रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

DBA (NT) यांनी पिकांची नावे निवडून तालुका क्रॉप मास्टर तयार करणे बाबत.


मार्गदर्शक सुचना क्रं. 106                                                  क्र.रा.भू.4/मा.सुचना क्रं./106/2019
               जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
               अभिलेख, (.राज्य) पुणे यांचे कार्यालय,
               पुणे, दिनांक:-         /08/2019
प्रति, 
       डिस्ट्रीक डोमेन  एक्सपर्ट तथा
      उपजिल्हाधिकारी    (सर्व)

           DBA (NT) यांनी पिकांची नावे निवडून तालुका क्रॉप मास्टर तयार करणे बाबत.
महोदय,
              राज्यात ई-फेरफार प्रणाली कार्यान्वित आहे. पिक पाहणीच्या नोंदी 7/12 वर अद्यावत करणेसाठी वापरण्यात येणाऱ्या OCU प्रणाली मध्ये वापरण्यात  येणारी पिकांची यादी सर्व जिल्हयासाठी / तालुक्यांसाठी एकसमान नव्हती. तसेच एकाच पिकाला वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या नावांनी संबोधण्यात येते. त्यामुळे पिक पाहणीच्या नोंदींमध्ये एकसमानता नव्हती. -पिक पाहणी प्रकल्पामध्ये एकाच पिकांची यादी वापरणे आवश्यक असल्याने, चारही कृषी विद्यापीठांचे मदतीने महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त, पुणे यांनी निश्चित करून दिलेल्या क्रॉपकोड व क्रॉपलिस्ट        (पिकांची यादी) वापरून चालू   वर्षीच्या खरिप हंगामाची पिक पाहणी करण्यासाठी नवीन OCU प्रणाली मध्ये ४60 पिकांसाहित उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
                       या नविन पिकांच्या यादीचा वापर करणेपूर्वी संबधित तालुक्याच्या DBA (NT) यांनी User Creation module मधुन आपल्या तालुक्यात घेण्यात येणारी पिके निवडावीत जेणेकरून आपल्या तालुक्यातील सर्व तलाठी यांना ती पिके पिक पाहणीच्या नोंदी अद्यावत करणेसाठी उपलब्ध होतील. अशी पिके DBA यांनी न निवडल्यास OCU  वापरता येणार नाही. हयाची नोंद घ्यावी. तसेच आपणाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या या पिकांव्यतिरिक्त अन्य पिके आपल्या तालुक्यात आढळून आल्यास, त्यांची नोंद सदर पिकांच्या यादी मध्ये घेण्यासाठी DDE यांनी तसा प्रस्ताव जमाबंदी आयुक्त, पुणे कार्यालयाकडे सादर करावा, ही विनंती.

रामदास जगताप)
राज्य समन्वयक, रा.भू...का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे

प्रत- मा.उपआयुक्त (महसूल) (सर्व) यांना माहितीसाठी सादर.
प्रत- उपविभागीय अधिकारी-(सर्व) यांना माहितीसाठी अग्रेषीत.
प्रत- तहसिलदार-(सर्व) यांना माहितीसाठी रवाना.


Comments

Archive

Contact Form

Send