रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ मुळे करोना विषाणू संसर्ग धोका टाळण्यासाठी तलाठी कार्यालयात न जाता मिळतो ७/१२ - ई फेरफार प्रकल्पाचे यश



नमस्कार मित्रांनो ,

                डिजिटल स्वाक्षरीत ७/१२  मुळे करोना विषाणू संसर्ग धोका टाळण्यासाठी तलाठी कार्यालयात न जाता मिळतो ७/१२ - ई फेरफार प्रकल्पाचे यश 

 करोना विषाणू  प्रसारप्रतिबंधात्मक उपाय योजना करत असताना देखील  ई फेरफार प्रणालीवर ७५०० तलाठी मंडळ अधिकारी ऑनलाईन - वर्क फ्रॉम होम चा तलाठी मंडळ अधिकारी करतात योग्य वापर  

                                  मित्रांनो , जगभर करोना विषाणूने थैमान घातले असताना देखील व करोना विषाणू  प्रसारप्रतिबंधात्मक उपाय योजना करत असताना देखील  ई फेरफार प्रणालीवर ७५०० तलाठी मंडळ अधिकारी ऑनलाईन काम करत आहेत , शासनाच्या  वर्क फ्रॉम होम बाबतच्या सूचनांची व सामान्य जनतेच्या तातडीच्या कामासाठी नेहमी प्रमाणे या आठवड्यात देखील १२५०० तलाठी मंडळ अधिकारी यांचे पैकी ७५०० ते ८००० तलाठी मंडळ अधिकारी ७/१२ संगणकीकरणाचे म्हणजेच ई फेरफार प्रणालीचे ऑनलाईन कामकाज करत असल्याचे दिसून आले आहे . वर्क फ्रॉम होम  साठी व सामान्य जनतेला तातडीच्या व अति तातडीच्या कामासाठी  ई फेरफार प्रणाली  व डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ अत्यंत उपयुक्त ठरत असलेचे दिसून येत आहे . गेले  तीन चार वाशापासून राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी यांनी रात्रीचा दिवस करून अत्यंत किचकट असे हे काम पूर्णत्वास आणले असल्यामुळे हे शक्य झाले आहे . त्यामुळे सामान्य नागरिक तलाठी मंडळ अधिकारी व महसूल विभागाला धन्यवाद देत आहे .

                     डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ तलाठी कार्यालयात न जाता तातडीच्या कामासाठी उपलब्ध होत असलेने त्याचा ही फायदा सामान्य खातेदार व व्यावसायिक वापरकर्ते यांना  होत असलेचे दिसून येते . गेले आठ दिवसात दररोज सुमारे ७००० ते ८००० डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ महाभूमी पोर्टल वरून(https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in//DSLR/Satbara/LiveSatBara/ )  ऑनलाईन पेमेंट करून डाऊनलोड होत असलेचे दिसून येते. कोरोना विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी  खातेदार व तलाठी मंडळ अधिकारी यांचा प्रत्यक्ष संपर्क न येता देखील सामान्य जनतेला डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ उपलब्ध होत आहेत ही मोठी समाधानाची बाब आहे.



           करोना  विषाणुने थैमान घातले आहेत, तरी देखील शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची  संख्या दिसुन येते ,तलाठी कार्यालयात सुध्दा विविध भागातुन नागरिक/खातेदार सात बारा घेण्यासाठी येत असतात सध्याची परिस्थिती पहाता खातेदारांना त्रास होऊ नये यासाठी नागरिकांनी ऑनलाईन सात बारा काढावीत असे आमचा मानस आहे.

     

    तरी सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी घरात बसुन रहावे,आवश्यक त्या कामासाठी महसुल विभागाच्या ऑनलाईन सुविधेचा वापर करावा.


घराबाहेर पडु नका, आपल्या आरोग्याची काळजी घ्या.



रामदास जगताप
राज्य समन्वयक
दि २०.३.२०२० 

Comments

Archive

Contact Form

Send