रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

समज गैरसमज व बेजबाबदारपणा

नमस्कार मित्रांनो , सर्वात प्रथम राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन . आज मी आपल्याशी गेल्या आठवड्यातील घडामोडींवर हितगुज करणार होतो व आपण एक महत्वाचा टप्पा ओलांडल्यानंतर येत असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन करणार होतो परंतु पहिल्यांदा आपल्यातील समज गैर समज व आपला बेजबाबदार पणा या विषयावर लिहावे असे वाटते . आपला हा ७/१२ संगणकीकरणाचा कार्यक्रम अनेक वर्षे चालू आहे तरीही आपल्याला योग्य दिशा का सापडत नाही यावर विचार करून मी आपल्या सर्वांना मदत मार्गदर्शन व दिशा दर्शन करण्यासाठी या प्रकल्पाचे राज्य समन्वयक म्हणून नेमणूक नसताना उसनवारी तत्वावर माझे मूळ काम पाहून मा.मंत्री महोदय ( महसूल) व मा. प्रधान सचिव ( महसूल ) यांचे आग्रहास्तव काम पाहण्याचे ठरवले . या प्रकल्पात काम करणारे तलाठी , मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार , तहसीलदार , उप विभागीय अधिकारी , डी डी ई तथा निवाशी उप जिल्हाधिकारी , जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त असे सुमारे १६००० पेक्षा जास्त महसूल अधिकारी व कर्मचारी काम करतात तथापि जमाबंदी आयुक्त कार्यालयात या सर्वानी कोणाकडे आपल्या अडचणी मांडाव्यात पाठपुरावा करावा ,हा प्रश्नच होता तो माझ्या तिथे जाण्यामुळे सुटणार होता म्हणून मी स्वतःहून हे काम मनापासून करण्याचे ठरवले . गेले दीड वर्षे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन उपस्थित सर्व तलाठी मंडळ अधिकारी व महसूल अधिकारी यांचे शंकासमाधान करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी सुमारे ९००० कर्मचारी व अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून प्रशिक्षण दिले . zero tolerance to error हे ब्रीदवाक्य घेऊन आपण सर्वानी काम केले . खास या कामासाठी आपल्या सर्वाना मार्गदर्शन व्हावे व शंका समाधान करता यावे व योग्य feedback मेळावा म्हणून हा ब्लॉग ( ramdasjagtap.blogspot.in) लिहायला सुरवात केली तसेच राज्यभरात whats app , telegram च्या माध्यमातून सुमारे ४५ ग्रुप्स वर प्रत्येक सदस्याने पाठवलेल्या अडचणी सोडविण्याचा आपल्या क्षमतेच्या २००% प्रयत्न करून रात्री १२/१ वाजे पर्यंत उत्तर देणे . कोणत्याही वेळी कोणीही फोन केला तरी त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करणे या सर्वामागे आपल्याला योग्य मार्गदर्शन करणे हा एकमेव उद्देश होता व आहे . आपण ही त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत रात्रंदिवस काम करून हे अशक्यप्राय वाटणारे शिवधनुष्य पेलले . आपण या साठी केलेल्या कष्टाची माझ्या इतकी जान / जाणीव फार कमी जणांना असेल असे मला वाटते . तुमच्या अडचणी काय आहेत ? हे ही मला माहीत आहे व त्या सोडविण्यासाठी मी च प्रयत्न केले आहेत . माझ्या क्षमतेपेक्षा जास्त प्रामाणिक काम करून ज्यांनी ज्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे त्या प्रत्येकाला महाराष्ट्र दिनी आनंद झाला असेल असे मला वाटते . म्हणून आपल्या सर्वांचे अभिनंदन . एका मेडिया ग्रुप ने या कामाबद्दल जनतेला सोप्या भाषेत डिजिटल ७/१२ कसा मिळवावा हे समजवावे या उद्देश्याने मुलाखतीला बोलावले , या साठी रीतसर वारीष्टांची मान्यता घेऊन मी मुलाखतीला येतो असे त्यांना सांगितल्या नंतर त्यांनी एक निमंत्रण (invitation) तयार करून त्यांच्या वार्ताहर ग्रुप वर पाठविले व त्याची एक प्रत मलाही दुपारी १.११ वा पाठवली व मला १.४५ पर्यंत या असे सांगितले ते इन्व्हीटेशन वाचताच त्यातील एक शब्द मला खटकला . त्याबाबत मी तत्काळ त्यानी बदलून पाठवावा अशी विनंती केली त्या प्रमाणे तो शब्द बदलून त्यांनी पुन्हा इन्व्हीटेशन बदलून सर्वांना पाठवले तसे ते मलाही पाठवले मी तोपर्यंत तेथे पोहोचलो व प्रत्यक्ष फेसबुक live मुलाखत २.०५ वा सुरु होऊन २.३० वा संपली .ती अनेक तलाठी मित्रांनी live पहिली . त्यानंतर लगेच मी बदलेले इन्व्हीटेशन व facebook live मुलाखतीची लिंक आपल्या सर्व dilrmp group वर पाठवली . असे असतानाही काही मित्रांनी त्यावर चर्चा व निषेध सुरु केले . कोणतीही बातमी , audio आठवा video रेकॉर्डिंग न पाहता हे करणे योग्य नाही हे मी त्याच वेळी group वर हे स्पष्ट केले तरीही काही तालुक्यात प्रशस्तीपत्र परत करून त्याचा show करण्याचा प्रयत्न केला जात आहे व त्यावर कोणीही वैयक्तिक ( काही अपवाद वगळता ) आथवा संघटनेने या बाबत विचारणा केली नाही हे जास्त खेदजनक आहे . हे पटले नाही म्हणून ही वस्तुस्थीती मित्रांच्या माहिती साठी शेवटी एकाच अपेक्षा समज गैरसमज व बेजबाबदारपणा टाळावा आपला रामदास जगताप

