पंतप्रधान यांनी घोषित केला २१ दिवसांचा देशव्यापी बंद - लॉकडाऊन करोना - कोई - रोड पर -ना निकले
नमस्कार मित्रांनो ,
करोना - कोई - रोड पर -ना निकले पंतप्रधान यांनी घोषित केला २१ दिवसांचा देशव्यापी बंद - लॉकडाऊन त्यातच गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ......
मित्रांनो , आपण गेल्या काही दिवसांपासून ज्या महामारीने भयभीत झालो आहोत त्या करोना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी प्रयत्न करत आहोत त्याबाबत मा. प्रधान मंत्री महोदयांनी आपल्या सर्व देशवासियांना आहे त्या ठिकाणी राहण्याचे आदेश दिले आहेत व आज रात्री १२.०० वा पासून २१ दिवसांचा देशव्यापी बंद - लॉकडाऊन घोषित केला आहे . त्यामुळे आपण आपले सर्व प्रथम कर्तव्य म्हणजे आहे त्या ठिकाणी राहणे व प्रवास आणि संसर्ग टाळणे.
आपण गेले तीन चार वर्ष्ये आपल्या ई फेरफार प्रकल्पासाठी रात्रीचा दिवस करून काम केले , आपल्या सर्वांच्या अडचणी सुटाव्यात , त्यात आपल्याला मदत व्हावी , मार्गदर्शन व्हावे म्हणून मी सन २०१७ चा महसूल दिन म्हणजेच १ ऑगस्ट , २०१७ पासून हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली . दिवसभर कार्यालयीन कामकाज केल्या नंतर रात्री आपल्या सोबत जागरण करून मी सर्व तलाठी मदल अधिकारी बांधवांसाठी योग्य अचूक व आवश्यक माहिती पोहोचविण्यासाठी हा ब्लॉग लिहित होतो . मी या प्रकल्पात राज्य समन्वयक म्हणून १० जानेवारी २०१७ रोजी रुजू झाल्या नंतर सर्वप्रथम प्रशिक्षणाला सुरुवात केली राज्यातील सहाही विभागात विभागीय कार्यशाळा व त्यानंतर जिल्हा निहाय प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्यानंतर आपल्या सर्वांना अजून नाव नवीन गोष्टी समजण्यासाठी अधिकृत ठिकाण किंवा ऑनलाईन सुविधा असावी या उद्देशाने हा ब्लॉग सुरु केला . त्याचा चांगला फायदाही आपल्या पैकी अनेकांना झाला असेल कारण माझ्या ब्लॉगवर मी आज पर्यंत सुमारे ७५० मार्गदर्शक सूचना / महत्वाचे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे व या ब्लॉग चा वापर ४ लाख पेक्षा जास्त अभ्यागतांनी केला या वरूनच ह्याची उपयुक्तता दिसून येते. परंतु या ब्लॉगवर ई फेरफार या आपल्या प्रकल्पाशिवाय अन्य कोणतेही लेख अथवा संदेश मी लिहित नव्हतो . मात्र आज आपली सर्वांची जी परिस्थिती करोनो विषाणू मुळे झाली आहे म्हणून मी आज हा संदेश आपल्यासाठी लिहित आहे.
महसूल विभागात काम करताना आपल्या सर्वांना एव्हडे एकाच काम नाही हे मी जाणतो तरीही आपण आपला अमूल्य वेळ देवून हा प्रकल्प अंतिम उद्दिष्टाकडे पोहचवला या बद्दल धन्यवाद . आपत्कालीन व्यवस्थान करत असताना देखील आपण आपली काळजी घ्या .
आता आपण आपल्या सोबतच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या . देशव्यापी बंद असल्याने वर्क फ्रॉम होम देखील आत्ता शक्य होईल असे वाटत नाही . आपण खूप साऱ्या गोष्टी केल्या अजून देखील खूप काही करायच्या आहेत तरीही आपल्याला चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देतो . हिंदू नव वर्षाच्या - गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेचा .
धन्यवाद !
आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
दिनांक २४.३.२०२०
Comments