रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

DSD चे कामकाज सुलभ करणे बाबत



नमस्कार मित्रांनो ,






विषय - DSD चे कामकाज सुलभ करणे बाबत 


         खातेदार यांना डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी तलाठी स्थरावर DSP चे कामकाज आपण अनेक दिवसांपासून करत आहोत परंतु त्यामध्ये काही गैरसमज तलाठी मंडळ अधिकारी संवर्गात असलेचे काही whatsapp मेसेज वरून दिसते तसेच या मध्ये ( DSP किंवा आत्ताची DSD) अशी विनंती माझ्या काही तलाठी मित्र बांधवांनी केली होती त्याबाबत आपल्याला काही बाबी स्पष्ट करण्यासाठी आज मी हे लिहित आहे . 

१. DSD चे कामकाज सुलभ करणे बाबत - 
                 या पूर्वी चे DSP किंवा आत्ताचे DSD चे काम करताना एका ७/१२ साठी ९ वेळा क्लिक करावे लागते व त्यामुळे कामाचा ताण वाढतो आणि वेळ लागतो असा feedback काही तलाठी मित्रांनी दिल्याने त्यावर NIC तें सोबत चर्चा करून नवीन DSD मधील कामकाज सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणेत आले व काल / परवा पासून असे फक्त ४ क्लिक वर काम होणारे  नवीन DSD व्हर्जन सर्वांना उपलब्ध करून दिले आहे . या मुले काम गतीने पूर्ण होण्यास निश्चित मदत होईल असा विस्वास आहे . 

२. DSP केलेलं ७/१२ पुन्हा DSD करणे -
               या पूर्वी आपण DSP म्हणजेच DIGITALLY SIGNED PDF करत होतो  मात्र त्यामुळे तयार होणाऱ्या ७/१२ ची साईज सुमारे १८० ते २०० के बी होत होती त्यामुळे स्टोरेज व सर्वर वर ताण येवून सर्वर स्पीड स्लो होत होते म्हणून आपण गेल्या वर्षी ऑक्टो पासून नवीन data sign version उपलब्ध करून दिले आहे व त्यानुसार सुमारे १ कोटी ४१ लाख ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झाले आहेत तथापे या पूर्वीच्या DSP व्हर्जन मध्ये तयार केलेले ३५ लाख ७/१२ हे २८ मी २०१८ पूर्वीचे होते त्यामध्ये गेल्या वर्षीच्या खरीप , रब्बी , उन्हाळी व संपूर्ण वर्ष अशा ४ हंगामात झालेल्या पिकांच्या नोंदी मध्ये नमुना १२ मध्ये झालेले बदल व गेल्या वर्षभरात झालेले फेरफार मुळे नमुना ७ मध्ये झालेले बदल या DSP झालेले ७/१२ वर दिसून येणार नाहीत व ते ७/१२ पेमेंट गेटवे वापरून खातेदारांना उपलब्ध करून देणे योग्य व कायदेशीर होणार नसलेले असे सर्व ३५ लाख ७/१२ पुन्हा DSD करणे आवश्यक आहे . 

३.  प्रत्येक फेरफार व पिकांच्या नोंदी नंतर  ७/१२ DSD करावा  लागेल  काय
             ह्याचे उत्तर नाही असे आहे . आपण आता नवीन व्हर्जन मध्ये फेरफार मंजूर केल्या नंतरच फक्त नमुना ७ मध्ये बदल होणार असलेने फेरफार मंजूर करतानाच योग्यरीत्या अंमल झाला असे म्हणताना प्रत्येक ७/१२ मंडळ अधिकारी यांचे सहीने / DSC ने  DSD होईल त्यासाठी तलाठी यांनी पुन्हा DSD करणे आवश्यक राहणार नाही . मात्र त्यासाठी प्रत्येक ७/१२ एकदा नमुना ७ व १२ असा एकत्र DSD होणे आवशयक आहे . तसेच या पुढे फक्त पिक पाहणीची नोंद झाले नंतरच नमुना १२ अद्यावत होणार असलेने प्रत्येक हंगामात पिकांच्या नोंदी अद्यावत झाले नंतर पिकांच्या नोंदी  अंतिम / कन्फर्म केल्या नंतर त्याच वेळे तलाठी यांचे सहीने /DSC ने सदरचा नमुना १२ फक्त DSD होईल . अश्या पद्धतीने या मुढे नमुना ७ मंडळ अधिकारी यांचे सहीने व नमुना १२ तलाठी यांचे सहीने DSD होईल व एकत्रित गाव नमुना न. ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत म्हणजेच DIGITALLY SIGNED DATABASE ७/१२ (DSD) म्हणून खातेदाराना पेमेंट गेटवे मधून उपलब्ध करून दिला जाईल व तो सर्व कायदेशीर व कार्यालयीन कामाला ग्राह्य समजला जाईल . 

