दिनांक – २६ .९.२०२० पासून दूर होणाऱ्या अडचणी आणि नवीन सुविधा
दिनांक – २६.९.२०२० पासून दूर होणाऱ्या अडचणी आणि नवीन सुविधा
१.
बिनशेती आदेश फेरफार
पूर्वावलोकन मध्ये ७/१२ वरील हे.आर.चौ.मी. मध्ये दिसणारे एकक आत्ता आर. चौ. मी
मध्ये दिसेल
२.
कलम १५५ च्या आदेशाने
फेरफार शेरा दुरुस्त करणे आणि इतर हक्कातील फेरफार प्रकार दुरुस्त करणे मधील काम
करताना योग्य मेसेज दिले आहेत.
३.
आदेशाने ७/१२ बंद करणे
आणि आदेश व दस्त ऐवज मधून ७/१२ बंद करणे या पर्यायातून ७/१२ बंद करताना चालू
नावांना कंस न करता आहे त्या स्थितीत ७/१२
बंद करणेत येईल.
४.
आदेशाने बंद ७/१२ सुरु
करणे या पर्यायामधून आत्ता एकाच आदेशाने एकाच फेरफारातून अनेक बंद ७/१२ सुरु करता येतील.
५.
अहवाल १ मधील कोणताही
७/१२ आता जुना ७/१२ बंद करून नवीन पोट हिस्सा तयार करणे मधून बंद करता येणार नाही.
६. कोणत्याही ७/१२ वर अयोग्य भूधारणा असल्यास (वर्ग १, वर्ग २, सरकार व सरकारी पट्टेदार वगळून) बिनशेती आदेश, आदेशाने ७/१२ बंद करणे, आदेशाने भूधारणा बदलणे, आदेशाने स.नं. बदलणे व आदेशाने बंद ७/१२ सुरु करणे या पाच ही फेरफार प्रकारा मधून या सर्वे वर काम करता येणार नाही.
७. तहसीलदार यांनी दुरुस्ती साठी राखीव ठेवलेल्या ७/१२ वर आता एकक दुरुस्तीचा फेरफार घेता येईल.
८. एडीट व री एडीट फेरफार चा गाव निहाय अहवाल देण्यात आला आहे.
९. चूक दुरुस्ती , खाता दुरुस्ती आणि मंडळ अधिकारी चूक दुरुस्ती या तीनही फेरफार प्रकारासाठी स.नं. निहाय अहवाल देनेत आला आहे
१०. भूधारणा भोगवटादार वर्ग १, वर्ग २, सरकार व सरकारी पट्टेदार या योग्य भूधारणा वगळून अन्य भूधारणा असलेल्या स.नं. चा गाव निहाय अहवाल तलाठी लॉगीन ला दिला आहे.
११. अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र किंवा हक्कसोड पत्र फेरफार प्रकारामध्ये त्या ७/१२ वर अन्य फेरफार घेता येत नव्हता आता या अन्य फेरफार घेता येईल.
१२. भाडेपट्टा हा नवीन फेरफार प्रकार विकसित करून त्याचा अंमल ७/१२ चे इतर हक्कात घेण्यात येतो.
१३. आत्ता एक वारस नोंद प्रलंबित असताना देखील त्याच खात्यावर अन्य वारस नोंद घेता येईल.
या सर्व नवीन सुविधा टेस्ट सर्वर वर उपलब्ध
असून त्याचे टेस्टिंग / UAT अहवाल प्राप्त होताच सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून
दिल्या जातील ह्याची नोंद घ्यावी
रामदास जगताप
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प पुणे
Thanks sir
ReplyDeletePlease include whether particular s.no./gut no.is under tukadebandi law or not...
ReplyDelete