रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दि . २४ .९.२०१९ पासून ई फेरफार प्रणाली मध्ये दिलेल्या नवीन सुविधा



नमस्कार मित्रांनो , 



विषय -  दि . २४ .९.२०१९ पासून ई फेरफार प्रणाली मध्ये 
 दिलेल्या नवीन सुविधा 

सर्व  जिल्ह्यांना आज दि २४ .९.२०१९ पासून  खालील प्रमाणे नवीन सुविधा  उपलब्ध करून दिल्या आहेत 


ई फेरफार प्रणाली -

१. अनोंदणीकृत  ( तलाठी स्थरावरील )  नवीन फेरफार प्रकार -  अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र ( अंशता )  असा टेम्प्लेट मध्ये देनेत आला आहे .  

२. अनोंदणीकृत  ( तलाठी स्थरावरील )  नवीन फेरफार प्रकार  अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र  ( पूर्णता हिस्सा ) - सर्व जिल्ह्यांसाठी टेस्टिंग ला दिले आहे.

३. ज्या ७/१२ वरील क्षेत्र  व आकारबंद मधील क्षेत्राची तफावत १ आर ते दुप्पट पेक्षा कमी  आहे असे सर्व मोठ्या क्षेत्राचे अहवाल १ मधील  ७/१२ सर्व फेरफार घेण्यासाठी पात्र केले आहेत . 

४. ज्या ७/१२ वरील क्षेत्र  व आकारबंद मधील क्षेत्राची तफावत  दुप्पटी पेक्षा जास्त आहे ( N times ) असे सर्व मोठ्या क्षेत्राचे अहवाल १ मधील  ७/१२  वरील क्षेत्र दुरुस्त केल्या शिवाय असे ७/१२ वर फेरफार घेता येणार नाहीत .  तहसीलदार यांना प्रत्येक फेरफार साठी user creation मधून मान्यता द्यावी लागेल. 

५. नोंदणीकृत फेरफारामध्ये -  TKN खाते ( नवीन खाते ) म्हणून आलेल्या दस्तामध्ये  फेरफार प्रक्रिया केल्या नंतर तेथे नवीन खाते असे न येता आत्ता थेट नवीन खाते क्रमांक येईल . अशी सुधारणा केली आहे .

६. जुना ७/१२ बंद करून नवीन पोट हिस्सा तयार करण्यासाठी फेरफार घेतल्यानंतर असा फेरफार रद्द केला तरी पुन्हा तो ७/१२ नवीन फेरफार घेण्यासाठी / दुरुस्तीसाठी उपलब्ध रहात नव्हता  तो आता पुन्हा उपलब्ध होईल .

७. खाता दुरुस्तीचे  फेरफार घेतल्यानंतर असा फेरफार रद्द केला तरी पुन्हा तो ७/१२ नवीन फेरफार घेण्यासाठी / दुरुस्तीसाठी उपलब्ध रहात नव्हता  तो आता पुन्हा उपलब्ध होईल .


८. कलम १५५ प्रमाणे दुरुस्तीचे कोणतेही  फेरफार घेतल्यानंतर असा फेरफार रद्द केला तरी पुन्हा तो ७/१२ नवीन फेरफार घेण्यासाठी / दुरुस्तीसाठी उपलब्ध रहात नव्हता  तो आता पुन्हा उपलब्ध होईल .

९. जर एखाद्या ७/१२ वरील खातेदाराच्या नावासमोर पोट खराब क्षेत्र व आणेवारी असेल तर अश्या ७/१२ वर खातेदारांच्या नावासमोर क्षेत्र दिसत नव्हते आत्ता असे होणार नाही . 

१०. हस्तलिखित ७/१२ ची डेटा एन्ट्री न झालेल्या ७/१२ तयार करताना काही चूक झाल्याने  असा फेरफार रद्द केला तरी पुन्हा तो ७/१२ नवीन फेरफार घेण्यासाठी / दुरुस्तीसाठी उपलब्ध रहात नव्हता  तो आता पुन्हा उपलब्ध होईल .

११. सामान्य फेरफारातून बोजा दाखल करताना दस्त क्रमांक व दुय्यम निबंधक यांचे नाव भरणे आता बंधनकारक नसेल मात्र टेम्प्लेट बोजा फेरफार मध्ये  दस्त क्रमांक व दुय्यम निबंधक यांचे नाव भरणे  बंधनकारक असेल . 


