ई फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून माझी दोन वर्षे
नमस्कार मित्रांनो ,
मी दोन वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे उप जिल्हाधिकारी महसूल म्हणून कार्यरत असताना शासनाच्या निर्देशा निर्देशाप्रमाणे व तत्कालीन जमाबंदी आयुक्त मा. श्री संभाजी कडू पाटील साहेब व उप संचालक सर्वसाधारण श्री कैलास जाधव साहेब यांचे आग्रहास्तव उसनवारी तत्वावर दि १०.१.२०१७ पासून आठवड्यातील तीन दिवसासाठी पुण्यात जमाबंदी आयुक्त कार्यालयात ई फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक व उर्वरित ३/४ दिवस कोल्हापूर येथे माझा मुळ कारभार पाहू लागलो . त्या घटनेला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत या कालावधीत ई फेरफार प्रकल्पाचे सिंहावलोकन केले असता दोन वर्षात राज्यातील ई फेरफार प्रकल्पाची प्रगती पाहून मनस्वी समाधान वाटते .
मी नोकरीला लागल्यापासून सुरु झालेले ७/१२ संगणकीकरण वीस वर्षात जेव्हढी प्रगती करू शकले नव्हते तेव्हढी प्रगती दोन वर्षात झालेली दिसून येते तरीही अजून बराच पल्ला गाठायचा आहे . तत्कालीन जमाबंदी आयुक्त मा. श्री चंद्रकांत दळवी साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आपण ऑफ लाईन वरून ऑनलाईन झालो परंतु ऑनलाईन ७/१२ ची स्थिती पाहता ती अत्यंत असमाधानकारक होती . कोणत्याही महसूल अधिकाऱ्याला ती अस्वस्थ करणारीच होती . त्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयात एका महसूल अधिकाऱ्याची गरज लक्षात घेयून मा, कडू पाटील सरांनी मला राज्य समन्वयक म्हणून काम पाहण्याची विनंती केली . तो पर्यंत महसूल अधिकारी यांचा या प्रकल्पातील थेट सहभाग नगण्य होता . बहुतांश महसूल अधिकारी व तलाठी मंडळ अधिकारी यांना या प्रकल्पाच्या यशस्वितेबाबत शंका होती . कोणत्याही तलाठी मंडळ अधिकारी अथवा नायब तहसीलदार , तहसीलदार यांना कोणत्याही तांत्रिक अथवा कायदेशीर प्रशिक्षणा शिवाय कामकाज चालू होते त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य काय असेल या भावनेने व्यथित होवून , महसूल विभागाचा हा प्रकल्प महसूल प्रशासनाचा चेहरा मोहरा बदलू शकतो व राज्यातील जनतेला एक चांगली ऑनलाईन सेवा देता यावी या एकमेव उदात्त हेतूने मी स्वतःहून राज्य समन्वयक म्हणून काम करायचा मी निर्णय घेतला . कोल्हापूर येथील जिल्हा परिषद प.स. व नगरपालिका नगर पंचायती च्या निवडणुका पार पडल्या नंतर मी तीन दिवसासाठी १० जानेवारी ,२०१७ पासून राज्य समन्वयक महणून कामकाज पाहू लागलो .
पहिल्याच टप्प्यात प्रत्येक महसूल विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी EDIT MODULE बाबत मास्टर ट्रेनर्स यांचा प्रशिक्षण वर्ग घेयून कामाचा मुख्य उद्देस व या मुळे प्रणाली मध्ये होणारे कामकाज तसेच गुणवत्तापूर्ण कामकाज कसे करावे ? या बाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली . परंतु प्रत्येक विभगात जावून आल्यानंतर तर त्यातील अनेक अडचणी माझा निदर्शनास आल्या व या सर्व अडचणी सिद्वायाच्या असतील तर ई फेरफार प्रणाली मध्ये अनेक बदल करावे लागतील असे माझ्या लक्षात आले .त्यानंतर अनेक वेळा NIC TEAM सोबत चर्चा करून त्याची गरज समजावून सांगून प्रमाली मध्ये मूळ ढाच्या न बदलता अनेक बदल ई फेरफार प्रणालीत करणेत आले .
१ मे,२९१७ रोजी संगणकीकृत ७/१२ चे मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा शासनाचा विचार होता . तथापि या मधील कामाची गुणवत्ता व विविधता पाहता संगणकीकृत ७/१२ मध्ये व हस्तलिखित ७/१२ मध्ये अनेक तफावती माझ्यासारख्या महसुली अधिकाऱ्याला सष्टदिसून येत होत्या . त्या आम्ही मा. महसूल मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्याने शासनाने प्रास्तावित लोकार्पण कार्यक्रम पुढे ढकलला .
