रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आपला डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ कसा मिळवणार ?



नमस्कार मित्रांनो , 


                  सध्या कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जगात जे जे प्रयत्न चालले आहेत ते आपण क्षणा क्षणाला वाचतो , पाहतो व ऐकतो आहोत . आपल्या देशात देखील मा. पंतप्रधान यांचे आवाहनामुळे आपण रविवारी २२ मार्च रोजी एक दिवस जनता कर्फ्यू पाळला व त्यानंतर लगेचच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी राज्यभरात लॉकडाऊन ची घोषणा केली व राज्यभरात सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती ५% करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे सर्व  सरकारी कार्यालये बंद झाल्या सारखीच आहेत . जी कार्यालये चालू  आहेत ती आपत्ती व्यवस्थापन व वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुरु आहेत . अनेक गावात तलाठी व  मंडळ अधिकारी आणि  अन्य महसूल अधिकारी देखील हेच काम करत असल्याचे आपल्याला दिसून येईल त्यामुळे कोणत्याही खातेदाराला काही महत्वाच्या किंवा अत्यंत तातडीच्या कामासाठी ७/१२ उतारा आवश्यक असल्यास तो आपल्याला ऑनलाईन देखील मिळू शकतो व तो सर्व शासकीय व कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरला जातो  हे आपल्याला कदाचित माहित नसेल म्हणून आपले माहिती साठी ही माहिती देण्यात येत आहे .

           डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ घरबसल्या प्राप्त करून घेण्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी
आपला डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ कसा मिळवाल ?



१. महाभूमी संकेतस्थलावर जावे - https://mahabhumi.gov.in येथून मराठी किंवा इंग्लिश पर्याय निवडा व डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ व मालमत्ता पत्रक या लिंक वर क्लिक करा किंवा थेट https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/dslr हि लिंक वापरा.


२. कोणत्याही खातेदाराला या लिंकवर पहिल्यांदा नोंदणी करावी लागते त्यासाठी new user registration या लिंक वर क्लिक करून एकदा आपले खाते उघडा. हे करताना आपले नाव मधले नाव किंवा आडनाव टाकताना नावाच्या आगोदर अथवा नंतर कोठेही स्पेस देवू नये अन्यथा नोंदणी करताना special character चा एरर येईल .


३. आपले नाव पत्ता , मोबाईल नंबर ई मेल आय डी जन्मतारीख इत्यादी माहिती देवून नाव नोंदणी करता येते या वेळी दिलेले username व password  जपून लिहून ठेवावा .


३. आपले हे खाते valet system प्रमाणे चालत असलेने आपले खात्यावर गरजे प्रमाणे १०० , २०० , ३०० रुपये ऑनलाईन डिजिटल पेमेंट द्वारे भरून खाते रीचार्र्ज ( use recharge account option ) करता येते या साठी स्टेट बँकेचे पेमेंट गेटवे मधून  नेट बँकिंग, क्रेडीट कार्ड डेबिट कार्ड किंवा भीम (UPI) वापरून  पैसे भारता येतात .


https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/DSLR/Payment/EntryDetails?class=navbar-brand


४. आपल्या खात्यावरून जेव्हडे डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डाऊनलोड केले जातीत त्याचे प्रती प्रत १५ रुपये प्रमाणे पैसे खात्यावरून कमी होतील.


५. कोणताही ७/१२ डाऊनलोड करताना काहीहे तांत्रिक अडचण आल्यास पैसे कमी होवून देखील ७/१२ डाऊनलोड न झाल्यास तो ७२ तास payment history या पर्यायामध्ये   विनाशुल्क डाऊनलोड साठी उपलब्ध राहतो हे महत्वाचे आहे. या लिंक वरून जिल्हा , तालुका व गाव निवडून तसेच स.नं. निवडून कोणताही ७/१२ डाऊनलोड करता येईल.


६. आपले हे खाते वापरून आपल्याला राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील , कोणत्याही तालुक्यातील कोणत्याही गावातील कोणत्याही खातेदाराचा कोणताही डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डाऊनलोड करता येईल . आज अखेर राज्यातील २.५२ कोटी ७/१२ पैकी २.४६ कोटी ७/१२ म्हणजेच ९७.५ % ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झाले असून ते जनतेला घरी बसून आपले मोबाईलवर अथवा संगणकावर प्राप्त करून घेता येत आहेत .


७. आज अखेर डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ प्राप्त करून घेण्यासाठी १.६५  लाख नागरिकांनी नोंदणी कली असून ८.६३ लाख डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डाऊनलोड देखील झाले आहेत .


८. याच संकेत स्थळावर आपण लवकरच डिजिटल स्वाक्षरीत ८ अ - खाते उतारे व सन २०१५-१६ नंतरचे फेरफार ( ऑनलाईन फेरफार ) उपलब्ध करून देत आहोत.


९. खाते तयार करताना पासवर्ड strong असण्यासाठी त्यात ८ अंक , व त्यात एक क्यापिटल लेटर , एक स्पेशल character असावे .


१०. या खात्यावर जमा केलेली रक्कम परत केली जात नाही परंतु ती कोणत्याही अन्य अधिकार अभिलेख डाऊनलोड करण्यासाठी वापरता येईल.

माझी राज्यातील जनतेला विनंती आहे कि महसूल विभागाने सुरु केलेले व तलाठी व मंडळ अधिकारी यांचे सह सर्वच महसूल अधिकारी यांनी अगदी रात्रीचा दिवस करून हां प्रकल्प पूर्णत्वाकडे आणला आहे अशा सेवेचा आपण लाभ घ्यावा ही विनंती. आताच्या अत्यंत भयावह अशा परिस्थितीत आपण आपली सुरक्षा  सांभाळून  अत्यंत तातडीच्या कामासाठी आपला डिजिटल  स्वाक्षरीत ७/१२ आपण प्राप्त करून घेवू शकतो हे या प्रकल्पाचे यश आहे.

काही ही अडचणी किंवा सूचना असल्यास help.mahabhumi@gmail.com
वर पाठवा त्यांचे स्वागतच  असेल.


आपला



रामदास जगताप
राज्य  समन्वयक ई फेरफार प्रकल्प , पुणे 

Comments

Archive

Contact Form

Send