑनलाईन भरून तात्काळ उपलब्ध होवू शकणार आहे. आज अखेर महाभूमी पोर्टल वर २ लाख ५६ हजार नोंदणीकृत वापरकर्ते असून त्यांना त्यांचे जुने खाते वापरून देखील ही सेवा वापरता येईल आणि तात्काळ ७/१२ , ८ अ हवा असल्यास नोंदणी न करता देखील महाभूमी पोर्टलवर  मोबाईल नंबर नमूद करून लॉगीन करता येईल त्याचे पडताळणी साठी या मोबाईल नंबर वर प्राप्त होणारा OTP वापरून तात्काळ ७/१२ व ८अ उपलब्ध होवू शकेल. आपल्या मोबाईल नंबर वरून तयार होणाऱ्या खात्यात भरलेली परंतु न वापरलेली शिल्लक  रक्कम  त्याच खात्यावर पूर्वीप्रमाणेच शिल्लक राहील आणि ती आपल्याला दुसऱ्या वेळेस वापरता येईल . थोडक्यात यापुध्ये मोबाईल नंबर वरच आपले खाते तयार होईल त्याद्वारे आपल्याला महाभूमी पोर्टलच्या सर्व सुविधा वापरता येतील . या नव्या सुविधेमुळे डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ व खाते उतारे  मिळविणे अधिक सोपे व जलद होईल .

FOR DIGITALLY SIGNED  7/12 AND 8A LOGIN TO -  

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR 

        आज अखेर महाभूमी पोर्टल वरून २३ लक्ष डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ आणि १ लक्ष ४० हजार डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारे नागरिकांनी डाऊनलोड केले असून त्यातून शासनाला ३कोटी ६५ लक्ष रुपये महसूल नक्कल फी स्वरूपात मिळाला आहे.

                     ओटीपी बेस लॉगीन या नवीन सुविधे मुळे महाभूमी पोर्टल वरून डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ आणि खाते उतारे डाऊनलोड करणे आणखी सुलभ आणि गतीने होईल.

 

रामदास जगताप

उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक

ई फेरफार प्रकल्प,

जमाबंदी आयुक्त कार्यालय (महाराष्ट्र ) ,पुणे

दिनांक २.१०.२०२०

Comments

  1. साहेब एकदम सोपं केलं आहे आपण सर्व सामान्य लोकांचे काम खूप आभार💐👌👍

    ReplyDelete
  2. खूप चांगला उपक्रम

    ReplyDelete
  3. आदरणीय थोरात साहेब आणि महसूल विभागामार्फत दिल्या जाणार असलेल्या या उपक्रमाचे आम्ही शेतकरी वर्ग स्वागत करतो.
    व आदरणीय थोरात साहेब आणि महसूल विभागाचे आभार मानतो.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send