Comments

  1. नमस्कार सर,
    सर्वप्रथम तुमचे मनापासून खुप खुप आभार.मी विचार केला होता की तुम्ही किती कष्ट घेतले आहे ऑनलाईन सातबारा साठी पण तुमचा ब्लॉग वाचल्यावर मला लक्ष्यात आले की मी जेवढे समजले होते त्यापेक्षा कितीतरी अधिक कष्ट तुम्ही ह्या प्रोजेक्ट साठी घेतले आहे.45 पेक्षा जास्त वेगवेगळ्या व्हाट्सएप ग्रुप वर तुम्ही तलाठी कामगारांना सूचना आणि मार्गदर्शन करत आहात.या सर्वांचा नक्कीच त्या सर्व मंडळींना खुप उपयोग झाला असेल. परंतु ह्या मंडळींनी जो काही किरकोळ कारणासाठी निषेध नोंदवला ही खरं तर खुप शरमेची गोष्ट आहे.एक मनुष्य जिवाच्या आकांताने वेळ काळाचे बंधन न पळता सर्वांना मार्गदर्शन करत आहे आणि तेही अधिकचा कार्यभार घेऊन.साहेब तुमच्या सारखे अधिकारी महसूल विभागात असतील तर विभागाचा कायापालट व्हायला वेळ नाही लागणार.
    जे काम कितीतरी दिवसापासून रेंगाळत चालले होते त्याकामाला तुम्ही जबाबदारी घेतल्यापासून गती मिळाली आहे हे कोणी नाकारू नाही शकत.खुप लोकांना ऑनलाईन सातबारा सिस्टीम च्या मागचे कष्ट माहीत ही नाही.
    सर तुमच्या ब्लॉग चा नियमित वाचक आहे.तुमचे विचार आणि कामाची पद्धत वाचुन एक वेगळीच ऊर्जा मिळुन जाते.
    राजेंद्र दरेकर

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send