रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

Re-Edit Module मधील Conditions and Checks बाबत.

क्र. ई-फेरफार/क्र./रा.स./कावि/ /२०१7 मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य ) पुणे यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, ३रा मजला. पुणे दिनांक : २४ /08/२०१7. प्रति, उपजिल्हाधिकारी तथा डिस्ट्रीक्ट डोमेन एक्सपर्ट (DDE) (सर्व.) विषय – Re-Edit Module मधील Conditions and Checks बाबत. Edit Module च्या कामानंतर चावडी वाचनामध्ये प्राप्त झालेल्या सुचना व हरकती प्रमाणे दुरुस्त्या करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आपलेल्या Re-Edit Module मध्ये खालीलप्रमाणे नमुद Software मध्ये Checks लावण्यात आलेले आहेत. 1. कोणताही 7/12 Edit Module मध्ये Confirm किंवा Certify केल्याशिवाय Re-Edit साठी उपलब्ध होणार नाही. जो 7/12 Edit Module मध्ये प्रलंबित आहे तो प्रथम Edit Module मध्ये Confirm किंवा Certify करावा व त्यानंतरच गरज असल्यास Re-Edit साठी घ्यावा. 2. कोणताही खाता प्रोसेसिंगसाठी निवडण्यापुर्वी तो खाता ज्या 7/12 वर नमुद असेल त्या 7/12 वर ई-फेरफार (नोंदणीकृत व अनोंदणीकृत), Edit, ODU मध्ये कोणताही फेरफार प्रलंबित असु नये अथवा त्या सर्व्हे नंबर / गट नंबर वर कोणताही नोंदणीकृत दस्त प्रलंबित असु नये. 3. खाते प्रोसेसिंगमध्ये निवडलेला खाता क्रमांक, खाता एकत्रिकरण किंवा खाता विभागणीसाठी त्याचवेळी निवडलेला असु नये. 4. घोषणापत्र -1 झालेनंतर कोणत्याही खाते क्रमांकावर खाता प्रोसेसिंग, खाता एकत्रिकरण किंवा खातेविभागणी करता येणार नाही. जरी अशा खात्यावर यापुर्वी खाता एकत्रिकरण, खाता विभागणी अथवा खाता प्रोसेसिंग केले नसले तरीही अशा खात्यावर कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. 5. घोषणापत्र – 1 करणेपुर्वी किमान एका तरी खात्यामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे. 6. Re-Edit Module मध्ये घोषणापत्र -1 झाल्याशिवाय कोणताही 7/12 दुरुस्तीसाठी निवडुन दुरुस्त्या करता येणार नाहीत. 7. घोषणापत्र – 2 करण्यापुर्वी Re-Edit Module मधुन ज्या चुका / त्रुटी दुरुस्त झाल्या नव्हत्या त्या सर्व त्रुटींसह चावडी वाचनात प्राप्त झालेले सर्व आक्षेपाप्रमाणे आवश्यक असलेल्या दुरुस्त्या ज्या ठिकाणी 7/12 वरील क्षेत्राचे एकक बदलणे, 7/12 शेती / बिगरशेतीसाठी निवडणे, बिगरशेती साठी निवडलेल्या क्षेत्राचे योग्य एकक व योग्य क्षेत्र आर.चौ.मी. मध्ये रुपांतरीत करणे गांव नमुना 1 क अद्ययावत करणे व ODC मधील 1 ते 26 अहवाल निरंक करण्यासाठी ज्या ज्या दुरुस्त्या आवश्यक आहेत अशा सर्व दुरुस्त्या पुर्ण केल्यानंतर तसेच महसुल अधिकारी यांचे तपासणीत काही त्रुटी आढळुन आल्यास त्या दुरुस्त्या केल्यानंतरच घोषणापत्र -2 करावे. 8. घोषणापत्र – 2 केल्यानंतर 7/12 मध्ये Re-Edit मधुन दुरुस्त्या करणेच्या चुकुन राहिल्या असतील तर या 7/12 वर घोषणापत्र -2 नंतर कोणत्याही दुरुस्त्या करता येणार नाहीत. 9. घोषणापत्र –2 तलाठयाने न करता नायब तहसिलदार ( DBA) यांनी करावे. त्यासाठी घोषणापत्रात नमुद सर्व बाबी पुर्ण झाल्याची खात्री DBA यांनी करावी. 10. घोषणापत्र – 3 User Creation मधुन बायोमेट्रीक लॉगीनद्वारे तहसिलदार यांनी करावे त्यासाठी घोषणापत्रातील नमुद सर्व बाबी पुर्ण झाल्या असल्याची खात्री करावी. 11. घोषणापत्र – 3 झाल्यानंतर कोणत्याही खात्यामध्ये अथवा 7/12 मध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही तसेच हे गांव Edit व Re-Edit Module साठी उपलब्ध राहणार नाही. 12. 7/12 वर एकच खाते असल्यास 7/12 वरुन असे खाते वगळता येणार नाही. यापुर्वी योग्य ते खाते समाविष्ठ करुनच असे अनावश्यक खाते वगळता येईल. 13. खाता वगळणे या पर्यायामधुन काम करतांना जर 7/12 वर एकच खाते असेल तर असे खाते वगळता येणार नाही. वरीलप्रमाणे सूचना सर्व वापरकर्त्यांच्या निदर्शनास आणाव्यात ही विनंती. आपला विश्वासू ( रामदास जगताप ) उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक, ई- फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे

Comments

Archive

Contact Form

Send