१२ . मोठ्या क्षेत्राचे ७/१२ ( २० हे पेक्षा मोठ्या क्षेत्राचे शेतीचे ७/१२ व ९९ आर पेक्षा मोठ्या क्षेत्राचे ७/१२ ) वर फेरफार घेण्यासाठी user creation मधून तहसीलदार यांना मान्यता देण्याची सुविधा विकसित केली आहे . 

१३. नोंदणीकृत  ( SRO स्थरावरील )   -  अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र ( अंशता ) या फेरफार ची री एन्ट्री दुय्यम निबंधक यांचे नाव व दस्त क्रमांक कयाम ठेवून करता येईल .

१४.नोंदणीकृत  ( SRO स्थरावरील )   -  अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र ( पूर्णतः ) या फेरफार ची री एन्ट्री दुय्यम निबंधक यांचे नाव व दस्त क्रमांक कयाम ठेवून करता येईल .

१५. भोगवटादार वर्ग १ असलेले ७/१२ ज्यामध्ये वर्ग १ चा उप प्रकार चुकीने निवडला आहे तो काढून टाकण्यासाठी / निरंक करण्यासाठी कलम १५५ प्रमाणे दुरुस्ती सुविधा देनेत आली आहे . 

१६ . सामाईक किंवा संयुक्त खात्यावरील काही खातेदारांची नावे काही निवडक ७/१२ वर कंस झालेली असतील तर तशी स्पष्ट सुचना गाव न. नं. ८ अ ( खाते उतारा ) वर तळटीप स्वरूपात नमूद करणेत येईल . ( अशी सर्व खाती ई फेरफार मध्ये फेरफार मुले खाता विभाजन या प्रकारात उपलब्ध राहतील - या बाबत खात्री करून तलाठी यांनी अशी खाती वेगळी करावीत ) 

१७ . नोंदणीकृत फेरफार चे बाबतीत SRO यांचे कडून आलेला दस्त न. दस्त वर्ष व दुय्यम निबंधक  तसेच अनोंदणीकृत फेरफार मध्ये देखील तलाठी यांनी भरलेला   दस्त न. दस्त वर्ष व दुय्यम निबंधक     कोणत्याही परिस्थितीत फेरफार तपशिला मध्ये पुन्हा  बदलता येणार नाही . 






सदरच्या सर्व सूचना तलाठी मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी यांचेनिदर्शनास आणाव्यात ही विनंती ,

आपला

रामदास जगताप
दि २४.९.२०१९ 

Comments

  1. Res sir
    आदेशाने सात बारा बंद करत असताना अनेक स न निवडणे हि सुविधा अद्याप विकसित झालेली नाही
    त्यासाठी पण प्रयत्न करावा हि विनंती

    ReplyDelete
  2. Khata vibhajan purvi pramane suru karnyat yave

    ReplyDelete
    Replies
    1. फेरफारा मुळे होणारे खाते विभाजन दिले आहे सर अधिक माहितीसाठी www.mahabhumilekh-onlie712.com वेबसाईट भेट द्या .....

      Delete
  3. मा. सर अहवाल एक मध्ये असलेले 7/12 वरील कंस झालेले नाव हे दुरुस्ती साठी उपलब्ध करुन देण्यात यावे कारण खातेदारांना चुकीने कंस झाल्यामुळे तो 7/12 अहवाल एक मध्ये गेला आहे, पण अहवाल एक दुरुस्त करतांना कंस झालेली नावे संपादन करुन क्षेत्र टाकता येत नाही. कंस पडलेले नाव संपादन करुन क्षेत्र टाकता आल्यास त्या 7/12 चा अहवाल एक एकाच फेरने दुरुस्ती करता येइल. करीता 155 चे आदेशाने युजर क्रियेशन मधुन अहवाल एक दुरुस्त करतांना कंस पडलेली नावे संपादन करुन क्षेत्र टाकण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात यावी हि विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. होय बरोबर आहे हि सुविधा मिळावी.बहुतेक गट असेच आहे क्षेत्र बरोबर आहे पण खातेदाराच्या नावाला कंस झाला आहे म्हणून ते गट अहवाल 1 मध्ये गेलेले आहेत.

      Delete
  4. सर मी पंधरा दिवसापूर्वी खाता दूरूस्ती केली काम संपल्याची घोषणा केली पन dbaलोग ईन दिसत नाही मान्यते साठी

    ReplyDelete
  5. 15. नुसार भोगवटदारवर्ग1 मध्ये उपप्रकार दुरुस्ती करण्याची सुविधा 155 मध्ये दिसत नाही आहे सर.........

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send