रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

नोंदणीकृत दस्तांचे दस्त क्रमांक चुकीचे न वापरणे बाबत


नमस्कार मित्रांनो ,

विषय - नोंदणीकृत दस्तांचे दस्त क्रमांक चुकीचे न वापरणे बाबत . 


               या कार्यालयात प्राप्त अडचणीचे विस्लेषण करताना  असे लक्षात आले आहे कि नोंदणीकृत दस्तांच्या फेरफार नोंदी घेताना दस्त तलाठी लॉगीन आलेला असताना / प्रलंबित असताना काही ठिकाणी नजर चुकीने अथवा माहिती नसल्याने असे दस्तांचे फेरफार तयार करण्याऐवजी / तलाठी लॉगीनला आलेला दस्त न पाहता अनोंदणीकृत पर्यायातून चुकीचा दस्त क्रमांक टाकून फेरफार नोंद घेतली जाते . त्यामुळे असे फेरफार मंजूर करताना अथवा त्यापुढे होणारे या नोंदणीकृत दस्ताचा फेरफार घेताना नक्की अडचण येवू शकते हे लक्षात घ्यावे किंवा नोंदणीकृत दस्त क्रमांक प्रलंबित असताना अनोंदणीकृत मधून फेरफार घेतल्यास पुढे अनेक अडचणी येवू शकतात . त्यामुळे कोणत्याही योग्य कारणाशिवाय ऑनलाईन दस्त नोंदणी झालेल्या  नोंदणीकृत दस्तांचे फेरफार अनोंदनीकृत चे पर्याय मधून घेवू नयेत . ह्याची दक्षता तलाठी यांनी घ्यावी . 




  कोणत्याही फेरफार मध्ये   नोंदणीकृत दस्त क्रमांक पुन्हा नोंदणी कृत सह अन्य कोणत्याही फेरफार प्रकारातून पुन्हा कोणताही फेरफार घेण्यासाठी 
नमूद केल्यास THIS DOCUMENT ALREADY EXIST असा मेसेज येतो अश्यावेळी तलाठी यांनी नोंदणीकृत मधील प्रलंबित दस्त पाहावा . 


आपला
रामदास जगताप
दि १.११.२०१९

Comments

Archive

Contact Form

Send