रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

परभणी जिल्हामध्ये सातबारा डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा DSP टेस्टिंग करणे बाबत - दि.१.९.२०१८

नमस्कार मित्रांनो , काही तांत्रिक अडचणीमुळे बंद केलेली सातबारा डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा (DSP) आज दि. १.९.२०१८ पासून परभणी जिल्ह्यासाठी टेस्टिंग साठी http://10.153.15.93/dsp या URL वर उपलब्द्ध करून दिली आहे त्याचे टेस्टिंग आज संध्याकाळी करणेत आले असून ते यशस्वी झाले आहे . त्यानंतर उद्या तहसीलदार सांगतील त्या १५/२० गावांचे DSP चे काम पूर्ण करून पाहावे . त्यातील अनुभवाच्या आधारे आणखी सुधारणा आवश्यक असल्यास करता येतील त्यानंतर पुढील आठवड्यात अन्य जिल्ह्यांना ही सुविधा उपलब्ध करून देता येईल . ही सुविधा टेस्टिंग फेज मध्ये असली तरी ती LIVE DATA वर आहे त्यामुळे हे काम काळजी पुर्वक करावे . डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ जनतेला थेट ONLINE पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीत होऊन कोणत्याही कायदेशीर कामाला वापरता येणार आहे म्हणून फक्त अचूक असलेले ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करावेत . या मध्ये पहिल्यांदाच ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणे व फेरफार पाश्च्यात ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणे असे दोन पर्याय देनेत आले आहेत ते योग्यरीत्या व अचूकपणे काम करतात का ह्याची खात्री करावी . डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ http://aapleabhilekh.mahabhumi.maharashtra.gov.in/satbara या संकेतस्थळावर OTP वापरून उपलब्ध होईल ( सध्या ही सुविधा फक्त जुन्या डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ साठी उपलब्ध आहे मात्र लवकरच ती देखील कार्यान्वित होईल . कृपया परभणी जिल्ह्यातील तहसीलदार यांनी UAT REPORT सोमवार दि.३.९.२०१८ दु.१२.०० वा पर्यंत द्यावा . आपला रामदास जगताप

Comments

  1. सर मोबाईल नंबर पाहिजे

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send