तलाठी लोगिन ने डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वितरणा बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय तलाठी लोगिन ने डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वितरणा बाबत
आपल्या सर्व तलाठी मित्रांच्या अथक मेहनती नंतर डिजिटल स्वाक्षरीत झालेला ७/१२ तलाठी लोगिन ने उपलब्ध करून देण्याची विनंती मला काही मित्रांनी केली . त्यानंतर मला थोडे आश्चर्य वाटले कि हि सोय तर आपण सर्व तलाठी यांना ११ जुलै २०१९ पासूनच दिली असताना असे का म्हणतात म्हणून आपल्या सर्वांचे माहितीसाठी ही मार्गदर्शक सूचना आपल्या माहिती साठी टाकत आहे .
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ तलाठी यांना त्यांचे SEVARTH I D व PASWORD वापरून खालील लिंक वरून DDM- ई महाभूमी या पर्यायातून वितरीत करता येतील
https://pde1igr.maharashtra.gov.in/frmLogin.aspxया साठी तलाठी यांनी आपला नेहमीचा ई फेरफार प्रणाली ची USER NAME व PASSWORD वापरावा .
लोगिन केले नंतर तलाठी यांना त्यांची गावे दिसतील ती दिसत नसल्यास की बोर्ड वरील F5 हे बटन वापरावे . त्यानंतर स.नं . निवडून डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डाऊनलोड करवा . ७/१२ डाऊनलोड होत नसल्यास पुन्हा एकदा प्रयत्न करा . त्या नंतर जर असा ७/१२ आपण डिजिटल स्वाक्षरीत झाला असेल तर येथून उपलब्ध होईल .
सदरची लिंक हे DDM ची असल्याने त्याला देखील नक्कल फी १५ रुपये लागू आहे त्यापैकी ५ रुपये महाभूमी संस्थेचा हिस्सा म्हणून जमाबंदी आयुक्त यांचे नावे असलेल्या बँक खात्यात भरावा लागेल ह्याची नोंद घ्यावी . या पुढे आपण देखील डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वितरीत करावेत .
या बाबतचे USER MANUAL आज पुन्हा WHATSAPP च्या ग्रुप वर टाकले आहे
सदरच्या सूचना सर्व तलाठी यांचे निदर्शनास आणाव्यात हे विनंती .
आपला
रामदास जगताप
दि १०.९.२०१९

मा. सर ईफेरफार प्रणाली मध्ये FIFO आपण लागु केलेले आहे पण याचा उपयोग अर्जदार यांना फारसा होत असल्याचे दिसुन येत नाही, याची कारणे खालील प्रमाणे आहेत.
ReplyDelete1. SRO कडुन दस्त नोंदणी झाल्यानंतर तलाठी हे त्या दस्ताचा फेरफार क्रमांक तयार करतांना FIFO लागु असल्यामुळे आधी झालेला दस्ताचा फेरफार क्रमांक तयार केल्याशिवाय नंतरच्या दस्ताचा फेरफार तयार करता येत नाही. येथे FIFO लागु होतो चांगली बाब आहे.
2. तलाठी यांनी एकदा फेर तयार केल्यानंतर त्या फेरची नोटीस काढणे, नोटीस बजावणे, हरकत भरणे हे योग्य त्या वेळी करत नाहीत, काही तलाठी हे आधी आलेल्या दस्ताचा किंवा फेरफार डॅशबोर्डवर घेवुन नुसते सोडुन देतात त्याची नोटीस काढत नाहीत, नोटीस काढली तर ती बजावल्याची तारीख भरत नाहीत, हरकतीचा शेरा भरत नाहीत त्यामुळे नंतर आलेल्या फेरफार पुर्वी झालेल्या फेरफार पुर्वी मंजुर होऊन 7/12 येतात त्यामुळे आधी दस्त होऊन देखील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.
3. तलाठी हे फेरफार क्रमांक तयार करुन नोटीस काढुन सोडुन देतात व त्याची हरकत 15 दिवस पुर्ण झालेतरी भरत नाहीत. 25 ते 30 दिवसांनी हरकतीची तारीख भरतात ती पण 15 दिवसापुर्वीची.
4. आपणास विनंती आहे कि FIFO हे ज्या फेरफारव आक्षेप प्राप्ततीचा शेरा भरला असे फेरफार क्रमांक वगळुन पुढील फेर नोटीस काढणे, नोटीस बजावणे, हरकत भरणे या सर्व स्तरावर लागु करावे जेणे करुन आधी झालेल्या फेरफारचा अमल हा आधी होइल व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
आपला विश्वासु
मंडळ अधिकारी
OK
ReplyDeleteआदरणीय सर, नमस्कार !
ReplyDeleteतलाठी यांनी SEVARTH ID व PASWORD वापरून खालील लिंक https://pde1igr.maharashtra.gov.in/frmLogin.aspx वरून 7/12 काढला असता नक्कल फी लागली आहे, अद्यावत आजची तारीख सुद्धा आली आहे, QR Code सुद्धा आलेला आहे, सदर 7/12 आठवड्यापूर्वी फेरफार पश्चात DSD झालेला आहे. तरीसुद्धा त्यावर मागील वर्षा मधील असलेलेच खातेदार दिसतात. सदर 7/12 आज रोजी E-FERFAR/DDM मध्ये अद्यावत 7/12 दिसतो.
याचा अर्थ E-FERFAR किंवा DDM चा DATA https://pde1igr.maharashtra.gov.in/frmLogin.aspx या site ला Update झालेला नाही असे दिसून येते. कृपया याबाबत Technical Team ला अवगत करावे. जेणेकरून तलाठी यांच्याद्वारे शेतकऱ्यांना योग्य 7/12 वितरीत करता येईल.
धन्यवाद !