रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रशिक्षण कार्यशाळा दौरा दि. १३ ते २१ डिसेंबर २०१९

नमस्कार मित्रांनो ,

विषय - ई फेरफार प्रशिक्षण कार्यशाळा दौरा दि. १३ ते २१ डिसेंबर २०१९ 

                             नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे , जालना व अहमदनगर जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार ( ई फेरफार ) , तहसीलदार , उप विभागीय अधिकारी , डी डी ई , जिल्हा सह निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी , व अधीक्षक भूमी अभिलेख यांचे साठी ई फेरफार प्रणाली कार्यशाळा दौरा कार्यक्रम दि १३ ते २१ डिसेंबर २०१९  घेनेत आला त्या साठी माझे समवेत नागपूर विभागा साठी विभागीय  समन्वयक सौ . नाझीरकर , अमरावती विभागातील जिल्ह्यांसाठी सौ. पाटणे , जालना जिल्ह्यासाठी डॉ. गणेश देसाई आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी श्री सचिन भैसाडे यांनी भाग घेतला .

दि १३ दिसेंबर २०१९ - नागपूर , भंडारा व वर्धा जिल्हे नागपूर येथे
दि. १४ डिसेंबर २०१९ - चंद्रपूर  , गडचिरोली व गोंदिया जिल्हे नागपूर येथे
दि. १६ डिसेंबर २०१९ - यवतमाळ जिल्हा
दि. १७ डिसेंबर २०१९ - अमरावती जिल्हा  - अमरावती विभागीय आयुक्त महोदय यांचेशी चर्चा
दि. १८ डिसेंबर  २०१९ - अकोला व वाशीम जिल्हे - अकोला येथे
दि १९ डिसेंबर २०१९ - बुलढाणा जिल्हा
दि २० डिसेंबर २०१९ - जालना जिल्हा
दि २१ डिसेंबर २०१९ - अहमदनगर जिल्हा


ई-फेरफार प्रणाली जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा (एकूण 13 जिल्हे)
उपस्थिती पत्रक (गोषवारा) 
अ.क्र.  जिल्हा दिनांक  डीडीई जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसिलदार सह जिल्हा निबंधक/ दुय्यम निबंधक  नायब तहसिलदार मंडळ अधिकारी तलाठी कनिष्ठ लिपिक एकूण
नागपुर विभाग
1 नागपूर १३/१२/२०१९ ११ १४ १९ ४३ ९८
2 वर्धा १३/१२/२०१९ १० २७ ५३
3 भंडारा १३/१२/२०१९ ३०
4 चंद्रपूर १४/१२/२०१९ १२ १४ १३ ५२
5 गडचिरोली १४/१२/२०१९ २१ ५२
6 गोंदीया १४/१२/२०१९ २५ ४४
नागपुर विभाग एकूण १६ ४७ ५३ ६२ १३१ ३२९
अमरावती विभाग
7 यवतमाळ  १६/१२/२०१९ १९ ७२ २९३ ४०३
8 अमरावती   १७/१२/२०१९ ११ ६२ २६४ ३५६
9 अकोला  १८/१२/२०१९ २७ २२५ २६९
10 वाशिम  १८/१२/२०१९ १८ १३९ १७१
11 बुलडाणा  १९/१२/२०१९ १३ १३ १३ ८० ५०० ६२७
अमरावती विभाग एकूण १८ ३३ २६ ५१ २५९ १४२१ १३ १८२६
औरंगाबाद विभाग
12 जालना  २०/१२/२०१९ २४ २६६ १५ ३३५
औरंगाबाद विभाग एकूण २४ २६६ १५ ३३५
नाशिक विभाग
13 अहमदनगर २१/१२/२०१९ १७ १२ ७४ ४१३ १६ ५४८
नाशिक विभाग एकूण १७ १२ ७४ ४१३ १६ ५४८
एकूण 13 जिल्हे ४४ ९७ ५६ १२४ ४१९ २२३१ ५२ ३०३८



                 या कालावधीत दररोज रात्री १०० ते १२५ किमी प्रवास करून दररोज सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.०० वा असे प्रशिक्षण कार्यशाळा व शंकासमाधान घेवून या १३ जिल्ह्यात गुणवत्ता पूर्वक कामाचे महत्व व महसूल अधिकारी यांची जबाबदारी तसेच महसूल विभागाच्या जनतेला उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सुविधा यात
१. डिजिटल स्वाक्षरीत ७/१२
२. ई अभिलेख ,
 ३ महाभूनकाशा ,
४. ई हक्क प्रणाली
५. आपली चावडी
६. भूलेख - विनास्वाक्षरीत ७/१२ व खाते उतारा
या प्रमुख सेवांची माहिती देण्यात आली .
महाभूमी संस्थेच्या पोर्टल वर या सर्व सुविधा जनतेला उपलब्ध आहेत त्यासाठी आपल्याला  https://mahabhumi.gov.in  हे संकेस्थळ वापरून पाहता येईल .

ODC अहवाल १ ते ४१ म्हणजे काय ते कसे निरंक करायचे ? या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले .
हा माझा आत्ता पर्यंत चा सर्वात मोठा सुमारे २००० किलोमीटर चा दौरा कार्य्क्राम होता परंतु आपल्या सर्व डी डी ई व अन्य सहकारी मित्रांच्या सहकार्यामुळे मी हा अत्यंत महत्वाचा दौरा नियोजित कार्यक्रमा प्रमाणे पूर्ण करू शकलो त्यासाठी आपले सर्वांचे धन्यवाद .

या दौर्यात किमान २५०० ते ३००० महसूल कर्मचारी व अधिकारी यांचेशी मला संवाद साधता आला व आपण गेले तीन वर्षे घेत असलेल्या कष्टाचे फलित आपल्यासमोर मांडता आले ह्यात मोठे समाधान आहे .

आपला हा प्रकल्प आत्ता अंतिम टप्प्यात असताना तो गुणवत्ता पूर्वक रीत्या पूर्ण करून राज्यातील जनतेला अचूक संगणकीकृत ७/१२ व खाते उतारे उपलब्ध करून देण्यात यशस्वी होवू असा मला विश्वास आहे.

हा प्रकल्प महसूल विभागाची प्रतिमा जनमानसात निश्चित उंचाविल यात मला शंका वाटत नाही . या परिवर्तनाचे आपण सर्व साक्षीदार आहात ह्याचा आपल्याला देखील निश्चित समाधान वाटत असेल .

आपला

रामदास जगताप
दि २१.१२.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send