सर्वे नंबर व त्याचे पोटहिस्सा योग्यरीत्या लिहीनेबाबत
नमस्कार मित्रांनो ,
अचूक ७/१२ व ८अ जनतेला online उपलब्ध करून देण्यासाठी चालू असलेल्या re edit च्या कामाची गुणवत्ता तपासणी केली असता असे दिसून आले आहे कि सर्वे नंबर व त्याचे पोट हिस्सा लिहीण्यासाठीची योग्य पद्धती काय आहे याबाबत सन २००२ मधेच शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत असे असूनदेखील अनेक ठिकाणी सर्वे नंबर योग्यरीत्या लिहिले जात नाहीत असे दिसून येते .
उदा हस्तलिखित ७/१२ मध्ये स न २२/३ +२२/४ +२२/५ चे प्लॉट नंबर १ असे नमूद असलेतरी संगणकीकृत ७/१२ वर २२/३/२२/४/२२/५ चा प्लॉट न.१ असे नमूद करणेत येत आहे te पूर्णतः चुकीचे आहे
त्यासाठी असे सर्व सर्वे नंबर साठी योग्य नंबर नमूद करण्यासाठी गावी हस्तलिखित ७/१२ मध्ये फेरफार घेऊन गावातील या स न चे सर्व पोट हिस्से विचारात घेऊन योग्य नंबर देणे आवश्यक होते तसे केले नसल्यास सर्व तहसीलदार यांनी योग्यते आदेश पारीत करून दुरुस्त्या करण्यात याव्यात .
आपला
रामदास जगताप
Comments