सर्व विभागीय आयुक्त यांची पुणे येथील कार्यशाळा व आढावा बैठक दिनांक ७/४/२०१८
नमस्कार मित्रांनो
आज मा. महसूल मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली व मा. प्रधान सचिव महसूल यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये विभागीय आयुक्त कार्यालय , पुणे येथे सर्व विभागीय आयुक्त यांची कार्यशाळा घेनेत आली .
त्यामध्ये RE EDIT MODULE चा सविस्तर आढावा घेनेत आला . या वेळी मा. मंत्री महोदय व मा. प्रधान सचिव महोदयांनी खालील सुचना दिल्या
१. सर्व जिल्ह्यांनी RE EDIT MODULE काम माहे एप्रिल अखेरी पूर्वी पूर्ण करावे
२. काम पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील कामाची गुणवत्ता महसूल अधिकारी यांने क्रॉस चेकिंग करून तपासावी व त्यामध्ये आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी दिलेल्या नवीन चार सुविधा लेखी पत्राने ( किती काम आहे त्याची आकडेवारी देऊन ) जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून मागणी करावी
अ) कलम १५५ च्या आदेशाने खात्यात दुरुस्ती ,
ब ) कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांक बदलणे .
क ) कलम १५५ च्या आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे व
ड) कलम १५५ च्या आदेशाने भूधारणा पद्धती ची दुरुस्ती करणे
या सुविधांचा वापर करून ZERO TOLERANCE TO ERROR हे उद्दिष्ट सध्या करावे .
३. ज्या तालुक्याचे काम पूर्ण झाले आहे त्या तालुक्याच्या तहसीलदार यांनी पुनर्लिखित संगनकिकृत ७/१२ चे प्रख्यापण आदेश पारीत करावेत
४. ज्या तालुक्याचे प्रख्यापण आदेश काढून झाले आहेत त्यानी ( आज अखेर ६७ तालुके ) DSP-RoR ही सुविधा वापरून ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्याची कार्यवाही सुरु करणेत यावी .
५. तलाठी संघटनेच्या मागणी प्रमाणे संप काळातील वेतना बाबतचा निर्णय निर्गमित करणेत आला असून सन २०१७-१८ चे DETA कार्ड चे अनुदान मंजूर करणेत आले आहे
शासन स्तरावरील उर्वरीत कार्यवाही दिनक १०.४.२०१८ पर्यंत पूर्ण करून दि.१२.४.२०१८ रोजी संघटनेची बैठक बोलवावी .
६. जमाबंदी आयुक्त कार्यालयाने ई चावडी आज्ञावलीचे कामकाज सुरु करणेच्या दृष्टीने कार्यवाही सुरु करावी .
७. १ में,२०१८ रोजी मा. मुख्यमत्री महोदयांचा हस्ते डिजिटल स्वाक्षरी युक्त ७/१२ सेवेचा लोकार्पण सोहळा आयोजित करणेत येईल त्याचे नियोजन सुरु करावे
८. तलाठी / मंडळ अधिकारी यांना कमी पडलेले LAPTOP व PRINTERS जिल्हा वार्षिक योजनेतून ( DPC) GEM द्वारे जिल्हाधिकारी यांनी खरेदी करावेत .
९. तलाठी साजा पुनर्रचना मंजुरी प्रमाणे ज्या गावांचे विभाजन होणार आहे त्या गावाचे विभाजन करून वाडी विभाजनाने नवनिर्मित गावांचे तलाठी दफ्तर तयार करणेची कार्यवाही करावी .
१० ज्या तालुक्यांचे काम अपूर्ण आहे त्या तालुक्यांचा आढावा विभागीय आयुक्त यांनी उप विभागीय अधिकारी व तहसीलदार निहाय घेनेत यावा
या कार्यशाळेमध्ये या शिवाय अनेक सूचना विभागीय आयुक्त महोदयांना देनेत आल्या .
हे सर्व आपल्या माहिती साठी
आपला
रामदास जगताप
Comments