रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

हरभरा खरेदी साठी रब्बी २०१९-२० चे पीक पेरा असलेले डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ स्वीकारणे बाबत

नमस्कार मित्रांनो ,


विषय - हरभरा खरेदी साठी रब्बी २०१९-२० चे पीक पेरा असलेले डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ स्वीकारणे बाबत 


मी  आताच गोंदिया जिल्ह्यातील पणन मंडळाच्या संबंधित अधिकारी  यांचेशी बोललो , जर सन २०१९-२० चा पीक पेरा डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वर अद्यावत असेत तर तो DSD ते स्वीकारत आहेत मात्र जेथे पीक पेरा  DSD ७/१२ च्या प्रिंट वर हाताने भरला आहे तेथे तलाठी स्वाक्षरी मागत आहेत हे त्यांचे योग्यच आहे . आपल्याला विनंती आहे कि DSD ७/१२ वर हाताने पीक पेरा भरू नये तो ऑनलाईनच अपडेट करावा व असे  ७/१२ पीक पाहणी पाश्च्यात DSD  मधून डिजिटल स्वाक्षरीत करावेत  म्हणजे QR कोड असलेले ७/१२ वर संबंधित अधिकारी पुन्हा तलाठी यांची  स्वाक्षरी मागणार नाहीत . कृपया पीक पेरा अपडेट केल्या नंतर असे ७/१२ वरील पीक पेरा अपडेट केला आहे म्हणून घोषित करून तलाठी यांनी असे ७/१२ पीक पाहणी पाश्च्यात DSD करावेत . हे काम तातडीने पूर्ण करावे .



रामदास जगताप

राज्य समन्वयक
दि १४.३.२०२० 

Comments

Archive

Contact Form

Send