रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ व विनास्वाक्षरीत ७/१२ ची लिंक जिल्हा संकेस्थळावर प्रशिद्ध करणेबाबत



नमस्कार मित्रांनो ,


जिल्हा सूचना विज्ञान केंद्र अधिकारी व
उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई  ( सर्व ) यांना ,


विषय - डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ व विनास्वाक्षरीत ७/१२ ची लिंक जिल्हा संकेस्थळावर प्रशिद्ध करणेबाबत 


महोदय ,

आपणास ज्ञात आहेच कि , संगणकीकृत अधिकार अभिलेख जनतेला ऑनलाईन केंव्हाही व कोठूनही उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने DILRMP प्रकल्पा अंतर्गत संगणकीकृत केलेले अधिकार अभिलेख ( गाव नमुना नं. ७/१२ ) महाभूमी पोर्टल विकसित केले असून दि २०.०९ .२०१९ पासून राज्यातील जनतेला उपलब्ध करून दिले आहे परंतु सदरची संकेतस्थळे खातेदारांना माहिती नाहीत असे दिसून येते त्यासाठी आपणास विनंती करणेत येते की सदरच्या लिंक्स जिल्हा संकेतस्थळावर प्रसिध्द कराव्यात ही विनंती .

१. डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ - 
        राज्यातील डिजिटल स्वाक्षरीत  संगणकीकृत गाव नमुना नं. ७/१२ प्राप्त करून घेण्यासाठी 
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/DSLR ही लिंक वापरावी .

२. विनास्वाक्षारीत  ७/१२ - 
        राज्यातील विनास्वाक्षारीत   संगणकीकृत गाव नमुना नं. ७/१२ फक्त पाहण्यासाठी 
https://bhulekh.mahabhumi.gov.in/ ही लिंक वापरावी .


  तसेच  जमिनी संबंधीचे सर्व भूमी अभिलेखांच्या माहितीच्या  महत्वाच्या लिंक्स महाभूमी पोर्टल वर उपलब्ध आहेत . 
त्यासाठी https://mahabhumi.gov.in/ही लिंक आहे त्यावर डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ , मिळकत पत्रिका , महाभूनकाशा, जुने अभिलेख (   ई अभिलेख ) , ई हक्क , आपली चावडी व भूलेख अशा सर्व लिंक्स  या महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत.  


वरील तीनही लिंक्स आपल्या जिल्ह्याच्या साकेस्थळावर देण्यात याव्यात ही विनंती .



आपला

रामदास जगताप
डोई ३०.१०.२०१९


Comments

Archive

Contact Form

Send