रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सन २०१८ चा लेखाजोखा दि १.१.२०१९

मंगळवार  , दिनांक १.१.२०१९  
नमस्कार मित्रांनो , 
                 आज सन २०१९  या नवीन  वर्षाचा पहिला दिवस . गेल्या वर्षाचा सन २०१८ चा  लेखाजोखा मांडताना मला आनंद होत आहे व मी समाधानी आहे .  
                      राज्यातील जनतेला अचूक संगणकीकृत ७/१२ व ८अ देण्याचा महसूल विभागाचा उद्देश बऱ्याचअंशी या वर्षात सफल झाला . राज्यातील ४३९६२  गावांपैकी सुमारे ४३४४२  गावातील अचूक ७/१२ व ८अ चे काम पूर्ण झाले आहे . हस्तलिखीत ७/१२ पेक्षा कितीतरी चांगल्या स्थितीतील अचूक ७/१२ व ८अ जनतेला उपलब्ध करून देण्यात यश आले आहे . असे असले तरी अजुनही काही ७/१२ मध्ये त्रुटी राहिल्या असल्याचे दिसून येत आहे . त्यासाठी ONLINE कलम १५५ प्रमाणे ७/१२ दुरुस्तीची सुविधा विकसित करून दिली आहे . ज्या गावात कमी ७/१२ होते , कमी अडचणी होत्या त्या गावाचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे उर्वरीत गावांचे अचूक ७/१२ व ८अ चे स्वप्न साकार होण्यासाठी तलाठी मंडळ अधिकार्यांसह महसूल अधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे .  अचूक संगणकीकृत ७/१२ व ८अ साठी “ZERO TOLERANCE TO ERROR” हे मा. जमाबंदी आयुक्त श्री. चोकलिंगम सरांचे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात आणण्याचा कसोशिने प्रयत्न या वर्षात केला . महसूल विभागाच्या, नायब तहसीलदार , तहसीलदार , प्रांताधिकारी व उपजिल्हाधिकारी तथा DISTRICT DOMAIN EXPERT ( DDE) याचे सह प्रत्येक तालुक्यातून दोन तलाठी व दोन मंडळ अधिकारी यांना विभागीय स्थरावर एक दिवसाची कार्यशाळा घेवून  प्रशिक्षण देनेत आले . मी स्वतः ३००० पेक्षा जास्त महसूल अधिकारी व कर्मचारी यांना कार्शाला घेयून प्रशिक्षित केले . गेल्या वर्ष भारत ९० पेक्षा जास्त मार्गदर्शक सूचना काढल्या . २४० पेक्षा जास्त माहितीपर लेख माझ्या ब्लॉगवर गेल्या वर्षभरात लिहिले त्याचा लाभ ९९००० पेक्षा जास्त VISITORS ने घेतला . DILRMP नावाने ५० पेक्षा जास्त वापरकर्ते यांना फक्त ई फेरफार प्रणालीसाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रयत्न केले . महसूल महारष्ट्र चे नावाने  १० पेक्षा जास्त WHATS APP वर देखील शक्य तेव्हडे  मार्गदर्शन चालू असते . 


                          ई फेरफार प्रकल्प या वर्षभरात नेहमी मा. महसूल मंत्री महोदय , मा. प्रधान सचिव महसूल , जमाबंदी आयुक्त , सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचा प्राधान्याचा विषय राहिला . राज्यात एकच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम लागू असताना अभिलेखातीत विविधता एका समान पातळीवर आणणे साठी अनेक सूचना निर्गमित करणेत आल्या .   वर्षभर ई फेरफार प्रकल्पाच्या गुणवत्तापूर्ण काम करत असतानाच मा. मुख्यमंत्री महोदयांनी महारष्ट्र दिनी दि १.५.२०१८ रोजी  डिजिटल स्वाक्षरीत ७/१२  वितरण सेवेचा शुभारंभ सह्याद्री राज्य अतिथिगृहात मुंबई येथे महसूल मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे उपस्थितीत केला . याच वेळी मा, मुख्यमंत्री  मा. देवेंद्र जी फडणवीस साहेब यांनी आपली चावडी ही ट्ऴाटःई कार्यालयातील डिजिटल नोटीस बोर्ड दर्शविणारे संकेतस्थळाचे लोकार्पण देखील करणेत आले . 

                            या वेळी माझ्या कामाची दाखल घेवून राज्य शासनाने मा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देयून महाराष्ट्र दिनी   महसूल मंत्री ,राज्याचे मुख्य सचिव मा. डी. के.जैन सर , महसूल विभागाचे अप्पर मुख्य  सचिव मा. मनुकुमार श्रीवास्तव सर व जमाबंदी आयुक्त सर यांचे उपस्थितीत माझा गौरव करणेत आला .   त्यासाठी मी आमचे जिल्ह्याधिकारी पुणे मा.श्री.नवल किशोर राम  सर व विभागीय आयुक्त मा.श्री.दीपक म्हैसेकर साहेब  आणी जमाबंदी आयुक्त श्री. चोक्कलिंगम सर यांचे आभार मानतो . माझ्या या प्रयत्नात माझे हेल्प डेस्क मधील सहकारी डॉ.गणेश देसाई , कृष्णा पास्ते ,  यांनाही शासनाने गौरविले . या कामात माझे अन्य सहकारी श्री . सचिन भैसाडे , श्यामल काकडे , श्रीमती पाटणे व नायब तहसीलदार श्रीमती नाझीरकर तसेच NIC चे सेनिअर टेकनिकाल डायरेक्टर श्री समीर दातार साहेब व कक्ष अधिकारी श्री रणजीत देशमुख साहेब यांचे मोलाचे सहकार्य मिळाले . सन २०१८  च्या यशपुर्ती मध्ये NIC ची DEVELOPMENT team , SUPPORT team , राज्यातील सर्व तलाठी , मंडळ अधिकारी सर्व DDE व सर्व महसूल अधिकाऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद .

