रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

TODAYS VIDEO CONFERANCE BY PS REVENUE DATE 31/8/2017

नमस्कार मित्रांनो ,
आज मा प्रधान सचिव महसूल व मा जमाबंदी यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये re - edit module च्या कामाचा आढावा घेऊन गुणवत्तापूर्वक काम पूर्ण करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी व मा विभागीय आयुक्तांना देणेत आल्या . 
१) मा जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून काढलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे गुणवत्तापूर्वक काम करताना , 
       अ )घोषणापत्र १ तलाठी यांनी सर्व खाता मास्टर चे काम पूर्ण झाले नंतरच करावे . 
        ब ) घोषणापत्र २ नायब तहसीलदार (DBA ) यांनी करावे मात्र त्यापूर्वी , त्या गावाच्या पालक महसूल अधिकाऱ्याने केलेली तपासणी सूची १ ते २४ मुद्द्यांची तपासणी करून अहवाल १ ते २६ पैकी आवश्यक ते अहवाल निरंक केलेले आहेत ,  सर्व महसूल अधिकाऱ्यांनी टक्केवारी प्रमाणे  निश्च्छित करून दिलेल्या बिंदू प्रमाणे तपासणी केली आहे , प्रत्येक ७/१२ त्या महसूल अधिकाऱ्याने नाव व पदनाम टाकून सही केलेली आहे व ७/१२ हस्तलिखित प्रमाणे जुळत असलेची खात्री केली असल्याचे प्रपत्र १ मधील प्रमाणपत्रे प्राप्त झाली असल्याची खात्री केली आहे तपासणीतील  त्रुटी देखील दुरुस्त केली तसेच संगणीकृत गाव नमुना न १ (क ) हस्तलिखित १ (क ) शी जुळत असल्याची खात्री  केले नंतरच घोषणापत्र २ करावे . आवश्यक त्या सर्व गट RE EDIT मधून दुरुस्त केलेची खात्री करावी . घोषणापत्र २ केले नंतर कोणतीही दुरुस्ती RE  EDIT मधून करता येणार नाही ह्याची नोंद घ्यावी . 
         क ) घोषणापत्र २ झाल्यानंतर घोषणापत्रात नमूद सर्व कार्यवाही झाल्याची खात्री करून DBA यांनीच घोषणापत्र ३ साठीची माहिती RE EDIT मधून साठवावी त्यानंतर तहसिलदार यांनी USER CREATION   मध्ये BIOMETRIक  लॉगिन ने घोषणापत्र ३ करावे . 
              घोषणापत्र १,२,व ३ करताना घाई घाई ने काम अपूर्ण असताना घोषणापत्र करू नये . 


२) सेर्वर स्पीड बाबत DIRRECTOR  माहिती व तंत्रज्ञान यांचेशी चर्चा करणार 
३) DATA SIGNING ची सुविधा प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र लवकरच देणार 
४ ) काही जिल्ह्यात घोषणापत्र ३ झालेल्या गावांची तपासणी केली असता , नावात दुरुस्त्या ,क्षेत्र दुरुस्ती , भूधारणा पद्धती व उप प्रकार योग्य निवडलेला नाही, अकृषिक चे क्षेत्र आर चौ मी मध्ये रूपांतरित करून टाकलेले नाही अथवा अकृषक आकारणी टाकलेली नाही ,७/१२ वरील सर्व फेरफार संगणीकृत मध्ये आलेले नाहीत , इतर अधिकारातील सर्व नोंदी बिनचूक रित्या दुरुस्त केलेल्या नाहीत . तलाठी मंडळ अधिकारी व काही महसूल अधिकाऱ्यांनी तपासणी न करताच नुसती प्रमाणपत्रे स्वाक्षरी केली आहेत , प्रत्येक ७/१२ तपासून सह्या केलेल्या नाहीत असे दिसून आले आहे . असे झालेल्या संबंधित अधिकारी / कर्मचारी शिस्तभंग कारवाई करणेत येईल ह्याची नोंद घ्यावी 


रामदास जगताप 
उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई  फेरफार प्रकल्प  

Comments

Archive

Contact Form

Send