रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

औरंगाबाद व लातूर जिल्हे झाले क्लाऊड वर सुरु दि १६.४.२०१९

नमस्कार मित्रांनो , 

    औरंगाबाद व लातूर  जिल्हे झाले क्लाऊड वर सुरु दि १६.४.२०१९ 


  आज दिनांक १६ .४.२०१९ पासून आणखी दोन जिल्हे ESDS CLOUD डेटा सेंटर वर स्थलांतरीत करून तेथे सुरु करणेत आले हे दोन्ही जिल्हे https://mahaferfar.enlightcloud.com  ही URL वापरून सर्व वापरकर्ते यांना कामकाज सुरु करता येईल . 



    औरंगाबाद व लातूर या दोन्ही  जिल्ह्यातील सर्व वापरकर्ते  आज पासून खालील प्रायवेट URL वापरता येईल 
https://mahaferfar.enlightcloud.com 

  ही URL  वापरून " ई फेरफार" प्रणालीत VPN / FORTICLIENT न वापरता काम करू शकणार आहात . 
या साठी डी डी ई    औरंगाबाद व लातूर  यांचे मेल वर दि १५ .४.२०१९  रोजी पाठवलेले वापरकर्ते यांचे  पासवर्ड वापरून व मोबाईलवर व ई मेल वर येणारा OTP वापरून लॉगीन करू शकतो , त्या नंतर तलाठी मंडळ अधिकारी यांना दिसणारी eferfar2beta ही url वापरून व आपले नेहमीचे सेवार्थ आय डी व पासवर्ड आणि DSC वापरून ई फेरफार प्रणाली च्या LANDING PAGE वर लॉगीन करू शकता . त्यानंतर ई फेरफार मोडूल निवडून काम सुरु करू शकता . 
 आज पासून  फक्त ई फेरफार  , PDE / ई हक्क , UC ,DDM,OCU  ,odc मधेच काम करता येईल 

सुरुवातीला काही अडचणी येवू शकतात त्या तत्काळ मास्टर ट्रेनर्स , हेल्प डेस्क , DBA , DIO यांचे निदर्शनास आणाव्यात . 


     औरंगाबाद व लातूर या  जिल्ह्यातील  सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रात्रीचा दिवस करून केलेलं ७/१२ संगणकीकरण चे काम आता प्रत्यक्षात अधिक चागली सेवा राज्यातील जनतेला देण्यासाठी फलद्रूप झालेले दिसेल अशी अपेक्षा आहे . 

                औरंगाबाद    जिल्हा राज्यातील क्लावूड वर जाणारा तेरावा   जिल्हा ठरला आहे सबब RDC & DDE          औरंगाबाद   श्री .संजय जाधवर   , मास्टर ट्रेनर  ,     तहसीलदार  तसेच  NIC PUNE TEAM , MY HELP DESK TEAM व जिल्हाधिकारी  व अप्पर जिल्हाधिकारी  औरंगाबाद   यांचे मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद .

लातूर  जिल्हा राज्यातील क्लावूड वर जाणारा चौदावा  जिल्हा ठरला आहे सबब RDC & DDE     लातूर   श्री .अनंत गव्हाणे         , मास्टर ट्रेनर  ,     तहसीलदार  तसेच  NIC PUNE TEAM , MY HELP DESK TEAM व जिल्हाधिकारी  व अप्पर जिल्हाधिकारी लातूर    यांचे मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद .

       GCC CLOUD MIGRATION नंतर         औरंगाबाद व लातूर या  मधील  सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना होणारा मानसिक त्रास निश्चित कमी होईल असा मला विश्वास  आहे . 

         राज्यातील सामान्य जनतेला एक चांगली सुविधा देण्यासाठी च्या महसूल विभागाच्या या प्रकल्पासाठी  आपले योगदान देणाऱ्या माझ्या सर्व सहकारी महसूल अधिकारी , DIO , सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना मनपूर्वक धन्यवाद . 


आपला 
रामदास जगताप 
दि १६ .४.२-२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send