घोषणापत्र पुर्ववत करणेबाबत. नवीन सुविधा
क्र./रा.स./ का.वि./ 14 /2017.
जमाबंदी आयुक्त आणि
संचालक,
भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे
दिनांक
- 12 /09/2017.
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा
डिस्ट्रीक्ट डोमेन एक्सपर्ट
पुणे, कोल्हापूर, जळगांव, यवतमाळ व लातूर.
विषय – वापरकर्ता
स्विकृतचाचणी ( UAT)
घोषणापत्र १ पुर्ववत करणेबाबत.
काही
वापरकर्ते यांचेकडुन नजरचुकीने / अनावधानाने घोषणापत्र – 1 झाले असल्याबाबत व
त्यामुळे खाता एकत्रीकरण, खाता विभागणी व खाता प्रोसेसिंगचे काम त्यांना करता येत
नाही त्यांना हे घोषणापत्र-1 पुर्ववत (Reversion) करण्याची सुविधा देण्याची विनंती
केली होती. त्या अनुषंगाने राष्ट्रीय सुचना
विज्ञान केंद्र, पुणे यांचेकडुन ती सुविधा विकसित केली असुन त्याची वापरकर्ता
स्विकृती चाचणी (UAT) साठी आपलेकडे देण्यात येत आहे.
1. घोषणापत्र
-1 पुर्ववत करणे ( Reversion of declaration-1)
अ) घोषणापत्र
-1 केलेल्या ज्या गावामध्ये घोषणापत्र -2 बाबतचे (Re-Edit) चे कोणतेही काम सुरु
नाही व –
ब) Re-Edit
साठी निवडलेल्या कोणत्याही 7/12 चे सर्व फेरफार मंजुर किंवा नामंजुर केले असल्यास
या गावांचे घोषणापत्र -1 सबंधीत तलाठी यांच्या विनंतीप्रमाणे DBA loginने पुर्ववत
करता येईल. त्यानंतर संबंधीत तलाठयाला
त्या गांवातील कोणत्याही खात्याचे एकत्रीकरण, विभागणी अथवा प्रोसेसिंग करता येईल.
2. घोषणापत्र
-2 व 3 मध्ये नायब तहसिलदाराचे नांव editable ठेवण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी नायब तहसिलदार यांनी तपासणी
करावयाच्या 10% 7/12 चे काम DBA वगळता नायब तहसिलदार यांचेकडे सोपविले असेल त्या
नायब तहसिलदाराचे नांव व सेवार्थ आय डी नमुद करुन घोषणापत्र – 2 व 3 करता येईल.
वरील
प्रमाणे देण्यात आलेली सुविधा व्यवस्थित चालतील अगर कसे ? याबाबत आपला वापरकर्ता
स्विकृती चाचणी ( UAT) अहवाल तात्काळ पाठविण्यात यावा ही विनंती.
आपला विश्वासू

( रामदास जगताप )
राज्य
समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी
आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे
Comments