सातबारा वरील क्षेत्र व एकक योग्य लिहिणे बाबत
मार्गदर्शक सूचना क्र.८३ क्र.रा.भू.अ.आ.अ.४/रा.स./ ८३ / २०१८
जमाबंदी आयुक्त कार्यालय
( महारष्ट्र राज्य ) , पुणे यांचे कार्यालय
दि ७.१२.२०१८
प्रति,
मा. उप जिल्हाधिकारी तथा डी,डी.ई. ( सर्व )
विषय :- सातबारा वरील क्षेत्र व एकक योग्य लिहिणे बाबत
महोदय ,
आपल्या सर्वांना हे माहीतच आहे कि , संगणकीकृत ७/१२ वापरून घेतल्या जाणाऱ्या ई फेरफार मध्ये शेत जमिनी साठी हे.आर.चौ.मी व बिगरशेती च्या जमिनी साठी आर .चौ.मी. हे एकक वापरले जात आहे .तथापि फेरफार घेताना किंवा ७/१२ वर दुरुस्ती करताना आजूनही काही तलाठी यांचे कडून तसेच दस्त नोंदणी करताना दुय्यम निबंधक यांचे कडून चुका होत आहेत त्यामुळे अनेक वेळा मंजूर फेरफाराचा अपेक्षित व योग्य अंमल ७/१२ वर होत नाही . या साठी टाळताही यांनी फेरफार घेताना अथवा ७/१२ दुरुस्त करताना आणि दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणी करताना योग्य क्षेत्र व एकक टाकले जात आहे ना ह्याचे काळजी घ्यावी .
संगणकीकृत ७/१२ वर योग्य क्षेत्र व एकक न नमूद केल्यास खालील प्रश्न उद्भवू शकतात .
१. खातेदारांचे क्षेत्र कमीजास्त झाल्यास बेकायदा व्यवहार होवू शकतातव त्यामुळे खातेदारांचे वाद विवाद वाढू शकतात .
२. एकक योग्य न नमूद केल्यास आकारणी ( शेती व बिनशेती ) चुकू शकते त्यामुळे शासकीय नुकसान झाल्यास जबाबदारी निश्चित करावी लागेल.
३. ७/१२ वर्ल एकूण क्षेत्र व खातेदारांचे क्षेत्राची बेरीज न जुळल्यास अहवाल १ तयार होवून ७/१२ व्यवहारासाठी ब्लॉक होईल.
४. शासनाच्या अन्य विभागाला ई फेरफार प्रणालीतून माहिती उपलब्ध करून दिल्यास ते चुकीची ठरते. उदा . कृषी विभाग – कृषी गणना संपूर्ण चुकीचे अहवाल येतील व अंदाज चुकतील.
५. गावचे एकूण क्षेत्र व ७/१२ वरील क्षेत्राची बेरीज या मध्ये अवास्तव वाढ किंवा घट येऊ शकते त्यामुळे जमीन महसूल मागणी व वसुली तसेच जमाबंदी चुकीची होईल.
क्षेत्र व एकक चुकण्याची काही उदाहरणे खाली दिली आहेत ती पाहून शेती व बिनशेती ७/१२ वरील क्षेत्र व एकक कसे वाचावे व समजावे ते पहा .
अ.क्र. ७/१२ वरील एकक क्षेत्र हेक्टर आर चौ.मी.
1 हे.आर.चौ.मी 1.2891 1 28 91
2 हे.आर.चौ.मी 12.8219 12 82 19
3 हे.आर.चौ.मी 0.6517 0 65 17
4 हे.आर.चौ.मी 0.8000 0 80 00
5 हे.आर.चौ.मी 0.0074 0 0 74
6 हे.आर.चौ.मी 67.0000 67 0 0
7 आर.चौ.मी 6.7158 0 6 71.58
8 आर.चौ.मी 0.8394 0 0 83.94
9 आर.चौ.मी 0.0091 0 0 0.91
10 आर.चौ.मी 53.0000 0 53 0
उदा . सगणकीकृत ७/१२ वर एका खातेदाराचे ०.८०.०० हे.आर.चौ.मी. असे आहे तथापी फेरफार घेताना खरेदी क्षेत्र ८००० आर लिहिले जाते हे पूर्णता चुकीचे आहे त्या ऐवजी ० हे ८० आर असे घेणे आवश्यक आहे . तसेच काही बिनशेती क्षेत्राचे ७/१२ वर एकक आर.चौ.मी. केले आहे परंतु क्षेत्र आर.चौ..मी. मध्ये रुपांतरीत केले नाही त्यामुळे क्षेत्र १०० पटी ने कमी दिसून येते उदा. हस्तलिखित मध्ये क्षेत्र ०.१२ हे.आर. असे नमूद आहे परंतु क्षेत्र बिनशेती असलेने तलाठ्याने त्याचे फक्त एकक आर.चौ.मी. केले त्यामुळे सध्या संगणकीकृत ७/१२ वर ०.१२०० आर.चौ.मी. दिसून येते ह्याचा अर्थ क्षेत्र फक्त १२ चौ,मी.म्हणजेच १०० पटीने कमी झाले आहे. हे पाहून दुय्यम निबंधक अथवा खातेदारांना देखील काही चुकले आहे हे समाजात नाही त्यामुळे ते दस्त नोंदणी करताना १२ आर असे करतात त्यामुळे अशा दस्ताचा फेरफार करून ७/१२ वर अंमल करता येत नाही त्यामुळे अनेक गुंतागुंत होवून अनेक दावे – प्रतिदावे होवून खातेदार यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो त्यामुळे प्रत्येक ७/१२ वरील क्षेत्र व एकक योग्य असल्याची खात्री करण्याची जबाबदारी तलाठ्याची आहे . प्रत्येक ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्यापूर्वी या बाबत तलाठी यांनी खात्री करावी . या साठी सात क्षेत्र व एकक अहवाल आज्ञावलीत देणेत आले आहेत ते बारकाईने अवलोकन करावेत . तशी कार्यवाही पूर्ण करून प्रत्येक तहसीलदार यांनी कामपूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देनेबाबत देखील सुचना दिल्या आहेत तथापि अद्याप एकाही तहसीलदार यांचे प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही . गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी आपण प्रत्येकाने ई फेरफार प्रणाली व संगणकीकृत ७/१२ समजून घेतल्याशिवाय ते १०० % यशस्वी करण्यात यश येणार नाही असे वाटते .
वरील विवेचन समजून घ्यावे व काम गुणवत्तापूर्वक पूर्ण करून घेण्याची कार्यवाही त्या गावचे पालक महसूल अधिकारी ,तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांनी करावी. ही विनंती .
सदरच्या सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती .
आपला विश्वासू
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त यांचे कार्यालय
(म.राज्य ), पुणे
प्रत :- उप विभागीय अधिकारी ( सर्व )
प्रत :- तहसीलदार ( सर्व )
Comments