रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रकल्प आढावा बैठक दि.२६.११.२०१९ दु.१२.०० वा.मधील महत्वाचे निर्देश -


ई फेरफार प्रकल्प  आढावा बैठक दि.२६.११.२०१९ दु.१२.०० वा.
                         महत्वाचे निर्देश -
१. ७/१२  डिजीटल स्वाक्षरीत करणे - १.९६ कोटी काम पुर्ण ५६ लक्ष काम शिल्लक ते तात्काळ पूर्ण करणे .
२. ओडीसी अहवाल १ ते ४१ निरंक करुन घोषणापत्र ४ करणे -
उप विभागीय अधिकारी यांची जबाबदारी
   ४% पेक्षा कमी विसंगती – १५ डिसेंबर,२०१९
   ८% पेक्षा कमी विसंगती –  ३० डिसेंबर,२०१९
   १२% पेक्षा कमी विसंगती – १५ जानेवारी ,२०२०
   १२% पेक्षा  जास्त विसंगती – ३१जानेवारी,२०२०  पर्यंत सर्व गावचे अहवाल निरंक करुन घोषणापत्र-४ पुर्ण करणे
कामाची गुणवत्ता पाहून तहसिलदार उविअ यांचेसह सर्व तलाठी मंअ यांचे गोपनीय अहवालात नोंद घ्यावी.
३. ई हक्क प्रणालीतून प्राप्त अर्ज वेळेत निर्गत करणे व ई-हक्क प्रणालीचा  वापर वाढविणे
४. तलाठी मं अ यांना लॅपटॉप प्रिंटर्स चे वाटप डिसें. २०१९ अखेर पुर्ण करणे.
५. माहे नोव्हेंबर अखेर ची नक्कल फी ( डीडीएम प्रमाणे ) ५ डिसे २०१९ पर्यंत बॅंकेत जमा करणे व अंतर्गत लेखा परिक्षण पथका मार्फत लेखा परिक्षण पुर्ण करणे.
६. पोट खराब ( वर्ग अ ) चे लागवडी लायक क्षेत्रात रूपांतर करणेसाठी जिल्हाधिकारी यांचे अधिकार उविअ यांना प्रदान करणे.
७. १००% दस्त नोंदणी ऑनलाईन करणे व नियमीत प्रलंबित फेरफार आढावा SDO ने घेणे . १ महिण्याचे वर नोंदी शिल्लक राहणार नाहीत यासाठी प्रयत्न करणे
क १५५ चे दुरुस्तीचे कामाचा आढावा घेणे तहसिलदार सर्व आदेश ( परिशिष्ट क ) स्वाक्षरीत करत आहेत हे पाहणे .
८. आकारबंद प्राप्त करुन घेऊन १००% पडताळणी नायब तहसिलदार यांचे कडून करुन घेणे
९. तलाठी व मं अ स्थरावर फिफो (FIFO ) ची अम्मलबजावणी करणे, स्कीप अनुमति तहसिलदार / नायब तहसिलदार यांनी तात्काळ देणे.
१०. जिल्हा व तालुका स्थरावर सर्व अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ते प्रशिक्षण देणे . जिल्हा व तालुका हेल्प डेस्क सक्षम करणे .
११. महसूल अधिकारी यांनी स्वःताच अडचणी समजून घेऊन / दप्तरातील त्रुटी समजून घेऊन दुरुस्ती साठी क १५५ खाली आदेश पारित करणे . काही ठिकाणी आवश्यकते प्रमाणे उविअ यांनी पुनर्विलोकन आदेश देणे .

Comments

  1. सर,
    फेरफार मंजुरीसाठी सुध्दा मुदत द्यावी .म्हणजे मुदतीत फेरफार मंजूर होतील.

    ReplyDelete
  2. मा. सर कलम 155 अन्वये तलाठी यांचे कडुन दुरुस्ती करुन मान्यतेसाठी तहसिलदार यांचे लॉगील ला पाठविले जाते, पण नवीन सुविधेनुसार काही प्रकारातील फेर हे तहसिलदार यांचे युजर क्रियेशन लॉगीनला देण्यात आलेल्या डॅशबोर्ड मध्ये दिसत नाही, व त्या गावात मान्यता प्रलंबित आहे त्या गावाची निवडपण करता येत नसत्यामुळे मान्यता देता येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. क्रुपया मार्गदर्शन करावे स.

      Delete

Archive

Contact Form

Send