रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

वाशीम जिल्हा ठरला क्लाऊडवर जाणारा राज्यातील पहिला जिल्हा


नमस्कार मित्रांनो , 

अभिनंदन !     अभिनंदन !!   अभिनंदन !!!

अभिनंदन !     अभिनंदन !!   अभिनंदन !!!

    ज्या साठी आपण सर्व अनेक दिवसापासून अथक प्रयत्न करत होतो ते आज सध्या झाले .


   वाशीम जिल्हा आज दि १५.३.२०१९ सायंकाळी ६.३० वाजता GCC -ESDS CLOUD वर LIVE झाला .

 हे सध्या करण्यासाठी आपण सर्वजन गेले अनेक दिवस चातका प्रमाणे वात पाहत होतो .

         वाशीम जिल्ह्यातील सर्व वापरकर्ते उद्या पासून खालील प्रायवेट URL वापरता येईल 
https://mahaferfar.enlightcloud.com 

  ही URL  वापरून " ई फेरफार" प्रणालीत VPN / FORTICLIENT न वापरता काम करू शकणार आहात . 
या साठी डी डी ई वाशीम व DIO , NIC यांचे मेल वर दि ११.३.२०१९ रोजी पाठवलेले २९० वापर्कार्त्यांचे पासवर्ड वापरून व मोबाईलवर येणारा OTP वापरून लॉगीन करू शकतो , त्या नंतर तलाठी मंडळ अधिकारी यांना दिसणारी eferfar2beta ही url वापरून व आपले नेहमीचे सेवार्थ आय डी व पासवर्ड आणि DSC वापरून ई फेरफार प्रणाली च्या LANDING PAGE वर लॉगीन करू शकता . त्यानंतर ई फेरफार मोडूल निवडून काम सुरु करू शकता . 
 उद्या फक्त ई फेरफार मधेच काम करता येईल त्या नंतर लवकरच OCU ,ODC , ODBATOOL , UC, DDM , OCU_BACKLOG ,RE EDIT , PDE / ई हक्क  इत्यादी मोडूल्स कामकाजासाठी उपलब्ध होतील . 

सुरुवातीला काही अडचणी येवू शकतात त्या तत्काळ मास्टर ट्रेनर्स , हेल्प डेस्क , DBA , DIO यांचे निदर्शनास आणाव्यात . 

शनिवार व रविवार या दिवसात वाशीम जिल्ह्याचा FEEDBACK विचारात घेवून अन्य जिल्हे त्या नंतर क्लाऊड वर स्थलांतरीत करणेत येतील . 

राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रात्रीचा दिवस करून केलेलं ७/१२ संगणकीकरण चे काम आता प्रत्यक्षात अधिक चागली सेवा राज्यातील जनतेला देण्यासाठी फलद्रूप झालेले दिसेल अशी अपेक्षा आहे . 

           वाशीम जिल्हा राज्यातील क्लावूड वर जाणारा पहिला जिल्हा ठरला आहे सबब 
RDC & DDE WASHIM श्री शैलेश हिंगे साहेब , DIO , NIC WASHIM श्री.  सागर साहेब , मास्टर ट्रेनर श्री दत्ता मालेकर ,  कारंजा DBA सहाय्यक तलाठी एकघारे म्याडम व तलाठी कारंजा महेश धानोरकर , तहसीलदार वाशीम व कारंजा तसेच  NIC PUNE TEAM , MY HELP DESK TEAM व जिल्हाधिकारी वाशीम यांचे मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद .


   GCC CLOUD MIGRATION नंतर राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना होणारा मानसिक त्रास निश्चित कमी होईल असा मला विस्वास आहे . 

         राज्यातील सामान्य जनतेला एक चांगली सुविधा देण्यासाठी च्या महसूल विभागाच्या या प्रक्लापासाठे आपले योगदान देणाऱ्या माझ्या सर्व सहकारी महसूल अधिकारी , DIO , सर तलाठी व मंडळ अधिकारी यांना मनपूर्वक धन्यवाद . 


रोखर आज कर्तव्य पूर्तीचा आनंद होत आहे हे नाकारता येत नाही व सांगताही येत नाही .

आपला 

रामदास जगताप 
दि १५.३.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send