महसूल दिन २०१८ - एका वर्षात ५०००० वेळा माझा ब्लॉग पहिला गेला
नमस्कार मित्रांनो ,
प्रथम आपल्या सर्वांना महसूल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बरोबर एक वर्ष पूर्वी दि १.८.२०१७ राजी म्हणजेच महसूल दिन २०१७ पासून मी आपल्या महसूल विभागातील सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार , तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना ई फेरफार प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्यासाठी मदत व मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने माझा ramdasjagtap.blogspot.in ब्लॉग सुरु करून ब्लॉगवर लिखाण करून माहितीचे देवाण घेवाण करण्याचा प्रयत्न सुरु केला त्याचा एका वर्षात ५०००० पेक्षा जास्त महसूल मित्रांनी भेट देऊन लाभ घेतला व आपले कर्तव्य अचूक बजावण्यासाठी माझ्या ब्लॉग चा उपयोग झाला असेल अशी अपेक्षा आहे .
या पुढे देखील आपल्याला मदत होईल अशी माहिती ब्लॉगवर उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील
पुन्हा एकदा आपल्याला महसूल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आपला
रामदास जगताप
दि १.८.२०१८
Comments