रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दि.२०.१२.२०१८ पासून ई फेरफार , चूक दुरुस्ती मोड्यूल मध्ये केलेले बदल

नमस्कार मित्रांनो , आज दि २०.१२.२०१८ पासून खालील मोड्यूल मध्ये पुढील बदल करणेत आहे आहेत ई फेरफार मोड्यूल व चूक दुरुस्ती मोड्यूल - मंडळ अधिकारी यांनी एखादा फेरफार मंजूर केल्यानंतर त्याचा योग्य अंमल झाला नसल्यास "फेरफराचा अंमल योग्य रित्या न झालेल्या फेरफारांची दुरुस्ती" हा ई फेरफार मधील पर्याय बंद करणेत आला आहे .त्या ऐवजी चूक दुरुस्ती मोड्यूल (CDF MODULE) उपलब्ध करून देनेत आले आहे ( त्याचे युजर म्यानुअल सोबत जोडले आहे ) या मध्ये हा फेरफार योग्य अंमल घेण्यासाठी उपलब्ध राहील . या मंजूर फेरफार योग्य अंमल होण्यासाठी ज्या गट / स.नं मध्ये जी दुरुस्ती करणे आवश्यक असेल ती दुरुस्ती CDF MODULE मधून तलाठी यांना करता येईल तथापि या चूक दुरुस्ती तपशील पाहून तलाठी यांनी माहिती साठवा केल्या नंतर तहसीलदार यांनी कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्त्यांच्या मान्यता या युजर क्रियेशन (UC) मधु BIOMETRIC LOGIN ने द्यावी लागेल . त्या नंतर परिशिष्ट क चा आदेश देखील स्व्क्षारीत करून घ्यावा लागेल . सदरचा अआदेश पाहून मंडळ अधिकारी हा फेरफार मंजूर करून मूळ मंजूर फेरफाराचा योग्य अंमल देयू शकतील तथापि या अश्या दुरुस्तीच्या कालावधीत कोणताही अन्य फेरफार त्या गट नं वर घेता येणार नाही अथवा मंजूर देखील करता येणार नाही ( आशय केसेस अत्यंत अल्प आहेत तथापि ही सुविधा अशा विशिष्ट फेरफारासाठी वापरता येईल ) ई फेरफार प्रणालीतून करावयाच्या कामा पैकी खालील चार बाबी नेहमी लक्षात ठेवा १. कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती २. कलम १५५ च्या आदेशाने मंजूर फेरफाराची चूक दुरुस्ती ३. नवीन ७/१२ ४. वाडी विभाजन हे चारही फेरफार मंजुरी साठी मंडळ अधिक्स्री यांना ई फेरफार मध्ये उपलब्ध राहणार नाहीत हे सर्व फेरफार मंडळ अधिक्स्री यांनी त्या त्या module मधेच निर्गत करावेत . ह्या सूचना सर्व मंडळ धिकारी यांचे निदर्शनास आणावी अ ) खाता दुरुस्ती - 1. खाता दुरुस्ती MODULE मध्ये वैयक्तिक खाते तयार करून समाविष्ट केल नंतर खातेदाराचे नाव दुबार दिसत होते ती अडचण दूर केली आहे ( bug is fixed ) 2. खाता दुरुस्ती MODULE मध्ये फेरफार क्रमांक तयार करताना काम संपल्याची याची घोषणा केलेले काही अनावश्यक स.नं.शिल्लक असलेचे दाखवले जात होते ते आत्ता दिसणार नाही . आत्ता आवश्यक तेव्हडेच स नं तेथे दर्शविले जातील . 3. फेज १ च्या कामानंतर काही डेटा शिफ्ट केला असल्याने येत आलेला एरर आता सर्व डेटा पुन्हा सुस्थितीत केल्या मुळे आत्ता या नंतर अडचण येणार नाही .त्यामुळे खाता दुरुस्ती मध्ये तलाठ्याने दुरुस्ती करून साठवा केलेलं गट / स. नं तहसीलदार यांना मान्यतेसाठी उपलब्ध राहतील तसेच तलाठी यांनी खाता दुरुस्ती केल्या नंतर असे स न. खाता दुरुस्त्यांना मान्यता देणेसाठी उपलब्ध आहेत ४. काही ७/१२ वर मंजूर फेरफाराचा ७/१२ वर अंमल आला नसल्यास आत्ता फेज १ चा डेटा पुन्हां पूर्ववत केल्यास पूर्ण अंमल झालेलां दिसेल . हे तपासून पहा . ब ) ODC - १. मोठ्या गावांचा ODC अहवाल १८ तयार होताना फार वेळ लागत होता , आत्ता सुधारणा करणेत आली असून आत्ता अहवाल १८ तात्काळ तयार होईल २. मोठ्या गावांचा ODC अहवाल ३ तयार होताना फार वेळ लागत होता , आत्ता सुधारणा करणेत आली असून आत्ता अहवाल ३ तात्काळ तयार होईल ३. ODC अहवाल १७ मध्ये शून्य क्षेत्राची खाती दाखवली जात नव्हती ती आता दाखविली आहेत , मोठ्या गावान्साठीची अडचण दूर करणेत आली आहे ४. अतिरीक्त अहवाल ५ मध्ये ७/१२ वर एकाच नाव असलेले खाते दुरुस्त करतां येत नव्हते ती अडचण आत्ता दूर करणेत आली आहे ५. ७/१२ पाहताना येणारा "mhrorxxx_yyy" हा एरर आत्ता येणार नाही ६. अहवाल १५ मध्ये SKN KHATA NO. दाखविले जात नव्हते , आत्ता SKN KHATA NO दिसतील व दुरुस्त देखील करता येतील . कलम १५५ च्या आदेशाने फेरफार रजिस्टर दुरुस्त्यी - काही वेळा फेरफार साठवा जात नव्हता ही अडचण दूर करणेत आली आहे . कलम १५५ च्या आदेशाने ईतर अधिकारातील फेरफार प्रकार व उप प्रकार बदलणे या प्रकारात - काही वेळा अनेक दुरुस्त्या केल्या असताना सर्व दुरुस्त्या व्यवस्थित साठवल्या जात नव्हत्या ही अडचण दूर करणेत आली आहे .

Comments

Archive

Contact Form

Send