PDF GENERATION साठीची EDIT चे ९५ % काम पूर्ण करण्याची अट काढून टाकणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
१. आज पासून OPG मधील PDF GENERATION साठीची EDIT चे ९५ % काम पूर्ण करण्याची अट काढून टाकली आहे .
२. pdf मध्ये तयार होणारा ७/१२ फक्त प्रुफ रीडिंग साठी ( PROOF READING ) साठी वापरला जावा म्हणून त्याचे नमुन्यात बदल करून तसे नमूद केले आहे .
३. नवीन pdf तयार करताना REINITIALISE करूनच pdf तयार करण्यात यावीत ,
४. pdf तयार करण्याचे काम शक्यतो रात्री किंवा सकाळी लवकर करावे .
५ . घोषणापत्र ३ करण्यापूर्वी दुरुस्त ७/१२ च्या pdf तयार करून त्या तलाठी यांनी १००% , मंडळ अधिकारी यांनी ३०% , नायब तहसीलदार यांनी १९% , तहसीलदार यांनी ५% , उप विभागीय अधिकारी यांनी ३% व जिल्हाधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून अन्य उप जिल्हाधिकारी यांनी १% ७/१२ pdf प्रिंट ( प्रत्येक गावाचे ) तपासवेत . या तपासणी नंतर प्रत्येक अधिकार्याने दिनांक ५/५/२०१७ च्या परीपत्रकातील प्रपत्र १ मधील प्रमाणपत्र (तपासणी केलेल्या ७/१२ चे स.न. नमूद करून द्यावे ) घेतल्याशिवाय तहसीलदार यांनी घोषणापत्र ३ करू नये . अन्यथा ती त्यांची वैयक्तिक जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी .
रामदास जगताप
Comments