                            ई फेरफार प्रकल्पाच्या यशस्वी अंमल बजावणी साठी अचूक प्रणाली , चांगल्या क्षमतेचे सर्वर , चांगली इंटरनेट कनेक्टीव्हिटी व  प्रशिक्षित कर्मचारी याची नितांत आवशक्यता असते . डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ कामकाज सुरु झाल्या नंतर सर्वर वर अतिरिक्त ताण येयून SDC मुंबई यथील MONITOR   SERVER बंद पडल्याने राज्यातील २९ जिल्हे  मे २०१८ च्या अखेरीस बंद पडले ते पुर्वावत सुरु करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले परंतु म. जमाबंदी आयुक्त यांचे मार्गदर्शनाने व प्रयत्नाने सहा जिल्हे NDC पुणे येथे व  १९ जिल्हे SDC सुमारे एक ते दीड महिन्याच्या विलंबाने सुरलीत सुरु होवूशाकले त्यातील काही जिल्ह्यांचे काम २०/२५ दिवसातच सुरु झाले होते मात्र अनेकाना रात्रपाळी करावी लागली . 

                         शासनाच्या बदलत्या धोरणाप्रमाणे NEW CLOUD POLICY अंतर्गत GCC CLOUD अंतर्गत राज्यशासनाने ESDS SOFTWARE SOLUTIONS    PRIVATE  LTD. या कंपनीची HPC ने  निवड केली असून त्यांचे मदतीने CLOUD MIGRATION  ची पूर्व तयारी सुरु आहे . आत्ता लवकरच ई फेरफार प्रकल्प  CLOUD  वर ONLINE होणार आहे . 
 सन २०१९ साठी १) CLOUD MIGRATION
२) DATABASE IMPROVEMENT ACTIVITY - PHASE 1 & PHASE 2 पूर्ण करणे
३) शेतकऱ्यांनी स्वतः पिक पाहणी ची माहिती भरण्याची सुविधा ई पिक पाहणी या मोबाईल AAP द्वारे सुविधा देणे
४) तलाठी कार्यालयात केले जाणारे अर्ज ONLINE  पद्धतीने घेण्यासाठी ई हक्क हे PDE MODULE कार्यान्वित करणे
५) तलाठी दप्तराचे संगणकीकरण - ई चावडी कार्यान्वित करणे
६ ) डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ ८ अ व फेरफार नोंदवही जनतेला डिजिटल पेमेंट करून प्रमाणित प्रत करून देणे .  हे महत्वकाक्षी प्रकल्प पाईपलाईन मध्ये आहेत .

 प्रकल्पाची सध्यस्थिती -
१. एकून महसुली गावे  ४३९६२  
२.  घोषणापत्र ३ पूर्ण करून री एडीट चे काम संपल्याची एकूण महसुली गावे -४३४४२ 
३. डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ ची संख्या - ४४८८०९३ 
४.खातेदारांनी मोफत  DOWNLOAD केलेल्या डिजिटल स्वाक्षरीत  ७/१२ ची संख्या-1347361 
५. ONLINE घेतलेल्या नोंदणीकृत नोंदी -  ७११९४६
६. ONLINE घेतलेल्या अनोंदणीकृत नोंदी -   ४७६६९४२ 

या प्रकल्पासाठी काम कार्यासाठी माझ्या घरच्या सर्व जबाबदार्या पार पडणार्या HOME MINISTER अर्थात सौ, अनिता हिस मनपूर्वक धन्यवाद तसेच चि. प्रणव व कु. प्राजक्ता हिस शुभ आशीर्वाद . 
पुढील वर्ष्यातील आपल्या DIGITAL INDIA च्या कामासाठी DIGITAL हार्दिक शुभेच्या . 
पुढील वर्ष्यात देखील आपले असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा बाळगतो . 
HAPPY NEW YEAR 2019 ...........................
आपला 
रामदास जगताप

Comments

  1. Thanks sir..aaple margdarshan nirantar labho hich apexa

    ReplyDelete
  2. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आम्हाला व आमच्या तलाठी मित्रांना योग्य व अचून मार्गदर्शन अतिशय कमी वेळेत प्राप्त होत आहे. आपण नुकतेच मार्गदर्शन सूचना क्र. ब्लॉग वर टाकण्यास सुरुवात केली त्यामुळे आम्हाला सुद्धा सदर मार्गदर्शन सूचना तलाठी यांना पाठविण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर जर मार्गदर्शन सुचना आणि काही नवीन मार्गदर्शन सुचनांचे फ्लो document ब्लॉग वर माहितीस दिले तर कामास गती प्राप्त होईल. धन्यवाद सर व आपणास व आपल्या परिवारास नववर्षाशा हार्दिक शुभेच्छा !!!

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send