रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे पिकांच्या नोंदी ७/१२ वर घेणेची कार्यपद्धती


                        
                              महाराष्ट्र शासन
*        -पीक पाहणी
पीक पाहणीची  माहिती मोबाईल ॲपद्वारे गांव नमुना १२ मध्ये      शेतकऱ्यांनी स्वतः नोंदविण्याचा प्रकल्प

शेतकरी बंधूभगिनींनो

शेतकऱ्यांनी मोबाईल-ॲपचा वापर करून त्यांच्या  शेतात पेरलेल्या पिकांची   माहिती अचूकपणे आणि वेळेवर शासनाकडे पाठविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने टाटा ट्रस्टस् मुंबई च्या सहकार्याने -पीक पाहणी हा पथदर्शी प्रकल्प राज्यातील  वाडा (कोंकण), दिंडोरी (नाशिक), फुलंब्री (औरंगाबाद), कामठी (नागपूर), बारामती (पुणे), आणि अचलपूर (अमरावती) या निवडक सहा तालुक्यात सुरु केलेला आहे.
 या प्रकल्पांतर्गत पीक पेरणीची माहिती शासनाकडे पाठविण्यासाठी -पीक पाहणी  नावाचे ॲप टाटा ट्रस्टस् मुंबई च्या सहकार्याने विकसित केले आहे. शेतकऱ्यांनी मोबाईल-ॲप चा वापर करून पेरलेल्या पिकांची   माहिती शासनाकडे स्वतः पाठविणे, शासकीय यंत्रणेवरील कामाचा भार कमी करणे आणि शेतकऱ्यांचे सबलीकरण करणे, या उदेशाने हा प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.
या प्रकल्पामध्ये समाविष्ट गावातील शेतकऱ्यांना ॲपच्या  वापरा संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी दि. ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत तालुका स्तरावर कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, आणि शेती मित्र यांच्यासाठी कार्यशाळा संपन्न होऊन त्यांच्याकडून गांव पातळीवर शेतकऱ्यांची प्रशिक्षणे सुद्धा पूर्ण करण्यात आली आहेत. त्या नंतर दि. फेब्रुवारी २०१९ पासून ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी  स्वतः त्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु केलेली आहे,   गांव नमुना १२ मध्ये  पीक पेरणीची माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया कार्यान्वित झालेली आहे.   पीक पाहणी ॲप चा वापर करण्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आली आहे.  
 -पिक पाहणी अॅप
स्मार्ट मोबाईलमध्ये ईपिक पाहणी ॲप स्थापित करणे व पिकाची माहिती ॲप मध्ये अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन:
v 1) नोंदणी करणेसाठी आपल्या स्मार्ट Android मोबाईल मध्ये Google play store उघडावे.
v 2) नंतर epeek असे लिहावे.
v 3) ॲप डाऊनलोड करून इंस्टॉल करावे, त्यानंतर अॅप उघडावे
v 5) प्रथम  पिक पाहणी संदर्भातील स्क्रीन वर माहिती दिसेल, त्या माहितीला डावीकडे सरकवा
v 6) पुढे जा आपला मोबाईल नंबर टाका त्यानंतर
v 7) नवीन माहिती या बटनावर क्लीक करा
v 8)त्यानंतर  संबंधित जिल्हा, तालुका, गावाचे नाव निवडणे (सातबारा वर असणारे नाव टाकावे)
v 9)पहिले नाव,मधले नाव,आडनाव,अथवा खाते क्रमांक यापैकी एक पर्याय निवडून खाते शोधावे
v 10) मोबाईल नंबर टाकावा (टीप :- ज्या शेतकऱ्याची नोंदणी करायची आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकावा,  एकाच स्मार्ट मोबाईल वरून अनेकांची नोंदणी करू शकता) 
v 11) आपण टाकलेल्या मोबाईल नंबरवर चार अंकी पासवर्ड येईल, तो पुन्हा वापरण्यासाठी जपून ठेवावा.
v 12) चार अंकी रकान्यात पासवर्ड टाकावा
v 13) पुढे गेल्यानंतर - खाते निवडा या पर्यायात जाऊन आपले नाव निवडा
v 14) परिचय बटन दाबावे, स्वतःचा फोटो अपलोड करावा
v 15) यामध्ये स्वतःची माहिती दिसते, त्यामध्ये स्त्री/ पुरुष निवडून सबमिट करा.
v 16) पिंकाची माहिती नोंदवा हे बटन दाबावे आपली माहिती दिसेल.
v 17) शेतातील उभ्या पिकांच्या नोंदणीसाठी हंगाम निवडणे, रब्बी हंगाम किंवा संपूर्ण वर्ष निवडावे
v 18) पिक किती आहे हे क्षेत्र टाकावे पिकाचा वर्ग - निर्भळ पिके /मिश्र पिके /पॉलि हाउस /शेडनेट/पड क्षेत्र
v 19) जलसिंचनाचे साधन निवडणे विहीर / बोरवेल / तलाव / कालवा जिरायत असेल तर अजलसिंचत  
v 20) सद्यस्थितीत पिकाची अवस्था असणारा फोटो टाकावा, बांधापासून १५ फुट आतमध्ये जाऊन 
v 21) पिकाची माहिती सबमिट करा, हे सर्व झाल्यानंतर
v 22) डेटा अपलोड चे बटन दाबावे
v 23) माहिती अपलोड झाल्यानंतर पुन्हा नवीन शेतकरी यांची नोंदणी करू शकता...


Comments

  1. भारी app आहे , परंतु लवकरotp येत नाही

    ReplyDelete
  2. good project helpful of farmer , talathi and goverment

    ReplyDelete
  3. good project helpful of farmer , talathi and goverment

    ReplyDelete
  4. Very useful pilot project which will be helpful for farmers

    ReplyDelete
  5. Nice app
    Useful and helpful to Farmers

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send