१ मे २०१७ पासून राज्य शासनाने संपूर्ण राज्यात संगणकीकृत ७/१२ च्या चावडी वाचनाचा कार्यक्रम घेत असल्याचे जाहीर केले . त्यासाठी RE EDIT MODULE विकसित करून पुन्हा त्याच्या प्रशिक्षणासाठी संपूर्ण राज्याचा जिल्हानिहाय दौरा प्रशिक्षण व तपासणी कार्यक्रम मा. जमाबंदी आयुक्त महोदायांचे निर्देशाप्रमाणे आयोजित केला . त्यातून अनेक नवीन गरज / सुधारणा लक्षात आल्या त्या प्रमाणे ई फेरफार प्रणालीत ६०० पेक्षा जास्त बदल / सुधारणा करणेत आल्या .
आप आपसातील स्पर्धे मुळे अन्य कारणामुळे पुरेसा कालावधी देवून सुधा व री एडीट मधील काम ZERO TOLERANCE TO ERROR हे तत्व असून सुधा हे काम पूर्ण होऊन सुधा ७/१२ मध्ये असंख्य त्रुटी ७/१२ मध्ये दिसून आल्या . त्यासाठी पुन्हा कलम १५५ प्रमाणे दुरुस्ती करण्याची ऑनलाईन सुविधा विकसित केली आहे . सन २०१८ मध्ये री एडीट व कलम १५५ साठी पुन्हा विभाग निहाय मास्टर ट्रेनर्स साठी विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशिक्षण वर्ग / कार्यशाळा घेणेत आली.
सन २०१८ या एका वर्षात ई फेरफार प्रकल्पात झालेली प्रगती
१. री एडीट मोड्यूल मध्ये १५६९० गावांचे डी ३ पूर्ण झाले
२. ई फेरफार प्रणाली मध्ये २६१२७७ इतक्या नोंदणीकृत दस्तांचे फेरफार नोंदाविंत आले तसेच २२९८१०५ अनोंदणीकृत अर्जावरून अथवा कागदपत्रा वरून ऑनलाईन फेरफार घेनेत आले .
३. डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वितारण सेवेचा शुभारंभ मा. मुख्य मंत्री यांचे हस्ते १ मी २०१८ रोजी करणेत आला तसेच आपली चावडी हि प्रत्येक गावासाठी स्वतंत्र वेबसाईट अथवा गावाच्या चावडीचा डीजीतल नोटीस बोर्ड लोकार्पीत करणेत आला एकूण २५० लक्ष ७/१२ यापैकी ४५५२९८१ डिजिटल स्वाक्षरीत करणेत आले व त्यापैकी १३.८० लक्ष ७/१२ जनतेनी डाऊनलोड देखील केले .
४. ई हक्क नावाची एक प्रणाली तलाठी कार्यालयात केलेजाणारे अर्ज ऑनलाईन स्वीकारणे साठी ची सुविधा विकसित करणेत आली .
५. ई पीक पाहणी हे मोबाइल APP शेतकरी यांना त्यांचे जमिनीवर घेनेत येणाऱ्यापिकांच्या नोंदी खातेदार तलाठ्याकडे ऑनलाईन पाठवणे ची सुविधा विकसित करणेत आली आहे .
सन २०१८ मध्ये २९ जिल्ह्यांचे सर्वर बंद पडल्याने खूपच त्रास व धावपळ सहन करावी लागली . तरीही आपण संगणकीकृत ७/१२ वरून ऑनलाईन ७/१२ व आत्ता डिजिटल ७/१२ अशी प्रगती आपण साधू शकलो आहे ह्याचे मोठे समाधान आहे . त्यामुळे एकाच मनात येते खूप काही केले आहे अजून खूप काही करायचे आहे .
आपाला
रामदास जगताप
दि ११.१.२०१९
Congratulations sir. Proud of you.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसर मी एक तलाठी आहे, परंतु हा सर्व प्रकल्प आपल्या सारखा खंबीर नेतृत्वामुळे शक्य झाला, आपले विचार व वागणुक चांगली असल्याने सर्व सामान्य कर्मचारी यांनीं त्यांची गाऱ्हाणी आपल्याकडे मांडली, आपण ती ऐकुन तर घेतलीच, परंतु तश्या सुधारणा ही केल्या, आपणास आमच्याकडुन जो त्रास झाला, त्या बद्दल क्षमा असावी, सर आणखी एक विनंती आहे, आता दुष्काळ जाहीर झाला आहे अशा वेळी याद्या तयार करणे क्लिष्ट आहे, तर शेतकऱ्याचे नाव, त्यांचे एकुण गट नंबर(गट नंबरच्या संख्येसह ), एकुण क्षेत्र, लांगवडयोग्य क्षेत्र या स्वरूपात याद्या असणारी प्रणाली लवकर विकसीत झाली, तर बरे होईल, कारण आताच्या आठ अ, व खातेदाराची यादी यामध्ये ती सुविधा नाही, आमच्या अपेक्षा मोठ्या आहेत यांची आम्हांला जाणीव आहे, पण आपणामुळेच हे सर्व शक्य आहे, तसदी बद्दल क्षमस्व !
ReplyDeleteआपल्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा!!
धन्यवाद
आपले अभिप्राया बद्दल धन्यवाद , आपली मागणी योग्य असून ती लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल .
ReplyDelete