रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार मोड्यूल शिवाय अन्य फेरफार घेण्याच्या सुविधा

नमस्कार मित्रांनो ,
 विषय – ई फेरफार मोड्यूल शिवाय अन्य फेरफार घेण्याच्या सुविधा
 महोदय ,
          अचूक ७/१२ साठी काम करत असताना तलाठी व मंडळ अधिकारी यांना ई फेरफार मोड्यूल , चूक दुरुस्ती मोड्यूल, खाता दुरुस्ती व नवीन ७/१२ तयार करणे या स्वतंत्र सुविधा देखील वापराव्या लागतात तथापि त्यांच्या URL अनेक वापरकर्ते यांना माहिती नसतात त्यासाठी ही माहिती महत्वाची आहे . मंडळ अधिकारी यांनी एखादा फेरफार मंजूर केल्यानंतर त्याचा योग्य अंमल झाला नसल्यास "फेरफराचा अंमल योग्य रित्या न झालेल्या फेरफारांची दुरुस्ती" हा ई फेरफार मधील पर्याय बंद करणेत आला आहे .त्या ऐवजी चूक दुरुस्ती फेरफार  मोड्यूल (CDF MODULE) उपलब्ध करून देणेत आले आहे ( त्याचे युजर म्यानुअल सोबत जोडले आहे ) या मध्ये हा फेरफार योग्य अंमल घेण्यासाठी उपलब्ध राहील . या मंजूर फेरफार योग्य अंमल होण्यासाठी ज्या गट / स.नं मध्ये जी दुरुस्ती करणे आवश्यक असेल ती दुरुस्ती CDF MODULE मधून तलाठी यांना करता येईल तथापि या चूक दुरुस्ती तपशील पाहून तलाठी यांनी माहिती साठवा केल्या नंतर तहसीलदार यांनी कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्त्यांच्या मान्यता या युजर क्रियेशन (UC) मधु BIOMETRIC LOGIN ने द्यावी लागेल . त्या नंतर परिशिष्ट क चा आदेश देखील स्वाक्षरीत  करून घ्यावा लागेल . सदरचा आदेश पाहून मंडळ अधिकारी हा फेरफार मंजूर करून मूळ मंजूर फेरफाराचा योग्य अंमल देयू शकतील तथापि या अश्या दुरुस्तीच्या कालावधीत कोणताही अन्य फेरफार त्या गट नं वर घेता येणार नाही अथवा मंजूर देखील करता येणार नाही ( अशा केसेस अत्यंत अल्प आहेत तथापि ही सुविधा अशा विशिष्ट फेरफारासाठी वापरता येईल )

 काही विशिष्ट कामासाठी विशिष्ट सुविधा दणेत आल्या आहेत

 1. खाता दुरुस्ती - khata_duruisti : https://District server IP/khata_durusti

 2. chuk_durusti :- योग्य रित्या अंमल न झालेल्या मंजूर फेरफाराचा योग्य अंमल देण्यासाठी https:// District server IP/chuk_durusti 

 3. new 7/12:- नवीन ७/१२ तयार करण्यासाठी https://District server IP/eferfar2beta_test_new712

 4. Wadi Vibhajan :- वाडी विभाजन – नवीन महसूल गाव तयार करणे साठी 

 अ) स्टेट देटा सेंटर वरील जिल्ह्यांसाठी SDC : https://10.187.202.183/wadivibhajan/ 

 ब) bsnl cloud डेटा सेंटर वरील जिल्ह्यांसाठी ( कोल्हापूर , ठाणे , नाशिक , सातारा , सांगली, सोलापूर , चंद्रपूर व गोंदिया या जिल्ह्यांसाठी )  : http://10.195.33.67/wadivibhajan

 क) NDC , PUNE डेटा सेंटर वरील जिल्ह्यांसाठी ( औरंगाबाद , नांदेड , नंदुरबार , परभणी , यवतमाळ व लातूर या जिल्ह्यांसाठी ) NDC : http://10.153.15.93/wadivibhajan/ 

या URL वापराव्यात ई फेरफार प्रणालीतून करावयाच्या कामा पैकी खालील चार बाबी नेहमी लक्षात ठेवा

 १. कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती

 २. कलम १५५ च्या आदेशाने मंजूर फेरफाराची चूक दुरुस्ती 

 ३. नवीन ७/१२ 

 ४. वाडी विभाजन

               हे चारही फेरफार मंजुरी साठी मंडळ अधिक्स्री यांना ई फेरफार मध्ये उपलब्ध राहणार नाहीत हे सर्व फेरफार मंडळ अधिकारी यांनी त्या त्या module मधेच निर्गत करावेत .

ह्या सूचना सर्व मंडळ धिकारी यांचे निदर्शनास आणाव्यात हि विनंती

 आपला विश्वासू


 ( रामदास जगताप )
 राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प

Comments

  1. Honourable sir
    Very useful & important information posted on your blog. Thank you very much.

    ReplyDelete
  2. https:// District server IP/chuk_durusti hi seva band aahe.

    talathi jo paveto chuk durust karit nasalya mule ferfar kamkaj purnapane band aahe.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send