४. नवीन DSD ७/१२ ची वैशिष्टे - 
  अ) डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ स्वतंत्र पणेेल्या नमुना ७ व नमुना १२ एकत्र घेवून वितरीत केला जाईल .

ब)   डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ जर एकाच वेळी नमुना ७ व नमुना १२ DSD केला असेल तर त्यावर हा ७/१२  दिनांक ------- वेळ --- वाजता डिजिटल सशाक्षारीत केला आहे असा उल्लेख असेल व
 क) जर तो  नमुना १२  स्वतंत्रपणे डिजिटल स्वाक्षरीत झाला असेल तर त्यावर हा नमुना १२ दि ----- वेळ ----- वाजता डिजिटल स्वाक्षरीत केला आहे असा उल्लेख असेल व त्यावर त्या तारखेनंतर काही फेरफार घेतले असतील व काही फेरफार मंजूर केले असतील अथवा काही पिकांच्या नोंदी अद्यावत केल्या असती तर तसे देखील खाली तळटीप मध्ये छापून दिले जाईल . तथापि अश्या ७/१२ वर DSD केल्यानंतर कोणताही बदल झाला नसल्यास हा  ७१२ डिजिटल स्वाक्षरीत झाल्यावर यामध्ये कोणताही बदल झाला नसून तो दि.--- ( प्रिंटींग चा दिनांक ) वेळ -----  रोजी वैध आहे असा मेसेज देखील छापला जाणार आहे .  
ड) या पुढे DSD स्वाक्षरीत म्हणून वितरीत केलेल्या ७/१२ वर तलाठी अथवा मंडळ अधिकारी यांचे नाव छापले जाणार नाही मात्र त्याचे नोंद डाटाबेस मध्ये असते त्यामुळे या मध्ये काहीही चुकीचे ७/१२ DSD झाल्यास त्याचे जबाबदारी संबंधित तलाठी अथवा मंडळ अधिकारी यांची राहते  म्हणून DSD काम अत्यंत काळजीपूर्वकच  करावे . 

इ) या डिजिटल स्वाक्षरीत प्रत्येक नमुना ७ व नमुना १२ वर एक संकेतांक क्रमांक छापला जाईल व त्यावरून अशा ७/१२ ची वैधता https;//mahabhumi.gov.in या संकेत स्थळावर पडताळणी करता येईल  व हा ७/१२ माहिती तंत्रज्ञान अधिनियमा अंतर्गत लीगल डोकुमेंट आहे . 

फ) DSD ७/१२ वर एक QR CODE देखील त्याच्या वैधतेसाठी छापला जाणार आहे . 

५. पेमेंट गेटवे कसे वापरावे

         कोणत्याही व्यक्तीला पेमेंट गेटवे वापरून डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ ऑनलाईन प्राप्त करून घेण्यासाठी महाभूमी च्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल व तेथे आगोदर किमान १५ रुपये किंवा रुपये १५ च्या पतित १००० पर्यंत रक्कम भरावी लागेल व प्रत्येक ७/१२ डाऊनलोड केल्या नंतर त्यातून १५ रुपये प्रमाणे नक्कल फी वजा केली जाईल . त्या व्यक्तीच्या महाभूमी च्या खात्यावरील उप्वारीत रक्कम त्यांना अन्य कागदपत्रासाठी वापरता येईल . त्याचा हिशोब प्रत्येक नोंदणीकृत अर्जदाराला त्याचे लोगिन ला दिसेल.  


आपला
रामदास जगताप
दि १.९.२०१९



Comments

Archive

Contact Form

Send